Login

यात्रा- भाग 5

Marathi Story- Yatra - Fortuitous Circumstance
यात्रा- भाग 5

मागच्या भागात आपण वाचले साक्षी आणि अजिंक्य महादेव नगरला निघाले होते .आता पुढे..

*********

साक्षी आणि अजिंक्य चा प्रवास सुरू झाला.अजिंक्यच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. तो आनंद साक्षीच्या नजरेतून सुटला नाही.
अजिंक्य आपल्याच नादात गुणगुणत होता.

"अरे वा !काय चेहरा खुलला आज एका माणसाचा."

हे ऐकून अजिंक्य हसला.

"खरंतर अजिंक्य, तुझ्याकडे पाहून मला असे वाटते आहे की ,एखादी सासरवाशिन स्री माहेरी जाण्यासाठी निघाली आहे.त्या स्त्रीला जसा आनंद होतो ना अगदी तसा आनंद झाला आहे तुला."

"हो ,अगदी बरोबर बोलतीयेस तू."

"हो काय?
म्हणजे मी तुझा छळ करते की काय?"

दोघेही हसले.

"तसं नाही ग,पण दोन वर्षातून आबा आणि अक्काला भेटणार आहे.किती दिवस झाले खूप वेळा वाटायचं जावं भेटायला पण आबांचा तो रागावलेला चेहरा समोर दिसायचा आणि पाय जागेवरच थांबायचे.
तुला माहितीये मला असं वाटत होतं की,काहीतरी खूप मोठं ओझं ठेवल आहे माझ्यावर आणि त्या ओझ्याखाली मी दबून गेलो आहे.सारखी घुसमट होत होती माझी.पण आज ते ओझं बाजूला सरकले आणि मी खुल्या आकाशात मोकळा श्वास घेत आहे.
खूप दिवसातून फ्री वाटते आहे."

"हम्म..... मी समजू शकते.खरंतर तुझ्या या अवस्थेला नाही म्हटले तरी कुठे ना कुठे मीच जबाबदार आहे."

"असं नाही ग. असा उलटा समज नको करून घेऊ."

"समज नाही रे ,अजिंक्य मला पण सतत वाटायचे.. माझे तर बाबा मला सोडून गेले पण तुझे आहेत ना. तुझी तळमळ जाणवायची प्रत्येक वेळेस पण मी काहीच करू शकत नव्हते.
बाबांनी तुला लग्न करण्याची गळ घातली नसती तर"...

"तर ...तर काय.?"

साक्षी चे वाक्य मध्येच तोडत अजिंक्य म्हणाला,
"तर मला एवढी सुंदर बायको आणि एवढं छान गोंडस बाळ मिळालं नसतं."

साक्षीचा हात एका हाताने पकडत अजिंक्य म्हणाला.
"अग तुम्ही दोघं तर माझा श्वास आहात."

"जाऊदे आता त्या गोष्टी शेवटी दोन वर्षांनी का होईना आबांनी राग सोडलाच ना....
कधी पोहोचतोय घरी आणि कधी आक्काच्या हातचे चुलीवरचे पिठलं भाकरी खातोय असे झाले मला.
पिठल्याचं नाव काढताच तोंडाला पाणी सुटले माझ्या."

"हो पण जरा हळू चालव गाडी"..... साक्षी


थोडा वेळ अजिंक्य गाडी एका हॉटेलवर थांबवली.

छोटया आदित्यची ही झोप झाली होती.
साक्षीने त्याला थोडंसं खाऊ घातले.

साक्षी चा नाष्टा होईपर्यंत अजिंक्य आदित्यला खेळवत होता.

"अले, माझ पिल्लू आज कोणाला भेटणार आहे माहिती आहे का ? तुझ्या आजोबा आणि आजीला.काका ,काकू आणि आत्याही असणार आहेत तिथे.
मोठया झुपकेदार मिशीवाले आजोबा बघून रडायचे
नाही हा पिल्ला. नाहीतर आजोबा म्हणतील,
काय आदित्यराव आमच्या देशमुख घराण्याचे तुम्ही कुलदीपक आणि असे रडताय काय शोभत नाही तुम्हाला."
छोतुशा आदित्यला काही कळत नव्हते पण हे ऐकून साक्षीला मात्र खूप हसू येत होते.

******


थोड्यावेळातच गाडी महादेव नगर च्या रस्त्याने धावू लागली..महादेव नगर चा रस्ता म्हणजे जणू एखाद्या अभयारण्याचा रस्ता असल्यासारखाच.
रस्त्याच्या कडेने दाट हिरवीगार उंच उंच घनदाट झाडी. त्या झाडांवर दोन्ही बाजूंनी पक्षांचा किलबिलाट...
ते सगळं निसर्गसौंदर्य पाहून साक्षी खूप खुश झाली होती.

"वा !किती छान आहे रे आदित्य हे.
थांब ना इथे आपण फोटो काढूयात."

"नको .आत्ता नको."

येताना थांबू.

आधीच दोन-तीन फोन येऊन गेलेत विलासचे.

सगळेच आतुरतेने वाट बघतायत आपली.
येताना नक्की थांबू. प्रॉमिस."
****
थोड्याच वेळात गाडी महादेव नगरच्या वेशीजवळ पोहोचली आणि पुढचं दृश्य पाहून साक्षी आणि अजिंक्य थक्क झाले.

क्रमशः

कोणते दृश्य असेल पुढे वाचू पुढच्या भागात.

0

🎭 Series Post

View all