यंदा कर्तव्य आहे भाग ३
क्रमश:भाग २
इकडे अडीच वाजून गेले तर पाहुणे आले नाहीत याचा अर्थ बहुतेक यायचा बेत रद्द केला कि काय म्हंणून मंगेशने ने त्यांच्या लँडलाईन वर घरी फोन करून बघितले . पण घरी कोणीच नसल्याने फोन वाजून वाजून बंद पडला . पाहुण्यांशी काहीच संपर्क होई ना .
शेवटी मंगेशने आता आपण जेवून घेऊ असा निर्णय घेतला .सर्व जणांनी थोडे थोडे खाऊन घेतले .
सकाळी जेवढा उत्साह होता तो आता मावळला होता . त्यांनी निदान कळवायला पाहिजे म्हणून थोडासा वाईटही वाटत होत . इतकि सर्व केलेली तयारी फुकट गेली असे वाटू लागलं .
मंगेश ची बायको जेवण नीट झाकून दुपारी जरा आराम करायला पडली तोच दार वाजले
सर्वांना आनंद झाला . बहुतेक पाहुणे आले .. पाऊसामुळे यायला उशीर झाला असेल
दार उघडले तर समोर आश्चर्यच
दारात पाहुणे तर नक्कीच होते पण हे ते पाहुणे नव्हते . मंगेश च्या बायकोची बहीण तिकडेच राहत होती पण नदी जवळ घर असल्यामुळे त्यांच्या घरात पाणी शिरायला लागले म्हणून महत्वाचे सामान घेऊन तिची बहीण सर्व फॅमिली पूर्ण भिजून दारात उभी.
बहिणीच्या डोळ्यांत पाणी होते . त्यामुळे परिस्थितीची जाणीव होताच सगळे पुन्हा कामाला लागले. सर्वांनी पटापट अंघोळी केल्या . जेवण तयार होतेच . मंगेश च्या बायकोने सर्वांना गरम गरम पुऱ्या , पनीरची भाजी, आम्रखंड सगळेच वाढले . म्हणतात ना दाने दाने पर लिखा होता है खाने वाले ला नाम .. अगदि तसेच झाले. जेवण बनवलं कोणासाठी आणि खाल्ले कोणी .
मग मंगेश च्या घरात वेगळ्याच गप्पा सुरु झाल्या . पाऊस कसा पडतोय , भोंगे वाजत आहेत . महापूर आलाय . या आधी इतका पाऊस कधीच पडला नाही. पुण्यात सगळीकडे पाणीच पाणी आहे. अमुक एक मंदिरात पाणी शिरले. वगैरे आशय गप्पांचा पूर वाहू लागला . सोबत पाऊस पडतच होता. .
पण कुठेतरी सर्वांच्या मनात खंत होतीच कि येणारे पाहुणे आले नाहीत ..

इकडे सुभाष आणि लता ने बाजूच्या गाडीवर मिळणारा गरम गरम वडा पाव घेतला आणि त्या बरोबर एक एक काप चहा घेतला तेव्हा कुठे त्यांना जरा तरतरी आली . दोघेही पावसात गारठले होते.
थोड्याच वेळात एक बस पुण्यातून मंगेश च्या गावी निघाली . तेही ड्रायव्हर जरा डेअरिंग बाज निघाला म्हणून. बाकीचे ड्राइवर हि रिस्क सुद्धा घ्यायला तयार नव्हते. पण आता आनंद हा होता कि बस जाणार आहे. दोघांनी पटकन जाऊन बस मध्ये एक सीट कशी बशी मिळवली .हळू हळू प्रवासांनी तुडूंब भरलेली बस रस्त्यावर साचलेल्या तुडूंब पाण्यातून आणि वरून कोसळणाऱ्या पावसातून वाट काढत प्रवास करू लागली . संध्याकाळचे पाच वाजता बस निघाली आता निदान ६. ३० पर्यंत मंगेश कड़े पोहचू अशी अशा या दोघांना वाटू लागली.
सुभाष " आजचा दिवस खूपच त्रासदायक गेलाय . माझे ऐक आजची रात्र आपण मंगेश कडे राहू आणि उद्या आपल्या घरी जाऊ . जाताना वाटेत आपल्याला मोठे घाट आहेत . "
लता पण थकलीच होती " आपण पहिल्यांदाच त्यांच्या कडे जातोय .. कसे वाटेल ?"
सुभाष " काही होत नाही .. माझा चांगला मित्र आहे तो .. तू काळजी करू नकोस .. खूप चांगली फॅमिली आहे"
लता " बरं .. ठीक आहे .. तिकडे गेल्यावर अंदाज येईलच आपल्याला "
सुभाष " हो "

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा