यंदा कर्तव्य आहे भाग ५
क्रमश:भाग ४
तेवढयात मंगेश च्या घरातला लँडलाईन खणखणला. साधारण १० वाजले होते.
मंगेश " हॅलो"
मंगेश "अरे बापरे !! .. मग आता कुठे आहात ?बर .. थांबा तिकडेच मी आणि माझा मुलगा दोघे आमची टू व्हीलर घेऊन येतो तुम्ही तिकडेच थांबा .. आम्ही दोघे घ्यायला येतो "
सगळ्यांचेच कान एकदम टवकारले होते .
मंगेश ने फोन ठेवला " सुभाष आणि त्याची बायको पुण्यातल्या पुरात अडकले होते .. आता जवळ आलेत ..त्यांना घेऊन येतो "
मंगेश आणि त्याचा मुलगा लगेचच टू व्हिलर घेऊन त्या दोघांना आणायला गेले.
-----
मंगेश ची बायको तिच्या बहिणीला " अग ताई .. आता १० वाजलेत म्हणजे ते आता जेवूनच आले असतील नाही का?आल्यावर अंघोळ झाली कि मस्त चहा करते फक्त .. नाही का ? काय वाटतंय तुला ?"
बहीण " मग काय ? आता आपल्यावर झोपतीलच .. बाई बाई .. आज काही खरं नाही . तुमच्याकडे आमच्या मुळे पाहुण्याची गर्दी झाली "
मंगेश ची बायको " असू दे ताई , तू काय मुद्दामून आली का ? हा पाऊस बघ ना किती कोसळतोय ?"
इकडच्या तिकडच्या गप्पा मारे पर्यंत हे दोघे सुभाष आणि लता घरी आले.
सुरुवातीला कोणी फारसे बोले ना .. अजून तसा फारसा परिचय नव्हता . मंगेश , सुभाष आणि बहिणीचे मिस्टर तिघे तेवढे बोलत होते.
मंगेश चा मुलगा आणि मुलगी आतून आतून पाहुण्यांना बघत होती .
मंगेश च्या बायकोने गिझर ऑन केला. गरम गरम पाण्यात अंघोळ करून दोघे फ्रेश झाले करून दोघे फ्रेश झाल्यावर मस्त आल्याचा चहा झाला .
इकडे चहा पेक्षा भाताची भूक होती पण बोलायचं कसे ?
गप्पा मारता सर्वांना कळले कि आजचा दिव स त्यांनी दोघांनी काय काय सोसलंय आणि अन्न म्हणून पोटात फक्त चहा आहे . तशी मंगेशच्या बायकोने पुन्हा रात्री कुकर चढवला आणि गरम गरम बेसनाचे पिठले बनवले.
पंधरा वीस मिनिटात गरम गरम वाफळलेलं पिठलं ,भात पापड आणि लोणचं असे ताट वाढलं . मंगेश च्या बायकोला बिचारीला जरा लाजच वाटत होती कि पाहुणे पहिल्यांदा आलेत पण चक्क पिठलं भात वाढलं .
सुभाष आणि लता दोघांनी पिठलं भात अतिशय आनंदीत होऊन खाल्लं. त्या क्षणी अन्नपूर्णा त्या पिठलं भातावर एकदम प्रसन्न झाली होती . खरंतर आज मंगेश ने त्यांच्यासाठी पनीर ची भाजी , पुऱ्या , आम्रखंड असा बेत आखला होता पण ह्या पिठलं भाताची सर जगातल्या कोणत्याच मेनूशी होऊ शकत नाही अशी होती .
फॅमिली आवडली तर आपल्या मुलांचं लग्न लावून देण्याचा विचार करू असा विचार मनात असताना मंगेशने पाहुण्यांना खुश करण्यासाठी पनीरची भाजी , पुऱ्या आम्रखंड असा मेनू ठेवला होता पण देवाच्या मनात काही वेगळेच होते. प्रत्यक्षात पाहुण्यांना पिठलं भात वाढायची वेळ आली. शिवाय घर पाहुण्यांनी आधीच भरलेलं होते त्यामुळे फार काही खास त्यांच्यासाठी करता आले नाही. असलेल्या अंथरुणात आणि जागेत कसेबसे सगळे झोपले. मुलीला किंवा मुलाला बघायला किंवा त्यांची काही चौकशी करता आली नाही. त्यामुळे हा सगळा प्लॅनच विस्कटला होता. या मिटिंगचा जो उद्देश होतो तो नक्कीच साध्य झाला नव्हता.
दुसऱ्या दिवशी सकाळीच लता आणि सुभाष उठून आपल्या घरी रवाना झाले.
पुढे काही मुलांच्या लग्नाविषयी बोलणे झालेच नाही.
अचानक दोन महिन्यांनी मंगेशला सुभाषचा कॉल आला.
सुभाष" मंगेश कसा आहेस ?"
मंगेश " मी छान .. तू बोल ? काय सगळा गोंधळच झाला . तेव्हा तुझा म्हणावा तसा पाहुणचार करता नाही आला "
सुभाष " अरे .. नाही रे असे काहीच नाही . आम्ही इतक्या वाईट प्रसंगात अडकलो होतो . तुझ्याकडे आल्यावर अंघोळ केली . मस्त पिठलं भात जेवलो. किती छान. त्या पिठलं भाताची चव आम्ही दोघे कधीही विसरणार नाही."
मंगेश "बरं बोल. आज कसा कॉल केलास ?"
सुभाष " ते .. आम्हांला तुझी दोन्ही मुलं पसंत आहेत . पुढच्या रविवारी तू दोन्ही मुलांना घेऊन आमच्याकडे ये आपण आपल्या मुलांना एकमेकांना भेटवू आणि पुढे काही जमतंय का ते बघू "
मंगेश एकदम खूषच झाला" चालेल .. चालेल .. नक्की .. नक्की येतो"
तर मंडळी अशी हि साठा उत्तराची पिठलं भाताची कहाणी सफल संपूर्ण.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा