यांना चांगल्या लोकांची कदर नाही भाग 4 अंतिम
©️®️शिल्पा सुतार
"आई तू किती चांगली आहेस." श्रुती म्हणाली.
" हो ना तिच्या साध्या स्वभावाचा सगळे फायदा घेतात." मनीष म्हणाला.
******
" नीलेश मला फिरायला ने. थोडी फार ओळख करून दे." मालू ताई सोसायटीच्या गार्डन मधे बसल्या होत्या. दोन चार बायकांशी ओळखी झाल्या. त्या दोघी सुना बद्दल सांगत होत्या.
"माझ म्हणजे आगीतून निघून फोफोट्यात पडली अस झाल आहे. ती सून तर फारच गुणी होती. ही त्यापेक्षा जास्त आहे. हाताला काही चव नाही. ना काही करण ना प्रेमाने विचारपूस. चाललं म्हणून चाललं आहे. काय करता कोणाला सांगता." मालू ताई नेहमी प्रमाणे गार्हाणे गात होत्या.
नीलेशने ऐकलं. तो मनीष सारखा गप्प बसणारा नव्हता. ते दोघ घरी आले.
" आई काय हे वागणं? तू तिकडे काय सांगत होती? कोणाशी काय बोलाव काय बोलू नये तुला समजत नाही का? तुला काय कमी केल तर तू अशी करते? "
मालू ताई घाबरल्या. "मी बरोबर बोलते आहे." त्यांनी मान्य केल नाही.
त्या दिवसा पासुन नीलेश त्यांच्याशी जास्त बोलत नव्हता. त्यांनी काही मागितल की रोहीतला सांगायचा. रोहीत त्यांना फिरायला न्यायचा. तो हेड फोन वर गाणे ऐकायचा. नाहीतर फोनवर बोलत असायचा. मालू ताई कंटाळून जायच्या. रोहीत घरी चल म्हटलं की तो त्यांना लिफ्ट पर्यंत सोडून द्यायचा.
रिमा तठस्थ होती. तेच बर. तस रहायला हव. जास्त पुढे पुढे केल की गैरफायदा घेतात.
मालू ताई एकट्या पडल्या होत्या. घरचे कर्तव्य करत होते. दोन वेळ जेवण, औषध, कपडे वेळेवर मिळत होते.
मालू ताई आजारी पडल्या. त्या सारखी मनीषची आठवण काढत होत्या.
"आता तिकडे जायच नाही. थोडे दिवस इथे रहा." नीलेशने त्यांना जावू दिल नाही.
******
नीता ट्रीपला जावून आली. थोडे दिवस माहेरी ही गेली होती. ती खुश होती. मनीष ती रोज फिरायला जात होते. घरात आनंदी वातावरण होत.
मनीषचा फोन वाजत होता नीता ताई फोन वर रडत होत्या. "मला तिकडे यायच मनीष. "
"नाही आई, नीता चांगली नाही. तुझे इकडे हाल होतात. तू रमा जवळ थांब. तुला ती आवडते. तिच्या हाताला चव ही आहे. नको ते. तू इकडे येते फिक जेवण मिळत. तू तिकडे बरी ."
"नाही मनीष माझे तिकडे हाल होत नाही. मला यायच."
"आई इकडे यायच असेल तर सदोदित कटकट चालणार नाही. जेवणाला नाव ठेवायचे नाहीत. नीताला काही बोलायच नाही. "मनीष म्हणाला.
" मान्य. "
" नीता, आई इकडे येणार आहे. पण आता तुझ आहे ते रूटीन सुरू ठेव." मनीष म्हणाला.
" हो आई लगेच वॉक बंद करू नकोस. "श्रुती म्हणाली.
"नाही मी आता मला हव तेच करणार आहे. आईंकडे लक्ष देवून उपयोग नाही. "नीता हळूच म्हणाली.
मालू ताई इकडे आल्या. मनीष त्यांना हॉस्पिटल मधे घेवून गेला. थोड्या दिवसांनी त्यांचे नेहमी प्रमाणे नखरे सुरू झाले. त्या खूप त्रास देत होत्या. आता कोणी लक्ष देत नव्हतं. श्रुती, नीता अलिप्त होत्या. मनीष त्यांच्याकडे बघत होता.
"मी एकटी पडली मनीष, नीता बदलली. दिवसा ही ती माझ्याशी बोलायला येत नाही ."मालू ताई म्हणाल्या.
" ती बोलायला आली की तू तिचा अपमान करतेस. नाही नाही ते बोलतेस. म्हणून ती अलिप्त आहे आणि तिला अस वागायला मीच सांगितल आहे. तिने कधीच अस वागायला हव होत. जरा उशीर झाला. "
" अस का बोलतोस मनीष? "
" आई आपल्या सोबत रहाताना इतरांना बर वाटेल अस वागायला हव ना . आपल्या मुळे इतरांना त्रास होतो ते समजत नाही का? किती वर्ष ती सहन करेल? आमच ही वय झाल. " मनीष म्हणाला.
"तू आधी असा नव्हता. आता बदलला. मी वृद्धाश्रमात जाते. माझी तिकडे सोय कर. "मालू ताई धमकी देत होत्या.
" चालेल उद्या चौकशी करतो. तुला सांगतो. "मनीष म्हणाला.
मालू ताई घाबरल्या. त्यांना वाटल नव्हतं मनीष अस म्हणेल. खरच पाठवून दिल तर? त्या चपापल्या.
" आई जायच का घर सोडून? तिकडे पोहोचवून येवू का? " मनीष दुसर्या दिवशी विचारत होता.
मालू ताईंनी मुद्दाम दुर्लक्ष केल. आता त्या घरात बर्यापैकी शांत होत्या.
आज नीताकडे किटी पार्टी होती. तिच्या मैत्रिणी आल्या होत्या. खूप पदार्थ केले होते. खमंग वासाने मालू ताई बेचेन झाल्या होत्या. त्या रूम मधे फेर्या मारत होत्या. नीता आत आली." आई या ना आमच्यात बसा. "
"कोण आल?"
"माझ्या मैत्रिणी."
त्या साडी बदलून आल्या. नीताने त्यांना डिश दिली. त्यांच्यासाठी दोन तीन पदार्थ केले होते. त्या ही बायकांमधे रमल्या.
रात्री जेवताना त्या मनीषला दुपारी बर वाटल्याच सांगत होत्या.
"आई बघ हसत खेळत राहील तर चांगल वाटत ना. "
हो.
मालू ताई, श्रुती बाहेर फिरायला आल्या. बाजूच्या मावशी बसलेल्या होत्या. आज मालूताई इकड तिकडच्या गप्पा करत होत्या. त्यांनी अजिबात घरचा विषय घेतला नाही. श्रुती लक्ष देवून होती. "आजी गुड प्रोग्रेस. "