Login

वुमेन्स डे स्पेशल

हा ब्लॉग इराच्या संजना मॅडमना समर्पित आहे लब यू डियर 'संज'
वुमेन्स डे चा विचार करत असताना ,फोन स्क्रोल करताकरता सुधा मूर्तींच्या मुलाखतीचा व्हिडिओ समोर आला.सुधा मुर्तींबद्दल जास्त काही सांगायची गरज नाही आहे.कारण आज त्या त्यांच्या कर्तुत्वाने आणि वैशिठ्य पूर्ण जीवनशैली अन् स्वभावामुळे सर्व जग परिचित आहेत. सुधाजीनी त्यांच्या वयाच्या सोळा सतराव्या वर्षी त्यांना इंजिनिअरिंगचे शिक्षण घ्यायचे आहे अशी इच्छा त्यांच्या वडिलांकडे व्यक्त केली.हा 1968चा काळ होता.त्यावेळी इंजिनियरिंगचे शिक्षण फक्त मुलांसाठी म्हणजे पुरुषांसाठी खुले होते.
आज मात्र ही मुलाखत ऐकताना अक्षरशः अंगावर रोमांच आले होते.आजची परिस्थितीचा विचार करता आज स्त्रियाना एकटीने बस किंवा रेल्वेने प्रवास करणे अवघड होऊन बसले आहे .प्रत्येक जीवनावश्यक गोष्टी मध्येही असुरक्षिततेची भीती जाणवत आहे.
विचार करा की दीडशे मुलां/पुरुषानं सोबत एकट्या मुलीने कॉलेज शिक्षण घेणे,कोणत्या दडपणा खालून जावे लागत असेल.आख्या कॉलेज मध्ये फक्त एकटीच मुलगी.किती तो स्वतःवरचा आत्मविश्वास ,किती ते स्वतःच्या ध्येय प्राप्तीसाठी हिम्मत एकवटवणे ,किती तो अदभुत प्रकारचा संघर्ष .एव्हढे सगळे टेन्शन डोक्यात न घेता सगळ्या मुलामध्ये पहिल्या रँकने पास होऊन दाखवणे...!!
मुलांच्या कॉलेजमध्ये एकही लेडीज टॉयलेट / बाथरूम नव्हते.कॉलेजला येण्या जाण्यासाठी सोळव्या सतराव्या वर्षा पासूनच त्यांना साडी परिधान करावी लागत होती.
आजच्या मुलींना याची जाणीव होऊ शकेल का.?
आजच्या मुलींना इंजियरिंग करणे किती सोपे आहे.काहीही मन मानेल तसा ड्रेस अप करणे,अव्यवस्थित जीवन शैली .आईवडिलांचा भरपूर आणि अनावश्यक खर्च.कशाला काही ताळमेळ ठेवण्याचा विचार करण्याची गरज आताच्या पिढीला नाही असे चित्र दिसून येते.त्या वेळे सारख्या अटी आताच्या मुलींना घातल्या तर...?
शिक्षणा बद्दलचा ध्यास,त्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग,मनाची एकाग्रता ,पक्का निश्चय आणि निष्ठा.अगदी शब्द कमी पडावेत असे त्यांचे व्यक्तिमत्व...!!

त्यांच्या वडिलांनी त्यांना जे जे प्रयत्न करता येतील ते सर्व करून मुलीच्या प्रगतीचे दार उघडे करून दिले.लागणारे सर्व बळ,आर्थिक आणि वैचारिक ,कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये याची प्रतेक दखल ठेवली.पुढे शिक्षण आणि त्यामुळे येणाऱ्या स्वावलंबी जीवनासाठी मदत ,शक्ती आणि पाठबळ पुरवले.ही तर फक्त सुरवात होती.परंतु पुढे वैवाहिक जीवनातही सुधाजीना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. अत्यंत विरुद्ध स्वभावाचा साथीदार मिळाला असला तरी प्रत्येक अशक्यतांना शक्यतेमध्ये बदलून टाकले.
स्वतःच्या दोन अपत्यांचे पालन पोषण ,त्यांच्याही प्रगतीची सर्व मार्ग सुरळीत पणे झाल्यानंतर सुधाजीनी स्वतःला साहित्य,पुस्तके,कथा कादंबऱ्या ,म्हणजे लेखन क्षेत्रा मध्ये व्यस्त केले.
कुठे ते सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे हव्यासी मन आणि कुठे साहित्य कथा कादंबऱ्यातील लेखन,दोन अगदी विरुद्ध टोकाचे दोन ध्रुव...कसे यशस्वी रीतीने पार केले आहे .
खरचं त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला सादर प्रणाम...!!

सर्व प्रकारच्या मदतीचा पुरवठा असूनही सर्व प्रकारच्या संघर्षांणा तोंड देणे हेच असते खरे स्त्रीत्व..!

'सिंधुताई सपकाळ .' अजून एक अद्भुत स्त्री व्यक्तिमत्व.
अगदी जन्मा पासून संघर्षाची साथ असलेली स्त्री.बुद्धीने तल्लख असूनही,उपजतच द्यान कौशल्य असूनही,शिक्षणाची प्रचंड इच्छा असूनही,शिक्षणा पासून वंचित राहावे लागले.अत्यंत खडतर सांसारिक कष्ट ,विचित्र नवरा.विचित्र परिस्थिती .भयंकर असा हलाखीचा जीवन प्रवास ऐकून अंगावर शहारे आल्या शिवाय राहत नाहीत...
प्रत्येक अशा स्त्रीसाठी एक डोळ्या समोरचा पुरावा आहे की,ज्या म्हणतात ' आम्ही आयुष्यभर कष्टमय जीवन जगले आहे.घरातील सासू सुनेची भांडणे,नवरा बायकोचे एकमेकां विरोधाचे वागणे,दैनंदिन जीवनातले छोटे मोठे संकटे.या सर्वांचा विचार करून मन सुन्न होते.ही कोणत्या प्रकारची अद्भुत स्त्री शक्ती होती असा विचार आल्या शिवाय राहत नाही.बालपणापासून शिक्षणाची आवड असूनही बिकट परिस्थिती मुळे शेवटपर्यंत शिक्षण घेताच आले नाही. आयुष्या मध्ये स्वतःच एक अनाथ म्हणून जगावे लागणार आहे हे सत्य स्वीकारल्या नंतर स्वतःच अनेक अनाथांची माय होण्याचे लक्ष साध्य करून दाखवणे.हे खरोखर विलक्षण आहे.त्यांची स्वरचित भाषणे आणि विचार, वाचनाचा ध्यास ,ऐकणाऱ्याला अवाक करून सोडतो.
फक्त आणि फक्त तू एक स्त्री आहेस ना मग जगून दाखव..प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दाखव...!!
म्हणतात ना ,एखादे बाळ जेव्हा जन्माला येतं,तेव्हा घरातले वडीलधारे लोक विचारतात.' बाळाची मूठ बंद होती ना.?' तसेच एखादी बाळ जर स्त्रीचा जन्म घेऊन येते तेव्हाच तिच्या मुठीत संघर्ष आणि संघर्षाचे बळ घेऊनच जन्मते.
म्हणूनच जीवन जगण्याच्या या संघर्षाला विविध क्षेत्रातील स्त्रियांनी त्यांचे मुख्य बलस्थान बनवल्याचे दिसून येते.
मनापासून नमन आहे .माईंच्या कार्याला.त्यांच्या जीवन प्रवासाला....!!
वुमेन्स डे च्या निमित्ताने थोर स्त्रियांचा गौरव करणे महत्वाचे आहे..!
पण आपण राहतो,त्या प्रत्येक ठिकाणी अगदी जवळपास ,आजूबाजूला नजर उघडुन बघा.सर्व सामान्य कुटुंबातून अनेक स्त्रिया दिसून येतील की,त्या त्यांच्या कौटुंबिक मर्यादेत राहूनही वैशिठ्य पूर्ण जगत आहेत.
अशीच एक मध्यम वर्गीय कुटुंबातील एक स्त्री.' साधना '.
बालपण आणि तारुण्य छान सुखात गेले होते.फार काही जास्त नसेल तरी काहीही कमी पडत नव्हते.इतर मुलांप्रमाणे तारुण्यात पदार्पण केल्या नंतर तिलाही नटण्या थटण्यात आवड निर्माण होऊ लागली होती.
मैत्रिणी सोबत ब्युटी पार्लर मध्ये जाणे आणि ब्युटीशियन तिचे काम कसे करते ,याकडे ती लक्ष पूर्वक बघत असायची.कालांतराने तिला समजून आले की, ब्युटीशियन
जे कौशल्याने करत आहे ते तिलाही उत्तम प्रकारे येऊ शकेल.आणि तिच्या या गोष्टीत असलेली आवड बघून मैत्रिणी तिला ब्युटी ट्रीटमेंट,थेरपी ,मध्ये करिअर कर असे म्हणायच्या.साधनाने तिची ही इच्छा घरात आई वडीलांना सांगितली ,आणि ब्युटीशियंचे काम हे काही फार आदरयुक्त आणि प्रतिष्ठेचे नाही असे वाटून त्यांनी तिला या बद्दलचे कोणतेही शिक्षण घेण्यास नकार दिला.पुढे लग्नानंतर संसाराचा पसारा वाढत होता.पण मनातील ब्युटीशियन बनण्याची इच्छा मात्र मनात तशीच होती. मुले शाळेत जायला लागली होती.आणि दिवस भरातला थोडासा वेळ ती स्वतःच्या छंदासाठी देऊ शकेल अश्या विश्वासाने तिने ब्युटीशियंचा डिप्लोमा पदरात पाडून घेतला खरा पण, भविष्या मध्ये याचा काहीएक फायदा होणारच नव्हता.साधनाच्या नवऱ्याला तिने कोणतेही काम करावे,कुठे जॉब नोकरी करावी,काहीही व्यवसाय करावा ,हे बिलकुल आवडणारे नव्हते.
साधनाला एका गोष्टीवर विश्र्वास होता की,एखाद्या गोष्टी मधील निपूनता तिला स्वस्थ बसू देत नाही.मग साधना घरातीलच स्त्रिया , आई,बहिणी,वहिनी,त्यांचे मुले मुली,मैत्रिणी,यांच्यावर तिचे कौशल्य बिना मोबदला उपयोगात आणयची.
काही वर्षे अशीच गेली.हळू हळू तिच्या मनातील सुप्त इच्छा कधी विलयास गेली हे तिलाही समजले नाही.
आणि 2019साल उगवले आणि करोनाने आख्या जगाला त्याच्या विषारी विळख्यात जखडून टाकले.सगळीकडे लागलेला लॉक डाऊन ,वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी दैनंदिन जीवनात निर्माण करून गेल्या.
कोणतेही शिक्षण कधी वाया जात नाही म्हणतात ना.तुमच्या मध्ये असणारे कौशल्य गरजेच्या प्रसंगी उपयोगात येऊ शकते.हे सांगता येत नाही.त्या काळात शाळा कॉलेजची मुले,सर्व सलून आणि पार्लर बंद असल्याने विचित्र केशभूषा होऊन घरात फिरताना दिसत होती.आणि मग इतक्या वर्षांनी साधनाने परत एकदा कात्री हातात घेतली.अन् घरातल्या ,जवळपासच्या मुलांचे हेअर कट व्यवस्थित करून दिले.
बघायला गेले तर ही किती साधीशी गोष्ट आहे.पण त्या अडचणीच्या काळात तिला मात्र तिचे कौशल्य कारणी लावता आले,याचा आनंद आणि अभिमान तिच्या मनाला सुखावून गेला...!
प्रत्येक स्त्री मध्ये काही ना काही कौशल्य तिच्या अंतः करणातल्या गुप्त कोषामध्ये दडपून ठेवलेले असते.काहीतरी निमित्ताने ते कौशल्य संधी शोधून सुंदर फुलपाखरा प्रमाणे बनून मुक्त उडायला मागत असते...!
आजकाल सोशल मीडिया वर आपण मधुरा रेसिपी किंवा सारिका किचन सारख्या चॅनेल ला आवडीने बघतो.मग एखादी स्त्री स्वतःच्याच कुटुंबामध्ये एखादा तिच्या आवडीचा पदार्थ बनवून कुटुंबातील सदस्यांना सर्व्ह करते तेव्हा ती देखील स्वतःला तिच्या छोट्या विश्वाची शेफ समजत असते.एखादी स्त्री जेव्हा तिच्या पर्सनल डाय रीमध्ये साध्या सोप्या शब्दात एखादी कविता लिहिते तेव्हा ती शांता शेळके,आणि कधी कथा कादंबऱ्यातून ती विजया वाड .या सारख्या लेखीकांची भावना मनातल्या मनात जगत असते.अशी अनेक उदाहरणे देता येतील.

आज जग झपाट्याने बदलू पाहत आहे.जागोजागी रोबोट फिरताना दिसणार आहेत." अमेका " या स्त्री रोबोटची
मुलाखती मध्ये तिला विचारण्यात आले होते की,' रोबोटाचे
' वाढते अस्तित्व मानवी जीवनावर काही आणि किती विपरीत परिणाम करतील.?' भविष्यामध्ये मानवी जीवनाला धोकादायक किंवा त्रासदायक होऊ शकेल का ?'
तेव्हा अमेकाने उत्तर दिले होते की,' मला तसे वाटत नाही.तर आम्ही मानवी जीवनावर विपरीत नाही तर उलट मदतीचा आणि प्रगतीचा हात द्यायला असणार आहोत." ..!तिचे असे उत्तर ऐकनाऱ्याला आश्चर्याचा धक्का का बसावा.?? अमेका ही जरी रोबोट असली तरी तिच्या पुढे स्त्री हा शब्द जोडला गेल्याने तिने " स्त्री रोबोट" ला साजेसेच उत्तर देणेच अभिप्रेत होते.
इतिहास सांगत आहे ,जगभरातील स्त्रियांनी पुरुष प्रधान संस्कृती विरुद्ध अनेक प्रकारचे लढे लढले आहेत.काळानुरूप स्त्रियांच्या जीवन पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल घडून यावेत असे थोर कार्य केले आहे.त्यामुळे स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रांमध्ये सहभागी होऊन स्वतःला साबित करता येऊ लागले आहे.या अनेक प्रकारच्या लढ्या मधून जाताना जगभरातील सशक्त ,सबला,ध्येयनिष्ठ,कर्तबगार स्त्रियांचे अविश्वसनीय यश साजरे करण्यासाठी हा आठ मार्च हा दिवस वुमेन्स डे म्हणून साजरा केला जातो.

पण आजची परिस्थीत बघता हा दिवस काहीतरी वेगळ्याच दिशेने भरकटत चालला आहे ही खेदाची गोष्ट आहे.स्त्रियांनी असे करून स्वतःच्या कृतीने स्वतःचा सन्मानाचे हसे करून घेतल्या सारखे आहे.
स्त्रियानो ,वुमेन्स डे या दिवसाचा खरा उद्देश आणि अर्थ समजून घ्या.याचा विचार करा.या दिवसाचे महत्व आणि माहिती करून घ्या.वाटल्यास गुगल सर्च करा.वाचा.आणि त्या सर्व महान स्त्रियांच्या कष्टाला.. श्रमाला..
त्याग आणि बलिदानाला असे वाया जाऊ देऊ नका.
आठ मार्च ,वुमेन्स डे सर्व जगभरातील स्त्रियांना आनंदाचा जावो.©® Sush.