सुंदर स्री पण....
ओळ लिहताना सुद्धा मनात अनेक वेगळे क्षण डोकावून गेले....
स्री म्हणुन घरात जन्म घेतल्यावर अनेक नातांचे बंध रेशीमगाठीत बांधले जातात....
आजी आणि बाबांची माया कुठली तरी पुण्याई असल्या सारखी वाहत असते....
आई - पप्पाच न संपणार प्रेम शेवट पर्यंत कर्तव्याची जाणीव जपताना दिसतं असतं....
भाऊ आणि बहीण हे नेहमी प्रमाणे हक्क गाजवणारी गोड नातं...
जे आयुष्य भरात मनात साचलेल्या आठवणीं मोकळे होण्याची दारे....
बाईच्या आयुष्याला खरं वळणं तिच्या जोडीदार मुळे मिळतं....
सुख दुःखाचा खेळ हा दोघांना हि वाटुन पुढे चालाच असतं....
संसाराच्या अंगणात नाजुत पावलाच आगमन झाल्यावर स्री हि खरा अर्थाने पूर्णत्वास येते.....
मनात भावना हया लहानपणीच जन्म घेतात....
पण प्रत्येक नात्यात प्रेमासोबत स्वार्थ हा देखील असतोस...
लेकरु आणि आईच प्रेम हे निःस्वार्थी पणाची ओंजळ भरूनी वाहत असते....
बघता बघता आयुष्यं जबाबदारी पुर्ण करण्यात संपत असतं....
आज मासिकात मैत्रिणीचा लेख वाचला....
आयुष्य हे स्वतः साठी आनंदाने जगावं....
परत जुन्या दिवसांची मयफिल बसली....
गप्पांच्या नाद गुंजू लागला....
उशिराच कळलं पण आता स्वतः साठी वेळ काढू लागलो....
नवीन ठिकाण, नवीन गोष्टी करु लागलो....
बदल स्वीकारणं आणि ते जगणं हीच मोकळ्या श्वासांची सुरूवात आहे....
आपण आयुष्य जगताना काय गमावत आहोत आणि काय मिळवत आहोत हे कळावे असे जीवन जगावे....
एखाद्या गोष्टीचा राग करण्या पेक्षा माफ करणं सोप होऊनी जाते....
पण ते परत स्विकारणे होत नाही.... कारण आयुष्यात अनुभवाची शिदोरी देऊनी जाते....
दुसऱ्यावर विश्वास ठेवून फसण्या पेक्षा स्वतःवरील विश्वास मजबुत करा....
स्वतःला विचारा की तुम्ही काय करु शकता....
स्वतःच्या आयुष्यातील या जन्मात येऊन या सुंदर शरिराने आता पर्यंत जी साथ दिली आहे त्या शरीरा साठी काय करु शकता.....
का जन्म झाला आहे आपला काय हेतु आहे.....
स्वतःला आनंदी ठेवायला, कुटुंबाला सुखी करायला, समाजातील लोकांना मदत करायला की सुंदर भक्ति करायला....
कसं जगायचं आहे.....
कोणी सोडलं किंवा निघुन गेलं त्या दुःखाच्या आठवणींत मरायच की जोपर्यंत बरोबर होतो तोपर्यंत खुप काही शिकलो आणि आता हे समजुन पुढे चुक न करतां जगायच....
समुद्रातील खोल पाण्याचा गाभा गाठायचा.... तर तस मन लागत.... लगेच अंतर कापत नाही येतं.....
वेळ हि आयुष्याची खरी गुरू आहे.... ती सगळे धडे चांगले शिकवते....
समाजातील नको असलेल्या हावऱ्या शरीरावरून फिरणाऱ्या नजरा, सॉरी असं बोलून केलेले स्पर्श हे सगळं स्री ला रोजच्या दिवसांत न कोमजता सहन करुन परत हिंमतीने उभ रहावं लागतं...
का बघणाऱ्या ला शरीर नाही आहे का?
निर्णय तुमचा आयुष्य तुमचं......
स्री ला नात्यात काय पाहिजे असतं प्रेम, प्रामाणिक सोबत, respect आयुष्यभरासाठी......
ते पण देताना नाकेनऊ..... एक दिवसा साठी women day साजरा केला जातो.....
स्री ने कुठे हि चुकायच नाही मग स्री सोबत चुकीची वागणूक करताना काही कसं वाटतं नाही....
एका बाईने आगोदर दुसऱ्या बाईला समजून घेतलं पाहिजे....
एका दिवसाचा मान पण बाकीच्या दिवसाचं काय? म्हणुन कोणी मान देईल नाही देईल आगोदर स्वतःचा मान स्वतः जपायला शिका.....
आयुष्य हे एकदाच मिळतं ते चांगलं जगा.....
आयुष्याची वाट काट्याची असेल पण तुम्हीं हुशार लेकीनो पायात फुलांच्या पाकळ्या घालुन चाला त्रास कमी होईल....
स्वतःच्या सुखासाठी जगा.....
स्वतः खुश समाधानी रहाल तर दुसऱ्याला खुश ठेवाल....
आगोदर सुरूवात स्वतःपासून करा......