Login

यात्रा - भाग 1

Yatra - Fortuitous Circumstance
यात्रा - भाग १

"यात्रा" ही कथा पुर्णतः काल्पनिक आहे.

या कथेतील साक्षी, फॅशन डिझायनर आहे आणि ती तिचे बुटीक चालवते.ती ,आई आणि तिचा सहा वर्षाचा मुलगा आदित्य असे तिघे मोठ्या शहरात राहतात.
वाचू साक्षीची कहाणी यात्रा या कथेत.


(गावाकडील यात्रेचे दृश्य.)
मोठा यात्रेतील पाळणा, छोटे- मोठें सगळेच त्यात बसून त्याचा आनंद घेताय,
मंदिरावर छान लायटिंग, यात्रेतील दुकानं गर्दीनं तुडुंब भरलेली,
"वहिनीसाहेब,नुसत बगता काय घ्या की कायतरी; तुमच्या तिकडल्यापरिस भारी नाय पण इतली आटवन मनुन घ्या."

अचानक काहीतरी गडबड, सगळे इकडे - तिकडे पळायला लागले.

काय झाले,राधा ताई हे असे का पळतायेत....

वहिनीसाहेब माग वा. कायतरी बिनसलं वाटत.

एक व्यक्ती धापा टाकत....

वहिनीसाहेब माग फिरा.....

तेवढ्यात मागून एक बंदुकीची गोळी झाडल्याचा आवाज ......
आणि त्यानंतर एक भारदस्त पुरुषी आवाज....
"अजिंक्य राव...."

मोबाईल मधला अलार्म वाजला......
(स्वप्न होते.)
साक्षी घाबरून जागी झाली.तिने घाईने आलाराम बंद केला.ती पूर्णपणे घामाने भिजली होती,हातानेच तिने कपाळावरचा घाम पुसला.
बेडच्या शेजारीच साईडटेबल वर पाण्याचा जग होता ..
साक्षीने ग्लास मध्ये पाणी घेतले. तिने एका दमात सगळं पाणी पिऊन टाकले .ग्लास टेबलवर ठेवला.अजूनही तिच्या छातीतील धडधड थांबलेली नव्हती.तिने
तसेच मागे बेडवर डोकं टेकवले. डोळे मिटून घेतले. तिच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.. दोन-तीन मिनिट ती तशीच बसली.थोड्यावेळाने तिने स्वतःला सावरत डोळ्यातले पाणी पुसले.पडलेल्या स्वप्नामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती. तिने शेजारी बघितले
पाच - सहा वर्षाचा छान गोजिरवाणा मुलगा शांत झोपलेला होता. साक्षीने त्याच्या कपाळावर हळूच आपले ओठ टेकवले. त्याच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवला. ती तशीच त्याच्याशेजारी आडवी झाली.

अर्धा - एक तासाने कोणाच्यातरी बोलण्याच्या आवाजाने साक्षीला जाग आली.

साक्षीने मोबाईलमध्ये बघितले साडेसात वाजले होते.
उठून ती रूम मधून बाहेर आली.

" आई, कोणाशी बोलत होतीस."

" हि आपली कामवाली वीणा, आज येणार नाही म्हणून सांगायला आली होती."

का?

"तिची आई आजारी आहे म्हणून गावाकडे जाणार आहे भेटायला. "

"अच्छा."

"फ्रेश हो.तुझ्यासाठी चहा ठेवते."

"हो,आलेच."

साक्षी आणि तिची आई डायनिंग टेबलवर बसून चहा घेत होत्या..

"मस्त झाला आहे चहा. आत्ताशी कुठे डोकं हलकं झालं."

"काय ग काय झाले डोकं जड व्हायला."

साक्षीने डोळ्यावर येणारे केस मागे करत आईकडे फक्त बघितले.

साक्षीच्या हातावर हात ठेवत आई ने विचारले
"परत तेच स्वप्नं ....साक्षी, तू कधी निघणार आहे बाहेर या सगळ्यातून. तुझं तुला आता बाहेर यायला हवे यातून
आदीसाठी तुला हे विसरून पुढे जायला हवं."

"आई,मी प्रयत्न करते ग. पण पाच वर्ष होत आले तरी त्या गोष्टी डोक्यातून जात नाहीत."


या दोघी बोलत असतानाच पहाटे साखर झोपेत असलेला छोटा आदित्य ओरडतच आला
"मम्मा, आज्जी..."

"अरे उठलं माझं सोना.ये इकडे "अस म्हणून आज्जीने आदित्यचे दोन - तीन पापे घेतले.

"मम्मा आज आपण आइस्क्रीम खायला जायचं.... तु प्रॉमिस केलं होत मला ...हो ना ग आज्जी."

"हो तर." .....आई साक्षीकडे बघत हसून म्हणाली.

"हो जाऊ. संध्याकाळी दोघंही रेडी रहा. मी शॉप मधून आले की लगेच जाऊ.आता मी आवरते, नाहीतर मला उशीर होईल."

"आदी तू पण लवकर आवर.आज्जीला त्रास देऊ नको."
असे म्हणून साक्षी आवरायला गेली.

ठरल्याप्रमाणे साक्षी संध्याकाळी लवकर घरी आली होती.त्यानंतर सगळे फिरायला बाहेर गेले . त्यांना घरी यायला रात्रीचे नऊ वाजले होते.

"आज किती मज्जा आली ना आजी."
छोटा आदित्य उड्या मारत म्हणाला.

"हो ना खूप मज्जा आली."

"हो आता झोपा लवकर. उद्या स्कूल पण आहे."....साक्षी.

"जातो ग मम्मा. पण नेक्स्ट संडेला पण जायचे." आदित्य लाडात येऊन म्हणला.

"ते आता नंतर बघू .आधी जाऊन झोपायची तयारी कर."
असे म्हणून साक्षी आदित्यची पप्पी घेतली.

आजी आपल्या लाडक्या आदित्यला घेऊन गेली.

थोड्यावेळात दारावरची बेल वाजली.

साक्षी स्वतः शीच ... घड्याळात बघत, 'आत्ता कोण असेल.'

तिने दार उघडले..

बाहेर एक व्यक्ती उभा होता.

कोण तुम्ही?

"मी महादेव नगरहून आलोय.आत येऊ का?"

हे एकूण साक्षी पुतळ्यासारखी स्तब्ध झाली.
थोड्यावेळ काहीच बोलली नाही.

ती व्यक्ती पुन्हा एकदा.....

"वहिनीसाहेब,आत येऊ का?"

क्रमशः


काय झाले साक्षीला?कोण असेल ती व्यक्ती? साक्षीचा आणि महादेव नगर चा काय संबंध.
वाचू पुढच्या भागात..


0

🎭 Series Post

View all