याला जीवन ऐसे नाव भाग-३
मयूर आपल्या वडिलांना भीत होता. तो वडिलांच्या त्या तापट स्वभावाला अक्षरशा धास्ती मनामध्ये घेऊन चालत होता. त्याच्या वडीलांचा प्रत्येक भावंडावरती दरारा होता. त्यामुळे मनामध्ये इच्छा असताना सुद्धा त्याने कॉलेजमधील आवडणाऱ्या मुली सोबत प्रेम सुद्धा केलेलं नाही.
त्याला मनात एखादी मुलगी खूप आवडायची. परंतु भीतीपोटी त्याने दोन शब्द प्रेमाचे बोलावे म्हणून त्या मुलीशी धाडस केले नाही. त्या मुलीचे नाव भावना होते. त्याला ती खूप आवडायची. तिचे बोलणे हसणे तिचे वावरणे तिचा तो हसरा चेहरा त्याच्या मनावर जादू करायचा . घरी आल्यानंतर मयूर भावनांचा चेहरा आठवायचा. आणि मनातल्या मनातच हसायचा .एकांतात बसून तो तिचा चेहरा आठवायचा.तिची ती वागणूक निथळ वाऱ्यासारखी वेगवान होती. तसेच हवेच्या झुळकेसोबत उडणारे तिचे केस पाहून तो तिच्या सुंदर चेहऱ्याकडे एकटाच बघून तिच्या सोबत राममाण व्हायचा. परंतु मनातल्या मनात हा विचार करायचा की तिला जर आपण मैत्रीसाठी हात समोर केला तर ती आपली मैत्री मान्य करेल की नाही करेल. आणि मान्य न करता काहीही आपल्याला बोलून बसेल तर ..आपल्या मनाचे काय होईल.? मयूर हा स्वभावाने खूप हळवा होता त्याला येणाऱ्या वादळाची खूप भीती वाटायची .किंवा त्या मुलीने आपल्याबद्दल आपल्या घरी तक्रार केली तर आपले वडील आपल्यावर रागं भरतील. आपल्याला खरे खोटे सुनवेल. म्हणून तो चूप राहायचा. कॉलेजमध्ये फक्त आपल्याला शिकायचं आहे इतर गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही म्हणून तू भावनाच्या समोर जायचा नाही.
प्रेम मनात ठेवून तो भावनेकडे नजर अंदाज करायचा. भावना दिसायला सुंदर होती. बोलायला मधुर होती. तिचे हसणे बागडणे मनात साठवून ही एक तात्पुरती सुखद गोष्ट आहे. आणि आपल्याला इथेच कॉलेजमध्ये विसरायचे आहे. तिच्या आहारी न जाता आपल्याला पुस्तकातच रमायचे आहे. असा विचार तो करत होता. कोणतीही दुर्घटना इथे झाली नाही पाहिजे. आपण आपल्या मनाला त्रास करून घेतला नाही पाहिजे. म्हणून मयूर प्रत्येक वेळेस जपत होता. जीवन जगता जगता त्याला प्रत्येक वळणावरती भीती निर्माण होताना वाटत होती तो आपल्या इच्छा पूर्ण करू शकत नव्हता जे रोजचे जगणे आहे तेच फक्त जगायचा.
क्रमशः
मोहन सोमलकर नागपूर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा