Login

विश्वनियंता

God Is Doing Everything
हे आगाधविश्व आहे तुम्हा पुढे
का नकारात्मकतेने जिथे तिथे पाहता
सुख छोटे दुःख मोठे
सोडून द्या हे सारे, पहा पहा विश्वाचे रूप न्यारे न्यारे


ही पृथ्वी आपली माता,
हे गगन आपुले पिता
सागर नदी नाले झाडे वनराई सारे सारे
आपल्याला सर्व काही देतच राहती

फुलवेली - लता कुंज मोहक किती
आपल्याच तालात निर्झर वाहती
धबधबे जोरजोराने उडी मारती
का तुम्हा न दीसे यातील सौंदर्य यातील गाणे

आंबा फणस चिकू पेरू अननस पपनास केळी
किती किती मधुर फळांची ही रांग लागली
ती चाखतानाही तुम्ही का आसवे गाळली
पोळी भाजी आमटी भात चटणी कोशिंबीर
सुग्रास अन्नालाही तुम्ही नावे ठेवली

जिथे तिथे केला तुम्ही विश्व नियंत्र्याचा
परोपरीने अवमान
शरण त्यास जाऊनी म्हणा
देवा तुझी सृष्टी खूप सुंदर आहे
आणि ती खरोखरची सुंदर सृष्टी
बघायला मला बळ दे

" हे विश्वाचे आंगण
सर्व जीवांसाठी आहे आंदण
या सृष्टीच्या दर्पणी
एक सुंदर रम्य कहाणी "

....... योगिता मिलिंद नाखरे