Login

वर्क फ्रॉम होम...! | भाग २ | अंतिम

वर्क फ्रॉम होम करणाऱ्या मुलाची थरकाप उडवणारी भय कथा...!
वर्क फ्रॉम होम...!

भाग २

"सर, हा आयडी तर काही महिन्यांपूर्वीच डिलिट केला गेला आहे. हा आयडी नक्की कोण आणि कोठून वापरत आहे हे आम्ही माहीत करून घेतो आणि तुम्हाला मेसेज करून कळवतो. तो पर्यंत ह्या आयडी वरून तुम्हाला येणारे मेल आम्ही ब्लॉक करतो."
त्या व्यक्तीने इतकं बोलून फोन ठेवून दिला.

आपले काम झालं असा समजून तो पुन्हा कीबोर्डला हात लावायला जाणार तोच त्याला कीबोर्डची बटने स्वतःहून दाबली जात असल्याचं आणि स्क्रीनवर माऊसचा कर्सर स्वतःहून फिरत असल्याचं जाणवू लागलं. आणि अचानक त्याच्या मागे त्याला काही तरी पडण्याचा आवाज आला म्हणून त्याने मागे बघितले तर, किचनमध्ये ग्लास पडला होता. त्याने पुन्हा पुढे बघितले तर, आता सगळं ठीक होतं.  झोपेमुळे त्याला भास होत आहेत असं त्याला वाटले.

त्याने पुन्हा कामाला सुरुवात केली आणि सोबतच त्याच्या मेसेजची वाट बघू लागला. त्याला माहित करून घ्यायचं होतं की, त्याला त्रास देणारी ती व्यक्ती कोण होती?

तो विचार करत असतानाच त्याच्या फोनमध्ये मेसेज आला. त्याने तो मेसेज उघडला. तो मेसेज त्यांचाच होता. तो मेसेज बघून त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्यावर अँक्टिव्ह पर्सनच नाव तेच सागर देसाई होतं आणि लॉगिन केलेला ऍड्रेस तोच होता जिथे सोहम आता राहत होता. पुढे तो काही विचार इतक्यात अचानक त्याच्या खोलीची लाइट गेली आणि सर्वत्र अंधार पसरला.

सोहमला आता थोडी थोडी भीती वाटू लागली. तो फोनमध्ये बघत असतानाच त्याला त्याच्या खांद्यावर कोणाची तरी थंड पकड जाणवली. तो त्या स्पर्शाने घाबरून गेला. त्याने भीतीने हळू हळू मागे वळून पाहिले तर मग कोणीच नव्हते. तो जागेवरून उठून मागे बेडवर जाऊन बसला. त्याने हे सगळं सांगायला त्याच्या वरिष्ठांना फोन लावला. पण, त्यांचा फोन काही लागत नव्हता म्हणून त्याने सर्व माहिती सांगणारा एक मेसेज त्यांना सेंड केला.

तो मेसेज करताच त्याला अचानक कीबोर्डच्या बटनांचा आवाज येऊ लागला. त्याने मान वर करून बघितले तर समोर कॉम्प्युटरची स्क्रीन चालू झाली होती. खोलीत लाईट गेली होती तरी, समोर कॉम्प्युटर चालू होता हे बघून त्याच्या अंगाचा थरकाप उडाला. त्याला दरदरून घाम फुटला. तो भीती दत्तक नजरेने समोर एक टक बघू लागला. तो बघत असताना अचानक स्क्रीनवर त्याला व्हिडिओकॉलच्या पॉपअपचा जोर जोरात आवाज येऊ लागले.

तो आवाज असह्य झाल्यामुळे तो घाबरतच कॉम्प्युटर जवळ गेला आणि त्याने टेबलवर असलेला हेडफोन कानाला लावला. तो कानाला लावताच समोर स्क्रीनवर कॉल उचलला गेला. आणि त्याला संपूर्ण स्क्रीन काळी दिसू लागली. त्या बाजूला नक्की कोण आहे हे त्याला समजेना झाले. म्हणून तो तसाच कानाला हेडफोन लावून चेहरा स्क्रीनच्या जवळ घेऊन गेला. आणि जवळून स्क्रीन मध्ये बघू लागला तेव्हा त्याला अचानक हेडफोन मध्ये एक विकृत आवाज आला,"मी अजून ही इथेच आहे..." त्या आवाजाला तो काही बोलणार इतक्यात समोरच्या काळया स्क्रीन मधून अचानक एक विचित्र भयानक चेहरा समोर आला आणि ते बघून तो अतिशय घाबरून जोरात किंचाळला. आणि संपूर्ण स्क्रीन ब्लँक झाली...!

सोहमचा मेसेज वाचून त्याच्या वरिष्ठांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला,"हा, तर तोच आहे... ह्या सागर देसाईचा तर, वीस दिवस आधीच त्याच ठिकाणी मृत्यू झाला आहे. शीट , माला ही आधी का लक्षात नाही आले... आणि सोहम पण आता तिथेच राहतोय ह्याचा मेल सोहमला कसा काय येतोय ते ही त्याचं जागेवरून नक्कीच काही तरी गडबड आहे."
ते स्वतःशीच म्हणाले आणि सोहमला फोन करू लागले. पण तो काही फोन काही लागत नव्हता. ते घाईतच त्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले. पण, तिथे पोहोचून त्यांना समजले की, त्यांना तिथे पोहोचायला उशीर झाला होता.

समाप्त.

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
0

🎭 Series Post

View all