यंदा कर्तव्य आहे भाग ४
क्रमश:भाग ३
बस मध्ये बसून दोघे गप्पा मारत होते तितक्यातअर्धा एक तास गाडीने प्रवास केला असेल तर गाडी बंद झाली . गाडी बंद का झाली म्हणून बाहेर बघितले तर कळले नदीचे पाणी पुलावरून वाहतंय. रस्ता बंद आहे . चालत जाणारी लोक आपला जीव धोक्यात घालत होती. पुरुष माणसांच्या छाती जवळ पाणी येईल इतके पाणी रस्त्यावर होते . इथून पुढे गाडी काढणे मुश्किल आहे ड्रायव्हर तरी काय करणार बिचारा.
बऱ्याच कार , बस अर्ध्यापेक्षा जास्त पाण्यात बुडलेल्या दिसत होत्या . आजू बाजूला असेलेल्या दुकाना मध्ये पाणी शिरलेलं दिसत होते. सर्वच जलमय झाले होते.
आता मात्र लताचा धीर सुटला आणि डोळ्यांतून पाणी वाहू लागले . आपण चांगल्याच संकटात सापडलोय याची कल्पना दोघांना आली . मन घट्ट करून दोघे शांत बसले . पाण्याचा प्रलय आला होता . धरणातून पाणी सोडल्याने सिटी मध्ये पाणी भरले आणि वरतून पाऊस थांबत नव्हता. हि अशीच परिस्थिती राहिली तर आपला जीव धोक्यात आहे ह्याची जाणीव होयला लागली .
पूल जर पार झाला असता ना तर पुढल्या अर्ध्या तासात मंगेश च्या घरी पोहचले असते . पण हे पाणी पार करणे सोप्प नव्हते कारण पुलाखाली असणाऱ्या नदीचे पाणी रस्त्यावरून तेही खूप प्रवाहात जात होते . शिवाय साप , विंचू , खेकडे असतीलच ते वेगळ. वाहत्या पाण्यामधून पलीकडे कसे जायचं हा मोठा प्रश्नच होता.
संध्याकाळ चे रूपांतर काळोखात होयला लागले . रात्र अशीच रस्त्यावर काढावी लागेल अशी चिन्ह दिसू लागली होती
तेवढयात एक रेस्क्यू टीम आली . त्यांनी मोठं मोठया दोऱ्या आणल्या होत्या . एक जण या टोकाला आणि एक जण त्या टोकाला असे करत दोरीच्या साहाय्याने लोकांना रस्ता पार करून देण्यास सुरुवात झाली . लहान मुलांना वयस्कर व्यक्तींना तर लिटरली उचलून पलीकडे नेत होते . बऱ्याच वेळ लाईन मध्ये उभे राहिल्यावर सुभाष आणि लता चा नंबर आला . त्या दोघांकडच्या बॅगा एका माणसाने घेतल्या. पर्स मध्ये मोठे मंगळसूत्र असताना आपली पर्स एका अनोळखी व्यक्तीकडे द्यायला आधी थोडी भीती वाटत होती . पण आता काही पर्याय हि नव्हता . देवाचा धावा करत हे दोघे नवरा बायको मागेपुढे दोरीच्या साहाय्याने रस्ता क्रॉस करू लागले . हळू हळू पाणी वर चढू लागले . सुभाष च्या छाती पर्यंत पाणी लागले लता च्या तर गळ्या पर्यंत पाणी आले , ब्रिज च्या मधो मध आल्यावर पाण्याचा प्रवाह खूप आहे हे जाणवूं लागले .कसे बसे करत दोरीच्या सहाय्याने आणि रिस्क्यू टीम च्या मदतीने एकदाचा पूल ओलांडला गेला ..
सगळे कपडे भिजले . हवेत गारठा होता . पाऊस वरून पडतच होता . आपले सामान घेऊन सुभाष आणि लता बाकीच्या प्रवाशांची इकडे येऊ पर्यंत वाट पाहू लागले . इकडून पुढे जाण्यासाठी एक बस तयार होती . त्या मधून मंगेश च्या गावी सर्व प्रवाशी जाणार होते .
बाजूलाच स्वयंसेवक कोणाला पाण्याच्या बाटल्या दे. चहा दे , पार्ले जी ची बिस्कीट देत होते . दोघांनी पुन्हा एकदा चहा आणि बिस्कीट पोटात टाकले .. घड्याळात संध्याकाळचेआठ वाजले होते
अजूनही मंगेश कडे जायचा अर्धा एक तासाचा प्रवास होता . तेही इथली गाडी सुटल्यावर . दुसरा कोणता मार्गच नव्हता
मंगेश च्या घरी बहिणी ची सगळीच फॅमिली होती त्यामुळे आता संध्याकाळी सगळ्यांना मसाले भात करायचं ठरले . मंगेशच्या बायकोने मोठ्या पातेल्यात सर्वांना पुरेल एवढा मसाले भात केला . पापड लोणची घेऊन सर्वांनी जेवण उरकली .
आता एवढ्या सगळ्यांची झोपायची सोय करायची होती . बेड मधून असतील नसतील तेवढी अंथरूण बाहेर काढली. बाहेर हॉल मध्ये जेन्टस , बेडरूम मध्ये बायका अशी झोपायची सोय करू लागले .
तेवढयात मंगेश च्या घरातला लँडलाईन खणखणला. साधारण १० वाजले होते.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा