Login

शब्द व्यापून उरे....

Word Is Found Everyvere

शब्द व्यापून उरे.....


शब्द अर्थासहित
शब्द अर्धा विरहित

शब्दांचं चांदणं
शब्दाने मांडणं

गुढ तरीही
परिचित
शब्दांची भाषा

शब्द बेभरवशाचा
शब्द भरवसा ठेवण्याजोगा

शब्दांनीच मांडावी
शब्दांची किमया

शब्दांनीच सांगावी
शब्दांची दुनिया

शब्द थेंबा एवढा
शब्द आकाश व्यापूनि उरे

शब्दच वसंत
आणि शब्दच शिशिर

शब्द इमानी होतो
तर कुठे बेईमान होतो

शब्दांची मिरासदारी
शब्दांनीच राखायची

वाक्यांच्या कोंदणात
शब्दांना जडवायचे

शब्दानीं सजवायची
साहित्याची पालखी

शब्दांची चकमक
नव्या साहित्याची मुहूर्तमेढ

शब्दांना शब्दांशिवाय
पर्यायच नाही

........ योगिता मिलिंद नाखरे