Login

लेखकांनी भयमुक्त होऊन आपले विचार समाजासमोर मांडायला हवे.अणि परिवर्तनाची सुरुवात आपल्या स्वतापासुन करायला हवी.

लेखकांनी भयमुक्त होऊन आपले विचार समाजासमोर मांडायला हवे.अणि परिवर्तनाची सुरुवात आपल्या स्वत?

लेखकांनी भयमुक्त होऊन आपले विचार समाजासमोर मांडायला हवे अणि परिवर्तनाची सुरुवात आपल्या स्वतापासुन करायला हवी.
   
  आज आपण प्रत्येक जण म्हणतो की परिवर्तन ही काळाची गरज आहे.अणि आपण नेहमी हे ऐकत आलो आहे की परिवर्तन हे घडायलाच हवे.परिवर्तनाशिवाय नवनिर्मिती ही घडुच शकत नाही.पण जेव्हा हेच परिवर्तन आपल्याला आपल्या स्वतामध्ये घडवण्याची वेळ येते.तेव्हा आपल्याला ते अजिबात मान्य होत नाही.कारण आपल्याला जुन्या प्रथा,परंपरा,रीतीरीवाज यांना धरुन चालण्याची आज इतकी सवय झाली आहे की त्यात कोणी थोडाही बदल करु पाहिले तर लोक त्याला वेडा म्हणतात.अक्षरश त्याला वेडयाच्या गणतीत गणले जाते.की हा काय वेडेपणा लावला आहे याने?
   अशाच एक वेडयाच्या गणतीत आज मी ही आलो आहे.कारण मी ह्या नवीन वर्षानिमित्त स्वतामध्ये एक बदल केला आहे की मी इथुनपुढे माझ्या नावापुढे पालक म्हणुन वडिलांचेच नाव न लावता आधी आईचे नाव लावणार कारण आज मी जे जग बघतो आहे ते तिच्यामुळेच.म्हणुन मी आधी माझ्या नावाच्या पुढे पालक म्हणुन माझ्या आईचे नाव लावणार आहे.मग मी वडिलांचे नाव पालक म्हणुन लावणार अणि मग त्यानंतर आडनाव लावणार आहे.
   आता काही जण काय करतात की ज्यांना वडिल नसतात ते पालक म्हणुन आपल्या आईचे नाव लावतात.अणि ज्यांना वडिल आहेत ते फक्त वडिलांचे नाव पालक म्हणुन लावतात.ही आजकालची फँशन झाली आहे.अणि ही जुनी प्रथा आहे.जी आपण वर्षानुवर्ष पाळत आलो आहोत.ज्यात आता बदल घडुन येणे गरजेचे झाले आहे.कारण जर आईवडिल हे दोघे मिळुन आपल्या मुलांचे संगोपन करतात.मग पालक म्हणुन आपण आपल्या नावापुढे फक्त वडिलांचेच नाव का लावतो?दोघांचेही नाव पालक म्हणुन का लावत नाही?हा प्रश्न समाजापुढे मांडण्यासाठी मी हा बदल करायचा ठरवला आहे.
   म्हणुन मी नवीन वर्षानिमित्त स्वतामध्ये हा एक वेगळा बदल केला आहे.की इथुनपुढे मी पालक म्हणुन माझ्या नावापुढे फक्त वडिल किंवा आई असे यांचे नाव असे न करता मी दोघांचे नाव पालक म्हणुन माझ्या नावापुढे लावणार आहे.
   परिवर्तन काळाची गरज आहे असे म्हणुन एका दिवसात कधीच परिवर्तन घडुन येत नाही.त्यासाठी आपल्याला स्वतापासुन त्याची सुरुवात करावी लागते.अणि त्यासाठी योग्य ती पाऊलेही उचलावी लागतात.फक्त हेच मी माझ्या ह्या कृतीतुन सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
   म्हणुन आपण सगळयांनीही हा बदल आत्मसात करावा अणि परिवर्तनाची सुरुवात स्वतापासुन करायला लागावे.असे मला मनापासुन वाटते.कारण परिवर्तन हे कधीही समाजात घडवण्याची गरज नसते.कारण ते जर आपण आपल्या स्वतामध्ये घडवुन आणले तर समाजातही ते आपोआप घडुन येते.फक्त लोकांना त्याचा स्वीकार करायला थोडा वेळ लागतो एवढेच.
  कारण प्रत्येकाची मानसिकता ही सारखी नसते.कारण काही जण बदल हा लगेच स्वीकारतात तर काही जण तो मान्य न करता त्याला विरोध करायला लागतात.हा सगळयात मोठा दुर्गण आपल्या समाजव्यवस्थेचा आहे की ते परिवर्तन काळाची गरज आहे हे तर मान्य करतात पण जेव्हा तेच परिवर्तन स्वतामध्ये घडवायची वेळ येते तेव्हा ते त्यांना मान्य नसते.ते त्याला नेहमी विरोधच करतात.म्हणुन परिवर्तन काळाची गरज आहे हा शब्द फक्त कागदावरच लिहायला अणि सुविचार म्हणुन फळयांवर वाचायला मिळतो.कारण लोक ते मान्य करायला सहसा तयार होत नाही.
  पण कोणतीही नवीन गोष्ट अंमलात आणायचे म्हटले तर आधी लोक तुम्हाला विरोध करतील, त्रास देतील,हसतील हे साहजिकच आहे.पण तेच लोक एकेदिवशी तुमच्या घेतलेल्या निर्णयाचा स्वीकारही करतात.ही जगाची रीतच आहे.म्हणुन लेखकांनी भयमुक्त होऊन आपले विचार समाजासमोर मांडायला हवे.मनात कोणतीही भीती न बाळगता.कारण बहुतेक लेखक हे सामाजिक रोष सहन करावा लागण्याच्या भीतीने आपल्या लिहिण्यावर बंधन ठेवतात.म्हणून त्यांना पाहिजे तसे मनमोकळे सत्य समाजासमोर मांडता तसेच लिहिता येत नाही.ही खुप मोठी समस्या आपल्या साहित्य क्षेत्रात आपल्याला पाहावयास मिळते आहे.
  म्हणुन सर्व लेखकांनी भयमुक्त होऊन साहित्य निर्माण करावे डोळयांना दिसते मनाला जे भावते,जाणवते ते सत्य आपल्या लेखणीतुन समाजासमोर स्पष्टपणे मांडावे.अणि परिवर्तनाची सुरुवात आपल्या स्वतापासुन करावी.
  एवढेच मी आपणा सर्व साहित्य प्रेमींना,लेखक,साहित्यिकांना स्वामी विवेकानंद अणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सांगु इच्छितो.
  
  
  

0