याला जीवन ऐसे नाव भाग ~२
पहिला भागात आपण मधुरच्या स्वभावाविषयी जाणुन घेतले. परत तेच मी सांगणार नाही.
आता कथा पुढे.....
मधुर साधाभोळा होता. म्हणुन त्याला जीवन जगत असतांना जगण्याचे डावपेच माहीत नव्हते. माहित नव्हती म्हणजे त्याला स्वतंत्र विचार करण्याचा त्याला कोणत्याही गोष्टीमध्ये निर्णय घेण्याची संधी त्याच्या आई-वडिलांनी कधीच त्याच्या तरुणपणात दिली नाही किंवा बालपणातही तसे धाडस त्याच्यामध्ये निर्माण केले नाही. आणि ही गोष्ट आपल्या मराठी संस्कृतीमध्ये किंवा महाराष्ट्रात प्रकर्षाने जाणून येते की ,आई वडील आपल्या मुलांना स्वतंत्रपणे कोणत्याही गोष्टीत निर्णय घेण्यासाठी किंवा कोणतेही काम करण्यासाठी स्वतंत्रपणे त्याच्यावर किंवा त्याच्या खांद्यावर जबाबदारी टाकत नाही.
कोणतीही गोष्ट करताना तुला ती गोष्ट जमेल काय? तू ती गोष्ट करू शकत नाही तू सध्या लहान आहे. तुला ते समजत नाही. अशा प्रकारची उदाहरण आई-वडील किंवा कर्ते पुरुष आपल्याला देत असतात.
आणि मधुर सोबत सुद्धा तेच झालेलं होतं .मधुर बालवयातून तरुण झाला तरुण वयात त्याने पदार्पण केले. परंतु घराच्या बाहेर सुद्धा त्याला एकटे पाठवल्या जात नव्हते. तो कसा तरी चार-पाच मित्रांच्या सोबत थोडा बाहेर जाऊ लागला. फिरू लागला त्याला थोडीफार दुनियादारी कळू लागली .कधी शाळेच्या सहलीला जाणे कधी छोट्याशा ट्रीपला एक दिवसीय ट्रीपला चार-पाच मुलांसोबत सायकलवर जाणे ही हिम्मत हे धाडस त्याच्या मित्रांनीच त्याला दिली होती. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही की मधुर आपल्या दोन-तीन मित्रासोबत राहून आपल्या मनात कोणतीही गोष्ट करण्याची एक संधी किंवा एक धर्य बाळगत होता.
हळूहळू त्याचे पाय बाहेरच्या जगात पडले. बाहेरचे जग काय असते हे त्याने शिकण्याचा प्रयत्न केला .किंवा त्याच्या जवळचे सुसंस्कारी मित्र त्याला वाईट गोष्टीचे व्यसन न लावता एका चांगल्या मार्गावर नेण्याचे धाडस किंवा चांगल्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न त्याच्याकडून करून घेत होते .आणि यातूनच तो जीवनाचे गणित शिकण्याचा प्रयत्न करत होता. दोन-तीन मित्राच्या मदतीने तो आपल्या आयुष्याची वाटचाल पुढे करीत होता आणि मनामध्ये चारचौघात मुक्तपणे बोलण्याचं धाडस तो आपल्या मनात करीत होता .आपल्या मनाची हिंमत तो वाढवण्याचा प्रयत्न करीत होता.
त्याच्या प्रयत्नाला यश येईल काय बघु
क्रमश:
त्याच्या प्रयत्नाला यश येईल काय बघु
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा