चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
कथेचे शीर्षक – या चिमण्यांनो परत फिरा रे.
“विद्या, काय करते आहेस?” तिच्या नवऱ्याने, विनोदने विद्याला विचारले.
“आज भूतकाळाला कुरवाळत बसले आहे."
आनंदची लहानपणीची खेळणी विनोदला दाखवत म्हणाली.
आनंदची लहानपणीची खेळणी विनोदला दाखवत म्हणाली.
आनंद काही वर्षापूर्वी बाहेरगावी सेटल झाला होता. एकुलता एक मुलगा होता. खरं तर आज त्याचा वाढदिवस होता. तीस वर्षांपूर्वी हाच दिवस होता, तेव्हा विद्या आई झाली होती. आईपणाचा प्रवास सुरू झाला होता. तो आला आणि सगळं आयुष्यच बदलून गेले. आता फक्त स्वतःचा विचार न करता आनंदचाही विचार करू लागली.
“विद्या, तुला आठवतं, जेव्हा मला कामावरून काढलं, तेव्हा काय परिस्थिती झाली होती.” तो तिच्या बाजूला बसतच म्हणाला.
“विद्या, तुला आठवतं, जेव्हा मला कामावरून काढलं, तेव्हा काय परिस्थिती झाली होती.” तो तिच्या बाजूला बसतच म्हणाला.
“ते कसं विसरणार मी? खूप चांगल्या पद्धतीने आठवतं. आनंद झाला आणि सहा महिन्याने तुम्हाला कामावरून काढलं. किती निराश झाला होता. तुमचा तो उतरलेला चेहरा आजही लक्षात आहे.”
“विद्या, जेव्हा बॉसने येऊन सांगितले की, मला कामावरून काढून टाकले आहे, तेव्हा डोळ्यांसमोर अंधारी आली. तुझा, आनंदचा आणि आई बाबा सर्वांचा चेहरा डोळ्यासमोर आला. कसं होणार? काय होणार? काहीच सुचत नव्हते. अंगातून जीव निघून गेल्यागत झाले होते. तेव्हा तू माझा आधारस्तंभ झाली. दुसऱ्या दिवशीच मुलाखत द्यायला गेली आणि नशीब चांगले की, तू सिलेक्ट देखील झाली.”
“तिथे सिलेक्ट झाली आणि इथे आनंदपासून दूर झाली ह्याचेही कायम वाईट वाटत राहिले.”
“मला माहीत आहे विद्या, तू बोलत जरी नव्हती, पण तुझ्यातील आई मात्र रोज हळवी व्हायची. तेव्हा असं वाटायचे वडील, नवरा म्हणून मी कमी पडतोय.”
“नाही हो, तुम्ही देखील चांगली नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करतच होता की, पण काही केल्या नोकरी मिळत नव्हती.”
“विद्या, तू नेहमीच मला समजून घेतलं. आपल्या विस्कटलेल्या संसाराची घडी तूच नीट बसवली.”
“ते माझं कर्तव्य होतं, पण खरं सांगू का संसाराची घडी बसवत असताना मी आनंदला वेळ देवू शकले नाही, आई म्हणून मी त्याला वेळ द्यायला हवा होता, पण तसं झालं नाही. तुम्हाला नोकरी लागली पण, घराचे हफ्ते, घरखर्च, शाळेची फी सगळा खर्च वाढत चालला, मला कल्पना आली होती. काहीही झालं तरी आनंदच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला तजवीज करावी लागणारच होती, मी नोकरी सोडली नाही.
आई बाबा आनंदला किती जीव लावायचे, वर्षभरात दोघेही गेले, खऱ्या अर्थाने आपण एकटे पडलो. त्यांचा खूप आधार होता, असं काही होईल वाटलं देखील नव्हतं.” तिने अलगद अश्रु टिपले.
आई बाबा आनंदला किती जीव लावायचे, वर्षभरात दोघेही गेले, खऱ्या अर्थाने आपण एकटे पडलो. त्यांचा खूप आधार होता, असं काही होईल वाटलं देखील नव्हतं.” तिने अलगद अश्रु टिपले.
“खरंच विद्या, आई बाबा गेल्यावर पोकळी निर्माण झाली. आनंद तर आई बाबांची वाट बघत बसायचा. त्याला वाटायचे की, ते पुन्हा येतील. त्या लहानग्या जीवाला काय माहीत होतं की, त्याचे आजी आजोबा नेहमीसाठी दूरदेशी गेले आहेत. त्याला डे केअरमध्ये घातले, ते त्याची नीट काळजी घेतील का? खूप सारे प्रश्न होते.”
“मला तर कधी एकदा त्याला बघते असे झाले व्हायचे, ऑफिस सुटलं की भरभर पावलं टाकत घरी यायचे. तो देखील मला बघितलं की, पळत यायचा आणि मिठी मारायचा.”
हे बोलत असतांना तिला कोणीतरी मिठी मारली.
हे बोलत असतांना तिला कोणीतरी मिठी मारली.
तिने मागे वळून पाहिले बघते, तर आनंद होता.
दोघेही खूश झाले.
दोघेही खूश झाले.
“आनंद, तू येणार होतास ते सांगितले नाही? असा अचानक आलास?”
“हो आई, तुला आणि बाबांना सरप्राईज द्यायचे होते आणि काय गं आई, तू कधीपासून इतकी इमोशनल व्हायला लागली? तू तर किती प्रॅक्टिकल विचार करणारी आहेस. तूच मला सांगायची ना की, आई ऑफिसला गेली तर रडायचे नाही, तू एका स्ट्रॉंग आईचा मुलगा आहेस. तू कायम माझा आदर्श राहिली आहेस.”
तिने डोळ्यातील अश्रु पुसले.
“आज तुझा वाढदिवस म्हणून मन हळवं झालं, पण बरं झालं तू आलास. तुझी खूप आठवण येत होती.” विद्या म्हणाली.
“मलाही तुझी आणि बाबांची खूप आठवण येत होती, असं वाटत होतं कधी एकदा तुम्हाला बघतो आहे.”
त्याने बाबाला मिठी मारली.
“बाबा, कसे आहात?”
“एकदम मस्त. तू कसा आहेस?"
“कसा दिसतोय?”
“एकदम हॅंडसम.”
“बरं एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे.” आनंदने गंभीर चेहरा केला.
“काय महत्वाची गोष्ट?” विनोद म्हणाला.
“आई बाबा, आता हे घर सोडावे लागणार आहे.”
“का पण?” विनोदने विचारले.
क्षणभर त्याने विद्या आणि विनोदच्या डोळ्यात पहिले.
दोघांचे चेहरे गंभीर झालेले पाहून, तो जोरजोरात हसू लागला.
दोघांचे चेहरे गंभीर झालेले पाहून, तो जोरजोरात हसू लागला.
“आई बाबा, इतकं गंभीर व्हायची गरज नाही. आपल्या बाजूच्या विंगमध्ये जो थ्री बीएच के फ्लॅट आहे, तो मी विकत घेतला आहे आणि आपण तिथेच शिफ्ट होणार आहोत.”
“आपण?”
“हो आपण, आई बाबा आता मला तुमच्यासोबतच रहायचे आहे. तिथे खूप एकटं एकटं वाटतं आणि आई जसं तुला वाटतं की तू मला वेळ देवू शकली नाही तसंच मलाही वाटतं. आई किती जरी प्रॅक्टिकल विचार केला, तरी आपल्या माणसांसाठी मन हे हळवं होतं. आयुष्य खूप लहान आहे असं वाटतं, वयाची तीस वर्ष कधी निघून गेली कळलंच नाही. हातातून काही तरी मौल्यवान सुटत आहे असंच वाटतं. मी माझ्या कंपनीसाठी इथूनच काम करायचे ठरवले आहे. मला तुझ्यासोबत आणि बाबाससोबत वेळ हवा आहे. आज मी जे काही आहे ते केवळ तुमच्यामुळे, तिथे मला कसल्याच गोष्टीची कमी नाही, खूप पैसा आहे. सगळं छान आहे, पण तिथे तुम्ही नाही. मला तुम्ही हवे आहात. ”
आनंदचा निर्णय ऐकून दोघेही खूश झाले.
“विद्या, आता तरी तू खूश आहेस ना?”
“हो, खूपच. जे राहून गेले आहे ते पूर्ण करणार. आईपणाचा प्रवास पुन्हा नव्याने अनुभवणार.”
ती आनंदाच्या गालावर प्रेमाने हात फिरवत म्हणाली.
ती आनंदाच्या गालावर प्रेमाने हात फिरवत म्हणाली.
समाप्त
अश्विनी ओगले
अश्विनी ओगले
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा