यात्रा - भाग 7
मागच्या भागात आपण वाचले साक्षी आणि अजिंक्य घरी पोहचले होते ....आता पुढे
"आबासाहेब, ही तुमची सून साक्षी आणि हा तुमचा नातू आदित्य".
आदित्यला आणि साक्षीला बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.सगळे त्यांना भेटण्यासाठी, बघण्यासाठी उत्सूक होते.
आक्कानी आदित्यच्या चेहऱ्यावरून हात फिरवून बोटं मोडली.
अजिंक्यची मोठी बहीण छाया आरतीचे ताट घेऊन पुढे आली तिने तिघांनाही ओवाळले.त्यानंतर सगळेजण वाड्यात गेले.
गावातले सगळ्या बायका साक्षीला भेटायला गर्दी करत होत्या, त्यामुळे बाहेर बराच गोंधळ चालू होता.

"राधे कशापाई एवढी गडबड हाय" .....आबासाहेब
"ते गावातल्या बायकासणी वाहिनिसाहेबासणी बघायचं हाय ".... राधा
हे एकूण साक्षीला हसायला आले.
"त्यांना म्हणावं सांच्याला या."....आक्का
राधा ने बाहेरची परिस्तिथी सांभाळली.
इकडे सगळे वसरीत आले.
वाडा जुना असला तरी सगळ्या सुविधा आबासाहेबांनी केलेल्या होत्या. प्रत्येकाला वेगळी रूम होती.
वाडा जुना असला तरी सगळ्या सुविधा आबासाहेबांनी केलेल्या होत्या. प्रत्येकाला वेगळी रूम होती.
साक्षी , सगळ्यांबरोबर तुझी ओळख करून देतो असे म्हणून अजिंक्यने साक्षीची सगळ्यांबरोबर ओळख करून दिली .
"मामा, मामी छान आहे." छोटी सोनपरी( अजिंक्यची भाची) एक बोट दाताखाली दाबत म्हणाली.
"तू पण खूप गोड आहे अगदी परीसारखी" असे म्हणत साक्षीने परीचे गाल ओढले.
दुपारची वेळ झाली होती. आककांनी जयाला ( मोठी सून) सगळ्यांना जेवायला वाढायला सांगितले.
छोटे मुलं आदित्यशी खेळण्यात गुंग झाले. मुलांमुळे आदित्यही न रडता खेळायला लागला होता. छाया ( अजिंक्यची चुलत बहीण)साक्षीला तिची रूम दाखवायला घेऊन गेली.
छोटे मुलं आदित्यशी खेळण्यात गुंग झाले. मुलांमुळे आदित्यही न रडता खेळायला लागला होता. छाया ( अजिंक्यची चुलत बहीण)साक्षीला तिची रूम दाखवायला घेऊन गेली.
"ही तुमची खोली. खास तुमच्यासाठी नवीनच बांधून घेतलीये आबासाहेबांनी."
छाया हसत साक्षीला म्हणाली.
छाया हसत साक्षीला म्हणाली.
"तुम्ही आवरा आणि जेवायला खाली या.काही लागलं तर राधाला सांगा."
"राधा कोण?"
"ती नव्हती का थोडी जाड, नववारी साडीत."
"काय बाई ,छाया ताई मला जाडी म्हणताय व्हय."
"ही बघा आली. ही राधा.
राधे, आक्कांनि सांगितलंय ना वहिनींना काय हवं नको ते बघायला. लक्षात आहे ना."
राधे, आक्कांनि सांगितलंय ना वहिनींना काय हवं नको ते बघायला. लक्षात आहे ना."
"व्हय,व्हय."
"मी जाते खाली.वहिणींचं झालं की घेऊन ये."
असं म्हणून छाया गेली.
असं म्हणून छाया गेली.
"वाहिनीसाहेब काय पायजे तुमासनी?"
"आता मला काही नको. तू बस तिथे काही लागले की सांगते तुला."
"बर."
दुपारचे सगळ्यांचे जेवण आटोपले होते.अजिंक्य आणि विलास गावात फिरायला गेले होते.आबासाहेब आणि आक्कासाहेब नात्वांमध्ये रमले होते.यात्रा असल्याने किचन मध्ये फराळाचे पदार्थ करण्याचे काम चालू होते.
" मी काही मदत करू का?"
साक्षीने आपल्या हळू आवाजात विचारले.
साक्षीने आपल्या हळू आवाजात विचारले.
"वहिनी तुम्ही? या ना"..... छाया
"मदत नको पण तुम्हाला झोप येत नसल तर बसा इथ." जया म्हणाली.
"मी तुमच्यापेक्षा लहान आहे मला तुम्ही साक्षी म्हणा, आहो- जाओ नका करू."
असं म्हणून साक्षीने दोन्ही जावांचे मन जिंकले.
असं म्हणून साक्षीने दोन्ही जावांचे मन जिंकले.
"बर."
"वहिनी आज संध्याकाळी मस्त तयार व्हा.गावातल्या बायका येणार आहेत तुम्हाला बघायला."
छाया म्हणाली.
छाया म्हणाली.
संध्याकाळची वेळ झाली.
साक्षीने डार्क निळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली होती. त्यावर म्याचिंग ज्वेलरी.
साक्षीने डार्क निळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली होती. त्यावर म्याचिंग ज्वेलरी.
"वहिनिसाहेब"
राधा हाक मारतच साक्षीच्या रूममध्ये आली.
राधा हाक मारतच साक्षीच्या रूममध्ये आली.
"हा ... काय ग."
राधा दोन मिनिट आ वासून साक्षीला बघतच राहिली.
"राधा ताई काय झाले ....बरी दिसते ना मी."
साक्षीने विचारले
साक्षीने विचारले
"आव वहिनिसाहेब एकदम हिरोईनिगत दिस्त्ताय बगा."
राधा हसत म्हणाली.
राधा हसत म्हणाली.
"राधा तू पण छान मस्करी करते."
"आव मस्करी नाय खरचं लई भारी दिसताय तुमी.समद्या बायका बगत बसणार तुमच्याकड.
चला, बोलिवलय तूमासणी."
""हो ... चल."
चला, बोलिवलय तूमासणी."
""हो ... चल."
दोघी खाली येतात.
आक्कानी साक्षीला आपल्या शेजारी बसायला सांगितले.
त्यांच्या मांडीवर आदित्य मजेत खेळत होता.साक्षीला बघितल्यावर तो लगेच तिच्याकडे झेपावला.
आक्कानी साक्षीला आपल्या शेजारी बसायला सांगितले.
त्यांच्या मांडीवर आदित्य मजेत खेळत होता.साक्षीला बघितल्यावर तो लगेच तिच्याकडे झेपावला.
"अले माझ्या सोना" असे म्हणून तीने आदित्यचे दोन - तीन पापे घेतले.
"काय चाललय माय - लेकराच.आजी हाय की इथ सांबाळायला."
वंदनाताई येता येताच म्हणाल्या.
वंदनाताई येता येताच म्हणाल्या.
"या... वंदनाताई आपल्या शेजारी राहतात." जयाने ओळख करून दिली."
एक - एक करून गावातल्या बऱ्याच बायका साक्षीला भेटायला आल्या होत्या. प्रत्येकजण तिचे कौतुक करत होते. प्रत्येकीने तिच्यासाठी काहीना काही भेटवस्तू आणल्या होत्या.
"या यळची आरती नव्या जोडप्याच्या हातन होऊन जाऊद्या. काय ओ शिर्के बाई."......मंगल ताई
"या यळची आरती नव्या जोडप्याच्या हातन होऊन जाऊद्या. काय ओ शिर्के बाई."......मंगल ताई
"व्हय तर ... दुसरं हायच कोण?"
"ते समद बगायला आहेत की आबासाहेब"
आक्कासाहेब म्हणाल्या.
आक्कासाहेब म्हणाल्या.
सगळ्या बायकांचे चहा- पाणी झाले. साक्षीला आपल्या घरी येण्याचे निमंत्रण देऊन सगळ्या गेल्या.
साक्षी आता खूप थकली होती.
आक्कांच्या हे लक्षात आले.
साक्षी आता खूप थकली होती.
आक्कांच्या हे लक्षात आले.
" तू जा तुझ्या खोलीत .आराम कर, आदिला राहू दे माझ्याजवळ" आक्का साक्षीला म्हणाल्या.
साक्षी रूम मध्ये गेली. तिला साडीमध्ये खूप थकल्यासारखे झाले होते. ती ज्वेलरी काढण्यात गुंग झाली होती,आणि अचानक अजिंक्यने मागून येऊन तिला मिठी मारली.
" अजिंक्य, काय हे घाबरले मी."
"काय हे ,म्हणजे काय मी माझ्या बायकोला कधीही मिठी मारू शकतो."
" अजिंक्य, काय हे घाबरले मी."
"काय हे ,म्हणजे काय मी माझ्या बायकोला कधीही मिठी मारू शकतो."
"हो का खूप लवकर आठवण आली बायकोची."
"घरी आलो तर सगळेजण कौतुक करत होते माझ्या बायकोचं. म्हणून मग बघायलाच आलो कशी दिसते माझी बायको आज."
"हम... बघ...कशी दिसते आहे?"
साक्षी हाताची घडी घालून अजिंक्य समोर उभी राहीली.
" नेहमी सारखीच, ब्युटीफूल."
साक्षी लाजून मागे वळून गळ्यातील नेकलेस काढायला लागली.
"कुठे होतास तू? आल्यापासून जे गेला ते आत्ता भेटतोय. इथे बायकोसाठी सगळे नवीन आहे. तिचा थोडासा पण विचार करायचा नाही का?"
"सॉरी...पण खूप दिवसांनी आलो ना सगळे भेटले मग उशीर झाला. आणि तसे इथे सगळेच आहेत ना तुझ्या सेवेत तू फक्त हुकूम सोड."
अजिंक्य तिला मदत करत म्हणाला.
"हो का?".....आरशात अजिंक्य कडे बघून साक्षी तोंड वाकड करत म्हणाली.

"बर ठीक आहे उद्या पूर्ण दिवस तुझ्याबरोबर फिरणार.तुला आपले सगळे शेत दाखवतो त्यानंतर गाव.
आणि परवा मग यात्रा. गावात तर यात्रेची जोरात तयारी चालू आहे. तू बघच गावातली यात्रा कशी असते ते तुलाही खूप आवडेल."
आणि परवा मग यात्रा. गावात तर यात्रेची जोरात तयारी चालू आहे. तू बघच गावातली यात्रा कशी असते ते तुलाही खूप आवडेल."
"ते सगळे ठीक आहे पण आत्ता खूप थकले आहे"
"हो मग आराम कर ना."
"हो मग आराम कर ना."
"अजिंक्य, मी साडीत खूप थकले आहे.मी ड्रेस घातला तर चालेल का?"
"हम ... प्रश्न जरा गंभीर आहे?"
हे एकूण साक्षीचा चेहरा चिंताग्रस्त होतो.
हे एकूण साक्षीचा चेहरा चिंताग्रस्त होतो.
ते पाहून, अजिंक्य मोठ्याने हसला आणि म्हणाला,
"चेष्टा केली तुझी, घाल ना ड्रेस. काळजी करू नको कोणी काहीही म्हणणार नाही.कोणी काही म्हणाले तर मी आहेच."
"चेष्टा केली तुझी, घाल ना ड्रेस. काळजी करू नको कोणी काहीही म्हणणार नाही.कोणी काही म्हणाले तर मी आहेच."
"अजिंक्य ....नक्की ना."
"हो...मी खाली आहे. तू आराम कर."
क्रमशः
आतापर्यंत तर साक्षीचे कौतुक झाले पण तिचे ड्रेस घालने आवडेल का आबासाहेब आणि आक्काला.