स्ञी म्हणजे एक अनुभूती,
स्ञी म्हणजे एक अलवार स्पर्श,
स्ञी म्हणजे तळमळतेची जाणिव
स्ञी म्हणजे मोहकतेचा सुगंध,
स्ञी म्हणजे एक सुंदर नजाकत
स्ञी म्हणजे मंञमुग्धतेचा बाज,
स्ञी म्हणजे स्वप्नातला सुंदर पारिजात...
स्ञी म्हणजे एक अलवार स्पर्श,
स्ञी म्हणजे तळमळतेची जाणिव
स्ञी म्हणजे मोहकतेचा सुगंध,
स्ञी म्हणजे एक सुंदर नजाकत
स्ञी म्हणजे मंञमुग्धतेचा बाज,
स्ञी म्हणजे स्वप्नातला सुंदर पारिजात...
तीच्या नजरेचा तीर घायाळ करतो,...
तीच्या ओठांवरची लाली हसू फुलवतात...
तीच्या मोकळ्या बटांमध्ये गुंततात मने....
तीच्या सौंदर्याच्या सुमनांनी विश्व तळमळे...
तीच्या ओठांवरची लाली हसू फुलवतात...
तीच्या मोकळ्या बटांमध्ये गुंततात मने....
तीच्या सौंदर्याच्या सुमनांनी विश्व तळमळे...
स्ञी नसते लाचार,
स्ञी एक आधार,
स्ञी शृंगार विश्वाचा
स्ञी कल्पनेपलिकडचा विचार....
स्ञी एक आधार,
स्ञी शृंगार विश्वाचा
स्ञी कल्पनेपलिकडचा विचार....
तीच्या वाणीत झिरपते ममत्वाची गोडी
तीच्या स्पर्शात असते आपलेपणाची आस...
तीच्या अस्तित्वात पसरतो एक मोहक सुगंध...
तीच्या रुपापेक्षाही अस्तित्वाची हवी असते साथ...
तीच्या नसण्याने जाणवते ,पोकळी घराघरात....
तीच्या स्पर्शात असते आपलेपणाची आस...
तीच्या अस्तित्वात पसरतो एक मोहक सुगंध...
तीच्या रुपापेक्षाही अस्तित्वाची हवी असते साथ...
तीच्या नसण्याने जाणवते ,पोकळी घराघरात....
सखी ....
तु एक सुंदर स्वप्न आहेस
तु एक आशा आहेस मनामनातील...
जप तु तुलाच ,तुझ्या स्वत्वातून
तुला संग आहे सुंदर विश्वाची...
विसर तुझे रंग रूप...
सदा हसू ठेव चेहेर्यावर...
तुझ्या घराचा उंबरठा उभा आहे ...
तुझ्या स्वाभिमान व कर्तृत्वावर....
नको हरूस कधीच...
उभी रहा.... पुरूषाच्या पाठिमागे...
त्यालाही बळ मिळेल जिंकेल तो सर्व आयुष्याची फासे....
तुझ्याशिवाय तो परिपुर्ण नाही...
त्याच्या आधाराची काठी ही तुझी परिपुर्णताच गं सई....

©®वैशाली देवरे..