यांना चांगल्या लोकांची कदर नाही भाग 2

यांना चांगल्या लोकांची कदर नाही
यांना चांगल्या लोकांची कदर नाही भाग 2

©️®️शिल्पा सुतार

मनीष मसाले भातासाठी नाही म्हणाला. म्हणून मालू ताई चिडचिड करत होत्या. त्या नीताला खूप बोलत होत्या.

"आई तिला का बोलते आहेस? शांत पणे जेव ." मनीष म्हणाला.

"नीताने कायम मला अस केल. मनाप्रमाणे जेवू देत नाही. तुला ही तिच्या बाजूने केल. म्हणजे माझ कोणी ऐकणार नाही. बघितल का कशी वागते. " मालू ताई सगळा राग नीतावर काढत होत्या.

" आई काहीही बोलू नकोस. उलट तीच तुझी काळजी घेते."

" हो तोंड देखलं आहे. " मालू ताईंनी नाक मुरडल.

"आई तुला ना आजकाल कोणती गोष्ट पटत नाही. तुझ्यातला तो गोडवा कुठे गेला?" मनीष बोलत होता. नीता किचन मधे येवून बसली. कडू कारलं साखरेला घोळवा की तुपात तळा कडूच राहणार.

"मनीष मला ना नीलेश, रमाची खूप आठवण येते आहे. काय चव आहे रमाच्या हाताला. माझ किती करते. नाहीतर हे बेचव जेवण. " मालू ताई म्हणाल्या.

मालू ताई कायम मनीष जवळ होत्या. नीलेशकडे अगदी पाहुण्यासारखं चार आठ दिवस रहात असत. तेव्हा तर कौतुक होणारच. तसे ते दोघ ही चांगले होते.

सुरवातीपासून मालू ताई नीताला कमी समजत होत्या. रमा त्यांना चांगल वाटायची. खर तर नीता इतक करत होती त्याच काही कौतुक नव्हतं. जो करतो त्याला दुर्लक्षित करायच. जो इथे नाही त्याची प्रशंसा करायची. नेहमीच होत. तरी मनीष काही म्हणाला नाही. नेहमी सगळे बोलायचे की मालू ताई अस काय म्हणताय. नीताला ही वाईट वाटायच. आता ती दुर्लक्ष करत असे. काहीही करा.

मालू ताईंच जेवण झालं. मनीषने त्यांना गोळ्या दिल्या. थोड्या वेळाने मनीष हॉल मधे आला. ते तिघे जेवायला बसले.

"नीता आय एम सॉरी. आई काहीही बोलते ." मनीष म्हणाला.

"ठीक आहे. आईंच आजच आहे का? त्या नेहमीच मला त्रास देतात." नीता म्हणाली.

"बाबा, आजी का अस करते? आई तिची किती काळजी घेते. तिला आईची कदर नाही. पण हे तुमच्या दोघांमुळे झाल आहे. तुम्ही आधी पासून आजीला दाबल असत तर अस झाल नसत." श्रुती म्हणाली.

" बेटा मोठ्यांशी अस कस बोलणार?" मनीष म्हणाला.

" स्टँड घेवू नका. असच दुःख सहन करत रहा. अर्धाच्या वर आयुष्य गेल. बाबा तुम्ही निदान आईचा विचार करायला हवा होता. "

मनीष विचार करत होता श्रुती बरोबर बोलते आहे. मी एकतर्फी विचार करतो. आईने थोड समजून घ्यायला हव. एकत्र रहायच तर नीता ही कंफर्टेबल हवी. तरी मी बर्‍याच वेळा आईला बोलतो. तिला समजत नाही. बघू काही करता येईल का?

मालू ताई मनीषच्या मदतीने बाहेर आल्या. त्या अंगणात फेर्‍या मारत होत्या. बाजूच्या मावशी बसलेल्या होत्या.

" झाल का जेवण?" त्यांनी विचारल.

"हो खाल्ले दोन घास कसे तरी. जेवण ते काय त्याला ना चव ना धव. तुम्हाला सांगते माझ्यासाठी वेगळे पदार्थ करतात. ते चांगल खातात." मालू ताई सांगत होत्या.

विषय परत सुनांवर आला. म्हणजे त्या मावशी विशेष बोलत नव्हत्या. मालू ताई नीता बद्दल खूप सांगत होत्या.

"अस नसेल हो ताई. तुमच वय बघा. साध जेवण ठीक आहे. "

" आज ही त्यांना मसाले भात केला होता. मला मुगाची खिचडी. "

" आहे त्यात समाधान मानायच. तुमची तरी चांगली परिस्थिती आहे. मूल नीट वागतात. बाकी कडे बघा किती त्रास आहे." मावशी म्हणाल्या.

"आपण चांगल तर जग चांगल असत." मालू ताईंने ते क्रेडिट स्वतः कडे घेतल.

" आई तुला पथ्य किती आहेत. "मनीषने त्या बोलत होत्या ते ऐकलं.

" हो ना रे. "

" मग तरी तू नीता बद्दल अस का सांगत होती की ती तुला वेगळ जेवण देते. ती तुझ किती करते. " मनीष चिडला होता.

" मी बरोबर बोलते आहे. " मालू ताई हट्टाने म्हणाल्या.

" खा तुला काय खायचं ते नंतर त्रास झाला तर सांगू नकोस."तो चिडला होता.

" तू चिडला का मनीष? नीता तर काही माझ्याकडे बघत नाही. तू ही तसच कर."

" आई चल आत. आराम कर. किती तेच ते बोलणार आहेस. "

नीता टीव्ही बघत होती. मालू ताई तिच्या जवळ बसल्या. हा कोण आहे? तो कोण आहे? त्यांच काय नात आहे? रोज तेच विचारत होत्या. अजिबात शांतता लाभू देत नाही.

" आजी तु ही सिरियल बघत नाहीत ना मग शांत रहा ना."श्रुती म्हणाली.

शेवटी नीता टीव्ही बंद करून आत गेली. मनीष झोपायला आला. ती त्याच्याशी जास्त बोलली नाही. ती ही शेवटी कंटाळून गेली होती.

🎭 Series Post

View all