Login

यंदा कर्तव्य आहे भाग 2

Story About Marriage Fixing
यंदा कर्तव्य आहे भाग २
क्रमश:भाग १
इकडे मंगेश च्या घरी लगबग सुरु झाली . सुभाष आणि त्याची पत्नी आपल्याकडे नक्कीच कोणत्या उद्देशाने येत आहेत हे त्यांना माहित होतेच . घर आवरायला सुरुवात झाली . जेवणाचा मेनू काय बनवायचा त्याची तयारी सुरु झाली .
मंगेश चा मुलगा नुकताच चांगल्या कंपनीत पर्मनंट झाला होता आणि मुली चे शिक्षण नुकतेच पूर्ण झाले होते आणि ती हि एका कंपनीत नोकरीला लागली होती . मंगेशच्या घरी सुद्धा मुलांसाठी स्थळ बघणे चालू झालेच होते.
मंगेश एकदम खुश होता . एकतर बऱ्याच वर्षांनी त्याचा लहानपणीचा मित्र त्याच्या घरी येणार होता त्याचा आनंद होताच पण आता जमलं तर एकाच मांडवात दोन लग्न होतील . असे काहीतरी झाले तर किती बरं होईल अशी स्वप्न बघू लागला .
या सगळ्यात पावसाचा जोर जरा सुद्धा कमी नव्हता . सतत बरसणारा मुसळधार पाऊस यांच्या ह्या दोन कुटुंबियांच्या प्लॅन वर जराही फरक पाडत नव्हता . म्हणजेच आनंदाच्या उत्साहाच्या ह्या कामात दोन्ही फॅमिलीला पाऊस खूप आहे आणि प्लॅन पुढे करावा असे लक्षातच येत नव्हतं कारण दोन्ही कुटूंबांना आपल्या मुलांच्या लग्नाच्या गोष्टीत खूपच इंटरेस्ट होता.
बोल बोलता रविवार उजाडला. मंगेश च्या घरी सकाळ पासून एक वेगळीच लगबग सुरु होती . घर छान चकचक चमकत होते . वरती ठेवलेले नवीन काचेचे बाउल, कप बाहेर काढून ठेवले. ठेवणीतला टेबल क्लोथ टाकला गेला त्यावर छान फुलदाणी सजली. दारापुढे रांगोळी काढायला फारशी जागा नव्हतीच पण तरीही मंगेश च्या बायकोने वेलबुट्टी काढली.
पटापट नाश्ता अंघोळी आटपून जेवणाची तयारी सुरु झाली. पनीर ची भाजी, पुऱ्या आणि आम्रखंड असा बेत आखला होता .
इकडे सुभाष आणि लता कोसळणाऱ्या पावसाची तमा न करता भल्या पहाटे छत्र्या घेऊन घरातून बाहेर पडले .
सुभाष " मोठे मंगळसूत्र कशाला घातलस प्रवासात ?'
लता " अहो .. आता पाहुण्यांकडे जातोय तर बरं दिसेल म्हणून घातलंय "

सुभाष " मग एक काम कर सध्या बॅगेत ठेव . घरी जाताना घालशील . "
लता ने नवऱ्याने सांगितल्या प्रमाणे मोठे मंगळसूत्र अगदी आतल्या चेन कप्प्यात पर्स मध्ये ठेवून दिल आणि पर्स घट्ट पकडून ठेवली
पाऊस जास्त जास्त असे म्हणत म्हणत दोघे पुण्याला आले . पुण्यात आले तर पुण्यात हि पावसाचा जोर कमी नव्हता . खरंतर आता वैताग आला होता दोघांनाही . गेल्या चार दिवस नुसती चिकचिक . जरा म्हणून पावसाने विश्रांती घेतली नव्हती .
ठरल्या प्रमाणे आत्याला भेटून दोघे हॉस्पिटल मधून दोघे बाहेर पडले , आणि आता मंगेश कडे जायच्या बस ची वाट बघत असताना अचानक भोंगा वाजला. कॅर्पोरेशन वर अनाऊंसमेंट होऊ लागली " अचानक पाण्याची पातळी वाढल्यामुळे धरणातील पाणी सोडावे लागत आहे तरी सर्व गाडया रद्द करण्यात येत आहेत .
सगळीकडे नुसता गोंधळ सुरु झाला . बरेचसे प्रवासी अडकले होते . निदान एक तरी बस सोडा अशी रिक्वेस्ट करू लागले . लोक रिक्षा बघू लागले. शेवटी एक बस मंगेश च्या घराकडे जाणारी सोडतील ती आजची शेवटची बस असेल सांगण्यात आले आणि प्रवाशांना शांत केले गेले.
इकडे मंगेशच्या घरी जसे बारा वाजून गेले तसे खमंग पदार्थांचा सुवास घमघमू लागला होता . पाहुणे कधी येतात याची आतुरता हि लागली होती. २ वाजून गेले तरी पाहुण्यांचा पत्ता नाही . मोबाईल चा वापर अजून सर्रास झाला नव्हता त्या काळी . त्यामुळे इकडे ते अडकले आहेत हे कळवता पण येत नव्हते .
लता " अहो .. आता काय करायचं ? आता कसे जायचं ?
सुभाष : मी डायरेक्ट रिक्षा भेटते का ते बघतो .तू थांब इथे ?"
लता " नाही नको .. पाऊस खूप आहे .. सर्व लोकां सोबत राहिलो तर सेफ राहू "
सुभाष " शेवटची गाडी अजून कधी सोडतील याची काही खात्री नाहीये . "
लता " पण इतके प्रवाशी आहेतच ना ? त्यांना हि तर जायचच आहे ना .. ते नक्की बस सोडतील "

🎭 Series Post

View all