यात्रा भाग 13
मागच्या भागात आपण वाचले बंदुकीच्या गोळीचा आणि आबासाहेबांचा आवाज एकूण साक्षीने कुस्त्याच्या मैदानाकडे धाव घेतली. आता पुढे..
लोकांच्या गर्दीला कापत साक्षी आत गेली. समोरचे दृश्य पाहून तिची शुद्ध हरपली होती. अजिंक्य रक्ताच्या थारोळ्यात आडवा पडलेला होता.आबासाहेबांनी त्याचं डोकं आपल्या मांडीवर उचलून घेतल होतं.
आबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर वहात होता.
"अजिंक्य राव का मधी आला तुमी. आव ती गोळी आमच्यासाठी होती. काय केलत हे."
असे म्हणत,"अरे ए गाडी बोलीवली का नाय" असे तिथे उभे असणाऱ्यांना दरडावून विचारत होते.
असे म्हणत,"अरे ए गाडी बोलीवली का नाय" असे तिथे उभे असणाऱ्यांना दरडावून विचारत होते.
अजिंक्य ला अशा अवस्थेत बघून साक्षी मोठ्याने अजिंक्य म्हणून ओरडली आणि अजिंक्य जवळ गेली.तिने त्याचा रक्ताने भरलेला हात हातात घेतला, त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ....हुंदके देतच ती बोलत होती
"अजिंक्य ...अजिंक्य काय झाले हे. तुला काही नाही होणार...डॉक्टर ... डॉक्टर.आबासाहेब डॉक्टर कुठेयेत? बोलवां त्यांना लवकर....नाही घेऊन चला ...अजिंक्य .. हॉस्पिटल कुठंय...."
अजिंक्य आबासाहेबांशी आणि साक्षी शी बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला बोलता येत नव्हते. तिथेच राधा आदित्यला घेऊन बसली होती.आदित्य त्या आवाजाने रडत होता.त्याला पाहून अजिंक्य कासावीस झाला त्याने हात थरथरत बाळाच्या गालाला लावला.
तोपर्यंत विलास तिथे पोहोचला,
तोपर्यंत विलास तिथे पोहोचला,
"अजिंक्य काही नाही होणार तुला. मी काही होऊ देणार नाही."
असे म्हणत त्याने अजिंक्य ला उचलले कार मध्ये ठेवले. त्याच्यासोबत साक्षी बसली. पुढे आबासाहेब आणि विलास होते.
विलास भरधाव वेगाने गाडी पळवत होता.पण कदाचित नियतीला वेगळेच घडवायचे होते. हॉस्पिटलमध्ये पोहोचायच्या आधीच अजिंक्यचे डोळे मिटले.त्याचा श्वास थांबला हे पाहून साक्षी जोरात ओरडली..
विलास भरधाव वेगाने गाडी पळवत होता.पण कदाचित नियतीला वेगळेच घडवायचे होते. हॉस्पिटलमध्ये पोहोचायच्या आधीच अजिंक्यचे डोळे मिटले.त्याचा श्वास थांबला हे पाहून साक्षी जोरात ओरडली..
"अजिंक्य ...."
विलासने जोरात गाडीचा ब्रेक दाबला.
******
विलासने जोरात गाडीचा ब्रेक दाबला.
******
सदाने गाडीचा जोरात ब्रेक दाबला त्या ब्रेकच्या आवाजाने
साक्षी आपल्या पाच वर्षापूर्वीच्या आठवणी मधून भानावर आली. तिला दरदरून घाम फुटला होता. डोळ्यात अश्रूंच्या धारा. कसेबसे तिने स्वतःला सावरले आपल्या चिमुकल्याच्या डोक्यावरून हात फिरवत तिने विलास ला विचारले

"काय झाले? का थांबलो आपण?"
"आपण पोहोचलो"
साक्षी कडे बघत विलास म्हणाला. तिची अवस्था पाहून त्याने परत विचारले
"तुम्ही ठीक आहात ना .खाली उतरायचे का?"
साक्षी कडे बघत विलास म्हणाला. तिची अवस्था पाहून त्याने परत विचारले
"तुम्ही ठीक आहात ना .खाली उतरायचे का?"
"हो"....साक्षी
विलासने साक्षीला पाण्याची बॉटल दिली. साक्षीने पाणी पिले.तिने गाडीच्या काचा खाली केल्या, बाहेर नजर टाकली.
पाच वर्षापूर्वी जो वाडा दिमाखात उभा होता, मोठ्या आनंदाने ज्याने तिचे स्वागत केले होते तो आज निपचित पडला होता. त्याच्यावर दुःखाचे सावट पसरले होते. साक्षीचे मन आतमध्ये जाण्यासाठी तयार होत नव्हते पण कर्तव्य तिला मागेही हटू देत नव्हते.
तीआदित्यला घेऊन खाली उतरली.
तीआदित्यला घेऊन खाली उतरली.
"ममा आपण कुथे आलो आहे?"आपल्या बोबड्या आवाजात आदित्यने विचारले
"आपण आजोबांना भेटायला आलो आहे."असे म्हणत साक्षीने आदित्यचा हात पकडला.
विलास साक्षी आणि आदित्यला घेऊन वाड्यात आला
आबासाहेबांच्या रूम बाहेर सगळेच बसले होते.
विनायकराव - छाया, सुरेश - जया, रमेश - राही.सर्वांचेच चेहरे चिंताग्रस्त वाटत होते.
विलास साक्षी आणि आदित्यला घेऊन वाड्यात आला
आबासाहेबांच्या रूम बाहेर सगळेच बसले होते.
विनायकराव - छाया, सुरेश - जया, रमेश - राही.सर्वांचेच चेहरे चिंताग्रस्त वाटत होते.
साक्षीने वाड्यात प्रवेश करताच सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले.
पाच वर्षांपूर्वी तिचे स्वागत करणाऱ्या नजरा बदलल्या होत्या. आताच्या नजरा तिला टोचत होत्या. त्याच्याकडे दुर्लक्ष करत ती पुढे गेली.
तिला आणि आदित्यला पाहून मनातून कितीही वाटत असेल तरी जया आणि राहीने स्वतः ला जागेवरच थांबवले.न राहून छाया मात्र पुढे यायला निघाली तर विनायकरावांनी तिचा हात पकडला. ती ही जागेवरच थांबली. साक्षीला बघून तिच्या डोळ्यात पाणी आले. कसेबसे तिने ते आवरले आणि आपली नजर दुसरीकडे वळवली.

राधा ही तिथेच होती. ती पळतच साक्षी कडे आली.
"वहिनीसाहेब...."
भरल्या डोळ्यांनी तिने साक्षीला मिठी मारली.
आदित्यला घेण्यासाठी तिने हात पुढे केले पण आदित्यने तिचा हात झटकला आणि तो साक्षीला बिलगला.
भरल्या डोळ्यांनी तिने साक्षीला मिठी मारली.
आदित्यला घेण्यासाठी तिने हात पुढे केले पण आदित्यने तिचा हात झटकला आणि तो साक्षीला बिलगला.
"बर बर नाय हात लावत."......राधा
रमेश ,सुरेश, विनायकराव यांच्या चेहऱ्यावर असणाऱ्या रागामुळे साक्षीचे मन अस्वस्थ झाले.
" नक्की काय झाले आहे विलास. तू माझ्यापासून अजून काही लपवले आहे का?"
साक्षीने विलास ला हळूच विचारले.
साक्षीने विलास ला हळूच विचारले.
"काहीच नाही".
विलास राधाला
"राधा हे सगळे असे बाहेर का थांबलेत? आणि यांच्या सर्वांच्या तोंडावर बारा का वाजलेत?"
"राधा हे सगळे असे बाहेर का थांबलेत? आणि यांच्या सर्वांच्या तोंडावर बारा का वाजलेत?"
ते ईलास दादा वकील साहेब आल्यात. आबासाहेबांनी आतमंदी फगस्त आक्कासाहेबासणी थांबाया सांगितलं म्हणून मग सगळीच चिडलेत."
"हे काय आता नवीन"
राधाचे बोलणे ऐकून साक्षी म्हणाली.
राधाचे बोलणे ऐकून साक्षी म्हणाली.
"आधी आपण आत जाऊया का ?"......विलास
" अचानक आबासाहेबांनी वकील का बोलवला"
स्वतःशीच विचार करत विलास साक्षीला घेऊन आत गेला.
क्रमशः
स्वतःशीच विचार करत विलास साक्षीला घेऊन आत गेला.
क्रमशः
साक्षीला आणि आदित्यला बघून आबासाहेब बरे होतील का ?? वाचू पुढच्या भागात.