याला जीवन ऐसे नाव
मानवाच्या जन्माला आलो .सगळेच दिवस सारखे नसतात. आपले बालपण आपल्या आईवडीलाच्या स्वाधीन असते. आपण मोठे होतो. शिक्षण, खेळणे,मौजमजा करणे. एवढेच आपले जीवन असते. पण जसजसे आपण मोठे होत जातो. जसजसे आपल्यावर आपल्या कुटुंबाचे संस्कार होत जातात.
जसजसे आपल्यावर आपण ज्या समाजात राहतो. त्या समाजाचे संस्कार होतात. आपण ज्या मित्रांसोबत राहातो त्यांच्या अवगुण व सद्गुणचा प्रभाव आपल्यावर होत असतो.
ही कथा आहे एका सामान्य पुरुषाची जो स्वभावाने साधाभोळा होता. त्याला जगाचे डावपेच कधी कळलेच नाही. तो आधी आईवडीलांच्या आवाक्या बाहेर कधी गेलाच नाही. आईवडीलाचे नेहमीच तो ऐकायचा. तो आईवडिलांच्या मर्जीबाहेर कधी गेलाच नाही.
ही कथा मधुर या तरुणाची आहे. अतिशय साधाभोळा असा स्वभावाने मधुर शालान्त शिक्षणापर्यंत व्यवस्थित जगला. पण पुढे नोकरी लागुन त्याचे लग्न झाल्यानंतर त्याचा हा साधाभोळा स्वभावच त्याला घातक ठरला.
आजच्या काळात माणसाने थोडे स्वार्थी असावे. थोडे भांडखोर असावे. थोडे निर्लज्ज असावे. आणि प्रत्येक माणससाला जीवन जगतांना अनेक डावपेच आले पाहिजे. तेव्हाच व्यक्ती या संघर्षमयी जगात स्वतःची व आपल्या कुटुंबाची प्रगती करु शकतो.
मधुर ची ही कहाणी वास्तविक नाही परंतु वास्तविकतेची ओळख करून देते परंतु माणूस म्हणून या जगात अनेक अडचणी जगतानी येतात त्या अडचणी पासून दूर होण्यासाठी किंवा त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी माणसाला डावपेच येणे आवश्यक आहे या जगात जर साधा माणूस असेल तर तो या आयुष्यात जगू शकत नाही किंवा त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो हे तर आवश्यक आहे की माणूस मेहनत आणि कष्टाशिवाय या जगामध्ये यश संपादन करू शकत नाही परंतु प्रत्येक गोष्ट माणसाला मेहनत करून किंवा कष्ट करून मिळत नाही कधी कधी युक्तीचा सुद्धा वापर करावा लागतो हे मधुरच्या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येते आणि हेच या कथेमध्ये दर्शवलेले आहे तेव्हा या कथेची पार्श्वभूमी लक्षात घेऊन या कथे चे स्वागत तुम्ही कराल अशी वाचकांकडून लेखकाला फार मोठी अपेक्षा आहे हा कथेचा पहिला भाग मी तुमच्यासमोर प्रस्तुत केलेला आहे हा भाग तुम्ही वाचक हो वाचून योग्य ती समीक्षा द्याल हीच माझी इच्छा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा