यासाठी कुठेच क्षमा नाही भाग 4 अंतिम

Kuthech Kshma Nahi
यासाठी कुठेच क्षमा नाही
भाग 4 अंतिम

तुला कसे कळले हे ?? ती

तू त्या दिवशी रात्री स्वप्नात ही हेच सांगत होतीस तुझ्या देवाला ,की मला जुळे होऊ दे मी त्यातलं एक वहिनीला देऊ शकेल...पण कृपया जुळेच होऊ दे..बघ विसरू नकोस असे काही तरी बोलत होतीस तू..

पण होईल ना आपल्याला जुळे, मला वहिनीला आई झालेले पहायचे आहे रे..


होईल पण आधी ह्या आनंदात आंनदी रहा...देवाकडे कसली मागणी केली आणि ती पूर्ण नाही होणार असे होत नाही...तू मनापासून मागितले आहेस तर नक्की होईल..

इकडे डीलव्हरी जवळ असते..आणि छोटीला मुल होते..पण दुर्दैवाने फक्त एक मुल होते..
दोघांना खूप दुःख होते ,छोटी खूप नाराज असते, झालेल्या बाळाकडे ही बघत नाही...तिला सतत।वहिनी डोळ्यासमोर दिसते...

इकडे नवरा तिला समजावत असतो, तू वाईट मानून घेऊ नकोस देवा सर्व ठीक करणार आहे ,आणि तसे ही हे बाळ वहिनीला आई म्हणणार असे होईल..मोठी आई म्हणायला शिकवू आपण त्याला मग तर झालं ना..!


काही दिवसात ती हॉस्पिटलमधून घरी येते, तर वहिनी तिचे खूप मनापासून स्वागत करते, तेव्हा सासूबाई ही खूप आनंदात बाळाचे आणि बाळाच्या आईचे स्वागत करते...आणि म्हणते बाळाचा पायगुण किती भारी आहे बघ तो घरात येताच दुसऱ्या बाळाला ही बोलावून घेतले आहे त्याच्यासोबत खेळायला..

छोटी ऐकून थोडा वेळ सासूबाईकडे बघतच असते, तिला काही कळत नाही...तेव्हा सासूबाई म्हणते हा फुलांचा पाळणा आता तुझ्या मोठ्या वहिणीसाठी पुन्हा काढावा लागणार आहे बरं छोटी ...

इकडे छोटी सून खूप खुश होते आणि मोठ्या वहिनीकडे बघते...तेव्हा तिला कळते की देवा कडे जे मागितले ते अश्या रीतीने पूर्ण होणार आहे...म्हणजे वहिनी आई होणार आहे...म्हणजे त्यांना हे सुख लाभणार आहे..

ती लगेच बाळ सासूबाई कडे देते आणि वहिनीला बिलगले...वहिनी तू आता एकटी नसणार ईथुनपुढे...तुला जगातील सगळे सुख मिळो हेच मागितले होते..आणि ते पूर्णच झाले ग..

सासूबाई दोघींची ही नजर काढते आणि मनोमन स्वतःला नशीबवान समजते आणि दोष ही देते आपण किती मूर्खपणा केला...अंधश्रद्धा मनात ठेवून दोघींना ही ओटी भरण्यापासून विंचित ठेवणार होतो... खरे तर अशाने कोण्या मुलीचे स्त्रीचे मन दुखवतो...ज्याची कुठेच क्षमा नाही

©®अनुराधा आंधळे पालवे

🎭 Series Post

View all