Login

या सुखानों या ( भाग-२अंतिम)

तीन भावांची कथा
#कौटुंबिक कथा
ईरा स्पर्धा

शीर्षक:- या सुखानों या

भाग-२ (अंतिम)

मागील भागात:-

रागिनीही श्रीधरला म्हणजे तिचे मोठे भावजी यांना आठवत सांगते

"मला तर अपशकुनी म्हणायचं सारं गावं, पण मोठे भावजी कधीच मला तसे म्हणाले नाहीत. माझे बाबा माझ्या लग्नाच्या काळजीत झुरत असायचे. तेव्हा तेच होते जे नेहमी त्यांना धीर द्यायचे. जेव्हा मी अपशकुनी म्हणून लग्नास तयार नव्हते तेव्हा त्यांनी श्रमिकसोबत माझं लग्न लावून दिलं. माझ्या मनात त्याविषयी शंका होती. भिती होती की माझ्यामुळे यांना , घरच्यांना त्रास नको व्हायला. माझ्या अपशकुनाची सावली नको पडायला. तेव्हा भाऊजीनी किती छान समजावल होतं. अगदी एका लहान बहिणीसारखं जवळ घेऊन मायेने सांगितलं. म्हणाले बेटा, शकून अपशकून असे काही नसतं गं. ते आपल्या मनाचे खेळ असतात. चांगले कर्म शकून आणि वाईट कर्म अपशकून. तेव्हा तुझ्या मनात हे असलं काही आणू नकोस, तू आमच्या घरची लक्ष्मी होणार आहेस मग सांग लक्ष्मी अपशकूनी असते का? काय बोलणार मी यावर . बोहल्यावर चढल्यावरही लोक अजून एकदा विचार करा बोलत होते पण त्यांनी कोणाचे ऐकले नाही. श्रमिकलाही लोकांनी सांगितले पण त्यांना त्यांच्या दादावर विश्वास होता. ते जे करतात ते चांगलेच करतात. मग काय या घरात आले आणि कधी इथे रूळत गेले कळले पण नाही."

"हो ना, पण मला हे कळले नाही की तुला असे का वाटतं की दादा शिल्पाताईंनी लग्न करतील?" निता म्हणाली.

रागिनी हातातील डायरी व एक फोटो दाखवत म्हणाली," हे बघा. मी त्यांच्या रूममध्ये साफसफाई करत होते तेव्हा टेबल साफ करताना ही डायरी खाली पडली. त्यातून हा फोटो.ते पाहून मला कळले. माफ करा, कोणाची पर्सनल गोष्ट वाचू नये पण मला राहवलं नाही म्हणून मी वाचलं तर त्या भावजी व शालूताई यांच एकमेकांवर खूप प्रेम आहे. कर्तव्य आणि जबाबदारीमुळे ते व्यक्त होऊनही लग्न करू शकले नाहीत. आता या वयात कसे करणार म्हणून संकोचून सांगत नाहीत. मग आता सांगा."

"आपण एक काम करू सगळं ठरवून दादाला सरप्राईज देऊ काय? शालूवहिनी हे सर्व सांगू. तिला तर सर्व माहिती आहेच मग काय म्हणता." सुजय विचार करून म्हणाला. 

सगळ्यांना पटले. "ये भाई, मंजूला बोलवू आधी ती बरोबर दादाला राजी करेल, आपलं जर नाही ऐकलं तर तिला पुढे करू." श्रमिक म्हणाला.

सर्व सहमत झाले. सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन झोपी गेले. रात्रीचं त्यांनी मंजूला फोन करून सांगितले होते त्यामुळे ती सकाळी लवकरच इकडे आली होती. तसेच त्यांनी शालिनीचाही होकार मिळवला. ती अगोदर नकार दिला पण तिलाही मनात श्रीधर आधीपासूनच होता म्हणून तिने दुसऱ्या कोणाशी लग्न केले नव्हते. ती नंतर आनंदाने तयार झाली.

सगळे एका देवीच्या मंदिरात लग्नाची तयारी करत होते. श्रीधरला त्यांनी दुपारी बारानंतर मंदिरात ये, तुझ्यासाठी खूप छान सरप्राईज आहे असा निरोप सांगितला होता.

दुपारी बारा नंतर श्रीधर मंदिरात पोहोचला. सगळे तिथे जमा झालेले. मंजू व लग्नाची तिथे पाहून त्याला आश्चर्य वाटलं. "लाडो, तू कधी आलीस? आणि हे सगळं काय आहे? कोणाचं लग्न आहे का?  " तो इकडेतिकडे बघत म्हणाला.

"दादा, सगळं सांगतो आम्ही आधी हे कपडे घालून पटकन तयार होऊन ये, बरं." मंजू एक कपड्याची बॅग देत म्हणाली.

तो मंजूला प्रश्नार्थक नजरेने बघत तयार व्हायला गुपचूप निघून गेला कारण तिने खूपच तगादा लावला असता असही तो तिची कोणतीच गोष्ट शक्यतो टाळत नसायचा.

तो तयार होऊन आला तसे सगळे एका ओळीत उभे होते. मंजू म्हणाली, " दादा, तू आमच्यासाठी खूप काही केलेस. आमच्यासाठी या सुखानों या म्हणत आहेस नेहमीच आता आमची पाळी तुझ्यासाठी या सुखानों या म्हणायची. या सुखाला डावलू नकोस प्लीज. "
सगळे एक साथ सरप्राईज असे म्हणत बाजूला झाले आणि पाठीमागून नववधू वेशातील शालिनीला पाहून त्याला सुखद धक्का बसला. तिला पाहून काय बोलावं , कसं व्यक्त व्हावं हेच त्याला कळेना. आपलेच हे भाऊ जे सख्खे नसून सावत्र होते. त्यांनी आपल्या आनंदाचा विचार करावा ही गोष्ट त्याच्या भ
मनाला खूपचं भावली. त्याच्या डोळ्यांत खळकन पाणी जमा झाले.

तेवढ्यात ते सर्व म्हणाले," दादा, नको आता नको कुणाचा विचार करूस. बाकी काही विचार करू नकोस, तुझे सुख तुझ्या समोर आहे, आनंदी राहा. जस तू आम्हाला आनंदी सुखात ठेवलेस. आमच आनंद सुख पाहिलेस तसेच आम्हालाही तुझे सुख, तुझा आनंद पाहायचा आहे."

तो काही न बोलता तयार लग्नाला तयार झाला. देवाच्या साक्षीने लग्न आनंदाने पार पाडलं. सगळे एकत्र येऊन म्हणाले,"या सुखानो या."

समाप्त:-
चांगले कर्माने चांगलेच घडते.भलेही त्याचे फळ उशीरा मिळते पण चांगले मिळते.