प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग,जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
शीर्षक:वर्क फ्रॉम होम भाग-१
"भाव्या, अगं ऐकलेस का?" महेंद्र तिला बोलवत त्यांच्या खोलीत आला.
"हा, बोला मी ऐकते आहे." ती आपल्या लॅपटॉपमध्ये काम करत बोलत होती.
"अगं मी बोलतोय आणि तुझे लक्ष नाहीये." नेहमी सारखी त्याने तक्रार केलेली होती.
"हो, मी ऐकते आहे. " तिने त्याच्याकडे बघत सांगितले.
"ते उद्या मामा आणि मामी येणार आहेत तर तू सुट्टी घे." तो तिच्यापासून अंतर राखून बाजूला बसत म्हणाला.
भाव्याचे काम हे वर्क फ्रॉम होम होते. कारण लग्नानंतर आपल्या आईवडिलांना नीट सांभाळावे म्हणून तिचा नवरा महेंद्र ह्याने काम करायचे असेल तर वर्क फ्रॉम होम असेल तरच कर असे सांगितले होते.
भाव्या खरं तर चांगल्या पदावर काम करत होती. तिला पुढे प्रमोशन सुद्धा मिळणार होते. त्यामुळे तिला काही नोकरी सोडायची नव्हती.
महेंद्रचे स्थळ चांगले होते म्हणून तिला तिच्या घरच्यांनी समजावले आणि ती लग्नासाठी तयार झाली.
तिला ऑफिसमध्ये खूप जणांनी ही नोकरी सोडू नको म्हणून सांगितले होते पण आपण पुन्हा नोकरी करू असा तिला विश्वास वाटत होता म्हणून चांगली नोकरी प्रकारे तिने सोडले होती.
महेंद्रचे आपल्या आई-वडिलांवरती खूप प्रेम होते आणि आता सून आल्यावर आपल्या आईने जास्त काम करायला नको म्हणून त्याने तिला घरातूनच एखादे काम करायचे असेल तर ते कर असे सांगितले होते.
भाव्याने आपली चांगली नोकरी सोडली आणि महेंद्र सोबत लग्न करून संसाराची सुरुवात केली.
दोन-तीन महिने एकमेकांना समजण्यात आणि सर्व सासरच्या गोष्टी शिकण्यातच गेले. त्यातच येणारे सणवार यामुळे आपल्याला सारखी सुट्टी घेता आली नसती आहे तिने विचार केला होता आणि आपण नोकरी सोडली हे बरे केले असे त्यावेळी तिला वाटत होते.
महेंद्र आणि त्याचे आई वडील सुद्धा ती आपलं ऐकते आणि बाकी सर्व काम सुद्धा चोखपणे करते म्हणून त्याची सुद्धा त्याबद्दल काहीच तक्रार नव्हती.
महेंद्रने बघितलेले होते की त्याचे जे मित्र होते ते नेहमी त्यांच्या बायको आणि आईमध्ये होणाऱ्या नोकरीवरून आणि घरातील कामावरून भांडणाविषयी सांगायचे म्हणूनच त्याने असे आपल्या घरी होऊ नये असा विचार केलेला होता.
आपल्या घरी सून आल्यावर ती सुद्धा आपल्या आईने सुनेसाठी सकाळी लवकर उठून डबा करणे हे काही त्याला पटत नव्हते आणि आता आपल्या आईचे वय सुद्धा झाल्यामुळे तिला जमणार नाही ह्या विचाराचा तो होता.
खरंतर कोणतीही गोष्ट असेल तर तर त्यावर उपाय शोधले जातात परंतु आपल्या आई-वडिलांवरचे प्रेम यामुळे त्याने भाव्याच्या मनाचा विचार केला नव्हता.
लग्न झाल्यानंतर नोकरी सोडून तीन ते चार महिने झाल्यावर भाव्याला मात्र सर्व काम आटोपल्यानंतर करमत नव्हते. कारण शिक्षण झाल्यावर तिच्या हुशारी वर लगेचच तिला नोकरी प्राप्त झाली होती आणि असे आपण शांत बसणे हे काही तिला पटत नव्हते.
महेंद्रच्या आई वडिलांचा स्वभाव बोलका असल्याने त्यांच्या घरी कोणी ना कोणी नेहमीच राहायला यायचे. त्यामुळे पाहुण्यांचे येणे जाणे सुद्धा असायचे.
येणारे पाहुणे सुद्धा भाव्या किती चांगली आहे आणि उच्चशिक्षित असून सुद्धा सर्व काम करते यावरून आपल्या सुनांना घरी जाऊन बोलायचे.
त्यामुळे काही स्त्रियांमध्ये भाव्याबद्दल ईर्षा निर्माण झाली होती. तसेच काही तर तिला एवढी शिकून सुद्धा घरी आहे यावरून तिच्या माघारी टोमणे सुद्धा मारायचे.
भाव्याला हे सर्व माहीत होतं पण तिने त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. तसेच ती वर्क फ्रॉम होम असणाऱ्या कंपन्या याबद्दल माहिती करून तिथे अर्ज करून नोकरीसाठी प्रयत्न करत होती.
तिला मात्र ह्यात सुरुवातीला काही यश मिळत नव्हते. तसेच ऑफिसमध्ये जाऊन काम करण्यासाठी जर तिने आता सुद्धा विचार केला असता तरीही तिला लगेच तिच्या अनुभवावरून नोकरी प्राप्त झाली असती पण त्यासाठी सर्वांचा नकार बघून तिला वाईट वाटत होते. शेवटी तिला वर्क फ्रॉम होम करणारे काम प्राप्त झाले.
क्रमशः
भाव्या पुढे काय करेल?
© विद्या कुंभार
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
फोटो सौजन्य साभार: गुगल/ मेटा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा