जलदलेखन स्पर्धा - नोव्हेंबर - 2025
दिव्याखाली अंधार भाग -1
यशोधरा ताई, गावात नावाजलेली, सतत सेवा करणारी, सतत उपास-तापास करणारी एक आदर्श स्त्री,आणि सुमेधा, नुकतीच लग्न होऊन आलेली, शिकलेली, नोकरी करणारी पण मन खूप कोमल असलेली त्यांची सून.
घरात वरकरणी शांतता होती, पण आतून एक न बोललेलं अंतर कायम दोघींत होतं.
कारण…
सगळं जग यशोधराचे कौतुक करत होतं — पण तिच्या स्वतःच्या घरात मात्र दिव्याखालीच अंधार होता.
सुमेधाचं लग्न झालं तेव्हा सगळ्यांनी तिला खूप प्रेम दिलं. पण काळ जसजसा पुढे गेला, सासू-सूनमधील छोटे-छोटे गैरसमज वाढत गेले.
यशोधरा दिवसाभरात बऱ्याच लोकांना मदत करायची, कुणाला औषधं, कुणाला जुने कपडे, गावात तिचं नाव मोठं. प्रत्येक जण म्हणायचा....
“यशोधरा ताई म्हणजे देवदूत!”
“या बाईंच्या पुण्यामुळेच गाव चाललंय.”
पण सुमेधाला नेहमी जाणवायचं,
माझ्यासाठी मात्र कधी वेळ नाही.
माझ्यासाठी मात्र कधी वेळ नाही.
एक दिवस सुमेधेला ताप होता.
ती स्वयंपाकघरात उभी होती, कांदा चिरताना हात थरथरत होता.
“आई… मी झोपते थोडावेळ, मला जरा बरं नाही वाटत,” ती म्हणाली.
यशोधराताईने उपमा करताना चमचा ढवळतच उत्तर दिलं,
“ आज गार्डन साफ करायला गडी मंडळी आहेत,, त्यांना जेवण हवे आहे, त्याआधी त्यांना नाष्टा पण देऊन दिवस सुरू करायचाय.” तू नंतर आराम कर, आधी मला मदत कर.
सुमेधाने मनात म्हंटल,बाहेरच्या लोकांसाठी ह्यांच्या मनात प्रेम पुरेपूर ओतू जातं, पण घरातं कोणी आजारी असेल तर त्याची काळजी मात्र नाही.
एकदा गावात “सेवा सप्ताह” ठेवला. यशोधरा ताई अध्यक्ष.
सभागृहात तिच्यावर स्तुतींचा वर्षाव होत होता.
सभागृहात तिच्यावर स्तुतींचा वर्षाव होत होता.
“तुमच्या आत्मत्यागामुळे अनेक घरांना आधार मिळालाय!”
“तुम्ही या गावाची आई आहात!”
“तुम्ही या गावाची आई आहात!”
सगळ्यांना तिचं रूप देवासारखं वाटत होतं.
सुमेधा मात्र शेवटच्या रांगेत बसून ऐकत होती.
तिच्या मनात एक टोचणी —
गावाची आई आहे… पण घरातली सून मात्र एकटी.
त्या दिवशी घरी आल्यावर सुमेधाने तिला प्रेमाने विचारलं,
“आई, सगळे तुमचं एवढं कौतुक करतात… त्यांना बघून मलाही बरं वाटतं.
पण एक विचारू का?
मी काही चुकीचं करत असेन तर सांगा… आपल्यात नेहमी अंतर का?” तुम्ही कायम माझ्याशी फटकूनच वागता, प्रेमाने कधीच कां माझ्याशी बोलत नाही तुम्ही.
पण यशोधरा जरा कठोर आवाजात म्हणाली —
“का? इतक्या लोकांचं मी सांभाळतेय. तुला काय कमी आहे ?
तू पण थोडं समजून घ्यायचं. सासूबाई आहे मी अशीच असते सासू...
सुमेधा शांत.
हे सासूचे शब्दचं तिला वेदना देणारे होते.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत- यशोधरा जगाला दाखवण्यासाठी मोठेपणा करत असते आणि त्याचं पुढे काय होतं )
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा