यांना चांगल्या लोकांची कदर नाही भाग 1

यांना चांगल्या लोकांची कदर नाही
यांना चांगल्या लोकांची कदर नाही भाग 1

©️®️शिल्पा सुतार

"श्रेया अग कुठे आहेस? मनीष? कोणी आहे का? ही म्हातारी आत बसली तर तिच्याकडे बघायच नाही का? श्रेया कोण आल ग? पाहुण्यांसाठी काय केल? मला ही थोड द्या." मालूताई आतल्या खोलीतून आवाज देत होत्या. त्या नुकत्याच फिरून आल्या होत्या. आत जपमाळ जपत बसल्या होत्या. बाहेरून गप्पांचे आवाज येत होते.

" आजी काय आहे शांत रहा जरा." श्रुती आत येत म्हणाली.

" मी इथे आतल्या खोलीत बसुन आहे. कोणी बघत नाही. मला वार्‍यावर सोडल जस. दोन वेळा जेवण देवून द्या आणि चहा. बस झाल यांच कर्तव्य. जेवण ही काय असत. त्याला ना चव ना चोथा." वय झाल तरी मालू ताईंच्या शब्दातली धार काही संपत नव्हती.

" आजी अग बाहेर पाहुणे आले आहेत हळू बोल. तू पण चल की आमच्यात. आई तुला बोलवत होती. " श्रुती म्हणाली.

" तुझी आई नुसती तोंड देखलं हाक मारते. खर तर तिला वाटत मी आत असाव. कोण आलं आहे? "त्यांनी विचारल.

" मीना मावशी आणि काका. "

" तरीच इतक्या उत्साहात गप्पा सुरू आहेत. त्यांना काय काम आहे? उठ सुठ इथेच असतात ते. " मालू ताईंनी परत नीताच्या नातेवाईकांवर तोंड सुख घेतल.

" आजी प्लीज. काहीही काय ग? "

" खायला काय केल होत? " मालू ताईंनी विचारल.

" समोसे होते मावशीने आणले होते. "

"मला दिले नाही? "

" आई देत होती. बाबा नाही म्हणाले. तुला पचत नाही. दुसर्‍या दिवशी गोळ्या घ्याव्या लागतात ना. आजी पथ्य पाळ. " श्रुती म्हणाली.

" तुम्ही खातात मला पण वाटेल ना. "

" आम्ही कुठे खातो? तुला चालत नाही म्हणून कित्येक पदार्थ आई करत नाही. आज ही बाबांनी समोसे खाल्ले नाहीत. "

" मला त्या नीताच काही सांगू नकोस. तू उगीच तिची बाजू घेवू नकोस. " मालू ताई चिडून म्हणाल्या.

" कठिण आहे. ही आजी काही नीट होणार नाही. आजी तुझ्या अश्या स्वभावामुळे तू एकटी पडली आहेस. आता तरी नीट वाग. आई बद्दल अस बोलत जावू नकोस." श्रेया वैतागून बाहेर येवून बसली.

" काय झालं? " मनीषने हळूच विचारल.

"काही नाही आजी नेहमी प्रमाणे आईला काहीही बोलते आहे. मला ना आता हे ऐकवत नाही बाबा. तुम्ही तिला काहीच का बोलत नाही. "श्रेया चिडली होती.

" काय बोलणार. तीच वय बघ. "मनीष म्हणाला.

" मग या वयात तिने गोड बोलून सगळ्यांशी नीट रहायला हव ना? वेड वाकड बोलून तिच्या आजुबाजुला किती निगेटिव्ह वाटत. कोणालाच आजीशी बोलावसं वाटत नाही. मला तर ती आजीचा हा स्वभाव आवडत नाही. "

मनीष काही म्हणाला नाही. थोड्या वेळाने मीना गेली. नीता स्वयंपाक करत होती. मनीष आई जवळ बसला होता. टीव्हीवर आध्यात्मिक कार्यक्रम सुरू होता. मालू ताई भजनावर डोलत होत्या." तू माझ्या सोबत असला की चांगल वाटत मनीष. "त्या म्हणाल्या. त्या माय लेकाच चांगल पटत होत.

घरात मनीष, नीता त्यांची मुलगी श्रुती होती. मालू ताई इकडे रहायला होत्या. मनीषचा लहान भाऊ नीलेश, रमा आणि त्यांचा रोहित दुसर्‍या शहरात रहायला होते. सुखी कुटुंब होत. बाहेरच्या माणसांना वाटेल काही प्रॉब्लेम नाही. पण तस टेंशन खूप होत. वरवर आनंदी दिसणाऱ्या नीताला सासुबाई त्रास देत होत्या.

"आई जेवून घ्या." नीता त्यांच ताट घेवून आली.

त्यांनी तोंड वाकड केल." मला मुगाची खिचडी नको. तुम्ही समोसे खाल्ले ना?"

" आई तुला पथ्य आहे. अस करायच नाही. चल पटकन जेव." मनीष म्हणाला.

" तुम्हाला काय केल आहे?" मालू ताईंनी विचारल.

" हेच आहे." नीता म्हणाली. तिला मनीषने तस सांगितल होत.

" तुम्ही मसाले भात केला ना? मला वास येतो आहे. मी ही तेच खाते. "मालू ताई हट्ट करत होत्या.

" नाही आई अजिबात नाही. मागच्या आठवड्यात पोटात किती इन्फेक्शन झाल होत. तब्येत सांभाळ." मनीष म्हणाला.

🎭 Series Post

View all