चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलदकथा फेरी
जलदकथा फेरी
कथेचे नाव - या वळणावर ( भाग ३ )
मयुरी तीन तासांमध्ये पुण्याला काकाच्या घरी पोहचली. ती घरी आल्यामुळे तिचे काका, काकू आणि ऐश्वर्यादीदीला खूप आनंद झाला. थोडया वेळाने नाशिकवरून मयुरीची आत्या आणि तिची लेक स्पृहा देखील आल्या. स्पृहा सगळ्यांत लहान असल्याने दोन मोठ्या दीदींमध्ये ती सारखी लुडबुड करत होती. मयुरी तिचे खूप लाड करत बसली होती. काही वेळाने ऐश्वर्याचे मामा-मामी, त्यांचे दोन मुलगे तसेच धाकटी मावशी आणि तिची मुलगी रिद्धी आले. आता लग्नघर भरल्यासारखे वाटत होते. रात्री संगीतचा कार्यक्रम असल्याने मयुरीच्या काकूने दुपारचे जेवण लवकर आवरले आणि जबरदस्तीने ऐश्वर्या, मयुरी आणि स्पृहाला विश्रांती घेण्यासाठी ऐश्वर्याच्या बेडरूममध्ये पिटाळले. तितक्यात ऐश्वर्याला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा वरूणचा फोन आला. ऐश्वर्या थोडे लाजत, थोडे लाडात येऊन तिच्या नवऱ्याशी बोलत राहिली. झालं! जिजूंच्या फोनमुळे तिघींनाही आराम मिळाला नाही.
संध्याकाळी चार वाजता पार्लरवाली आली आणि तिने ऐश्वर्याचा मेकअप करायला सुरुवात केली. बाकीच्यांनी देखील आवराआवरी करायला सुरुवात केली. ठीक सात वाजता सगळे संगीतच्या कार्यक्रमासाठी हॉलमध्ये पोहचले. वरुण त्याच्या कुटुंबासहित आधीच पोहचला होता. काही वेळाने ऐश्वर्या आणि वरुण गाण्यावर ताल धरत, नाचत-नाचत स्टेजवर गेले.
"विल यू मॅरी मी?" स्टेजवर गेल्यावर वरुण गुडघ्यांवर बसला आणि फिल्मी स्टाईलने ऐश्वर्याला प्रपोज केले.
"येस." ऐश्वर्याने होकार दिल्यावर त्याने शेरवानीच्या खिशातून अंगठीची डबी बाहेर काढली आणि ऐश्वर्याच्या बोटात त्याने अंगठी घातली. पूर्ण हॉल टाळ्या आणि शिट्ट्यांनी दणाणून गेला.
दरम्यान मयुरी उत्कृष्ट भरतनाट्यम डान्सर असल्याने आणि स्पृहा कथ्थक शिकत असल्याने दोघींनी केवळ वीस मिनिटांत 'हसता हुआ नुरानी चेहरा' गाण्यावर सुंदर फ्युजन डान्स बसवला होता. उत्तमरीत्या त्यांनी स्टेजवर त्यांचा डान्स सादर केल्यावर उपस्थितांनी हॉल जणू डोक्यावरच घेतला. मयुरीच्या काकाने दोघींना उत्स्फूर्तपणे एक एक हजाराचे बक्षीस दिले. मयुरी आणि स्पृहा खूप खूश झाल्या होत्या. नंतर चार व्याह्यांचा डान्स झाला आणि मग सगळ्यात शेवटी उत्सवमूर्तींचा डान्स झाला. ऐश्वर्या आणि वरुणने 'एक दिन तेरी राहोंमें, बाहोंमें, पनाहोंमें आऊंगा...' ह्या गाण्यावर साल्सा नृत्य केले. ऐश्वर्या आणि वरुणच्या प्रेमाची केमिस्ट्री त्यांच्या नृत्यामधून दिसत होती.
संगीतचा कार्यक्रम आटपून रात्री सगळे घरी आले.
"खूप छान झाला कार्यक्रम दादा आणि वहिनी. खूपच मज्जा आली. ऐश्वर्याच्या घरची माणसे देखील खूप हौशी आहेत ना? आणि मुळात तिचा नवरा तर एक नंबर आहे. नशीब काढलं पोरीने. चांगली माणसे मिळाली." मयुरीची आत्या ऐश्वर्याच्या तोंडावरून हात फिरवत म्हणाली.
"हो ना, खरंच. ऐश्वर्याने छान मुलगा निवडला. तिचा डान्स आणि लाईफ पार्टनर." मयुरीची काकू आपल्या लेकीकडे कौतुकाने पाहत म्हणाली.
"ताई, खरंच छान झाला संगीतचा कार्यक्रम." ऐश्वर्याची मामी म्हणाली.
"आता काही वर्षांनी आपल्या मयूचा नंबर येईल. मयू छान नवरा शोध हो बाई." मयुरीची आत्या म्हणाली.
"आत्या! मी लग्न करणार नाही तर प्लीज कोणीही माझ्या लग्नाचा विषय काढू नका." असे म्हणून तणतणत मयुरी बेडरूममध्ये निघून गेली.
"अरे! हिला काय झालं? मी काही वाईट बोलले का?" मयुरीची आत्या आश्चर्याने म्हणाली.
"जाऊदे लहान आहे ती. सोडून द्या हा विषय आणि झोपा सगळे लवकर. उद्या सकाळपासून आपल्या घरात कार्यक्रम आहेत. होम मिनिस्टर! सगळी तयारी झाली आहे ना?" मयुरीच्या काकाने काकूला विचारले. काकूने मान डोलावून होकार भरला.
दुसऱ्या दिवशी सकाळी सवाष्णपूजन, ग्रहमख, बांगड्या भरण्याचा, मेहंदीचा कार्यक्रम खूप हसतखेळत पार पडला. मयुरीने प्रथमच दोन्ही हातांवर मेहंदी काढली होती. रात्री झोपण्यापूर्वी मयुरीने आईला फोन करून सर्व कार्यक्रमांचे वर्णन करून सांगितले.
तिसऱ्या दिवशी संध्याकाळपासून हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. सगळ्यांनी मनसोक्त हळद खेळली.
चौथ्या दिवशी मुख्य लग्नसोहळा होता. सकाळचा साडेअकराचा मुहूर्त असल्याने दोन्हीकडची मंडळी सकाळी आठ वाजल्यापासून हॉलवर आली. मयुरी करवली असल्याने तिला लग्नामध्ये भलताच मान होता. स्पृहा आणि रिद्धी मयुरीच्या मधे मधे लुडबुड करत होत्या. मंगलाष्टके चालू झाली आणि ऐश्वर्याचे लग्न लागले. मयुरी स्टेजवरून खाली उतरली.
तिसऱ्या दिवशी संध्याकाळपासून हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. सगळ्यांनी मनसोक्त हळद खेळली.
चौथ्या दिवशी मुख्य लग्नसोहळा होता. सकाळचा साडेअकराचा मुहूर्त असल्याने दोन्हीकडची मंडळी सकाळी आठ वाजल्यापासून हॉलवर आली. मयुरी करवली असल्याने तिला लग्नामध्ये भलताच मान होता. स्पृहा आणि रिद्धी मयुरीच्या मधे मधे लुडबुड करत होत्या. मंगलाष्टके चालू झाली आणि ऐश्वर्याचे लग्न लागले. मयुरी स्टेजवरून खाली उतरली.
मयुरीने पैठणी साडी नेसल्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली होती. पहिल्या प्रथम मयुरी लग्नसमारंभ खूप छान एन्जॉय करत होती.
ऐश्वर्या दीदी आणि जिजूंचे प्रेम पाहून पहिल्यांदा मयुरीच्या मनात आले की,
'माझा होणारा नवरा माझ्यावर असाच प्रेम करेल का?'
'माझा होणारा नवरा माझ्यावर असाच प्रेम करेल का?'
होणाऱ्या नवऱ्याचा विचार करताना तिला राहुलची छबी डोळ्यांसमोर दिसली. झटकन तिने तिचे मनात आलेले विचार झटकले आणि स्पृहाचा हात धरून ती चालू लागली.
चालता चालता मयुरीचा उंच टाचेच्या सॅंडलमुळे तोल गेला आणि ती पडणार इतक्यात समोरून येणाऱ्या एका मुलाने तिला सावरले. मयुरीने मान वर करून त्या मुलाला पाहिले आणि एक क्षण ती त्या मुलाकडे पाहतच राहिली.
क्रमशः
©नेहा उजाळे
©नेहा उजाळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा