Login

यांना चांगल्या लोकांची कदर नाही भाग 3

यांना चांगल्या लोकांची कदर नाही
यांना चांगल्या लोकांची कदर नाही भाग 3

©️®️शिल्पा सुतार

नेहमी प्रमाणे मालू ताई पहाटे उठून बसल्या. खुडबुड सुरू होती. "मनीष अरे मनीष मला गरम पाणी दे. घोटभर चहा हवा आहे."

"आई थांब जरा सात वाजता देतो मला झोपू दे."

श्रुतीने उठून पाणी दिल. "आजी तुला झोप येत नाही. तू इतरांना ही झोपू देत नाही."

"ऊन पडे पर्यंत झोपता का?" मालू ताई बडबड करत होत्या.

"आता सकाळी सुरू करू नकोस. जा तुझ्या रूम मधे बस." श्रुती त्यांना आत सोडून आली.

नाश्ता करतांना मनीष विचारात होता. "मी एक ठरवल आहे."

"काय?" श्रुती, नीता मनीष कडे बघत होत्या.

त्याने फोन काढला. नीलेश फोन केला." थोडे दिवस आईला घेवून जा."

" दादा आम्हाला जमणार नाही. घरी कोणी नसत. तिला काही झाल तर. "

" काही होत नाही. तिला सांभाळायला बाई ठेव नाहीतर काहीही कर. आई खूप त्रास देते. आम्ही कंटाळलो आहोत. थोडे दिवस बघ जरा." मनीष म्हणाला.

"हो ठीक आहे रविवारी येतो." नीलेश म्हणाला.

"अहो पण तिकडे आईंची ठेप कोण ठेवणार?" नीताला काळजी वाटत होती.

"असू दे. इथे आपण चांगल वागतो ते तिला नको आहे."

"तुम्ही त्यांच्या शिवाय राहू शकाल का? " तिने विचारल. त्या माय लेकाचा एकमेकांवर खुप जीव होता. हे सगळ्यांना माहिती होत.

" हो, मी आईला काही बोलू शकत नाही. अस तरी तिला समजेल. थोडे दिवस जावू दे. "

रविवारी नीलेश, रमा आले. मालू ताई त्यांना बघून खुश होत्या. नीता बद्दल खूप सांगत होत्या.

" आई थोडे दिवस याच्या सोबत जा. तिकडे रहा इथे नीता तुझी काळजी घेत नाही. तिला काही येत नाही. तुला नुसता फिका स्वयंपाक असतो." मनीष त्यांच्या रूम मधे जात म्हणाला.

" मनीष अरे अस नाही. रमा घरी नसते. मी तिकडे कस राहू? "मालू ताई म्हणाल्या.

" मग काय झाल? तेवढाच तुला बदल होईल. तुला कशाला हवी चोवीस तास असिस्टंट. "मनीष ऐकत नव्हता.

" मला माहिती आहे हे नीताने सुचवल ना? तिला मी नको असते. "

" उगीच आता जास्त बोलू नकोस. जा थोडे दिवस." मनीष म्हणाला.

मालू ताई... नीलेश, रमा समोर काही बोलू शकल्या नाही. त्या निघाल्या.

नीलेश, रमा दोघ ही नाखूष दिसत होते. ते कार मधे बसले. मालू ताई मागे बसल्या. मनीष शांत झाला होता." मनीष येते मी . श्रुती अभ्यास कर. "

नीता त्यांच्या पाया पडली. त्या तिच्याशी बोलल्या नाहीत.

"अहो आईना इथे राहू द्या . त्या नाराज आहेत." नीता म्हणाली.

" नाही नीता तू आत जा मी बरोबर करतो आहे."

कार निघाली. नीता, मनीष, श्रेया आत आले. आता घर शांत झाल होत . त्यांच्यात कधीच काही वाद नव्हते. मालू ताई गेल्यामुळे मनीष गप्प होता. जावू दे आई ही ऐकत नाही.

मालू ताई नीलेश कडे पोहोचल्या. ते दोघ सामान घेवून आत गेले. त्यांचा मुलगा रोहित आला. "आजी चल."

" अरे माझा बाळ किती मोठा झाला. नीलेश कुठे आहे त्याला बोलाव."

"आजी मी आहे ना."

त्यांना प्रत्येक वेळी मुल सेवेसाठी हवे असायचे.

त्यांना जेवायला दिलं.

"अस का लागत आहे?" मालू ताईंना जेवण आवडल नाही.

"आज आम्ही तिकडे आलो होतो तर कूकने स्वयंपाक केला." नीलेशने सांगितल.

दुसर्‍या दिवशी कोणी घरी नव्हत. रिमा, नीलेश ऑफिसला गेले. रोहीत कॉलेजला. मालू ताई कंटाळल्या. तस रिमा सगळं करून गेली होती. पण स्वतः च्या हाताने घ्या. गार जेवण. एकट जेवा. टीव्ही तरी किती बघणार. पहिल्याच दिवशी त्या कंटाळल्या.

संध्याकाळी ते सगळे परत आले. रोहीत त्याच्या रूम मधे होता. रिमा आवरत होती. वॉशिंग मशीन लाव, स्वयंपाक कर अस सुरू होत. नीलेश मीटिंग मधे होता. परत मालू ताईंशी बोलायला कोणी नव्हतं.

मी मनीष कडे बरी होती. रात्री जेवताना नीताने सांगितल त्या प्रमाणे मालू ताईंंचा साधा स्वयंपाक होता. त्यांनी हट्टाने तिखट भाजी घेतली. दुसर्‍या दिवशी खूप त्रास झाला. घरात कोणी नव्हतं. त्या एकट्याच होत्या. त्यांनी मनीषला फोन केला तो ही ऑफिस मधे बिझी होता फोन उचलला नाही. श्रुतीने फोन उचलला.

"अग श्रुती मला त्रास होतो आहे."

"आजी तब्येत सांभाळ. साध खात जा. हे बघ मी क्लास मधे जाते आहे. गोळी घेवून झोप. तो पर्यंत काका येईल."

"तू मनीषला सांग मला तिकडे यायच."

"आता येवू नकोस. थोडे दिवस तिकडे रहा." तिने फोन ठेवला. आता मालू ताई रडत होत्या.

रात्री ती नीताला मालू ताईं बद्दल सांगत होती. अहो...

" काहीच बोलू नकोस नीता. तुला ट्रीपला जायच तू तयारी कर आणि जा. जरा मोकळ रहा. "
0

🎭 Series Post

View all