Login

यात्रा - भाग 8

Marathi Story Yatra - Fortuitous Circumstance
यात्रा - भाग 8

मागच्या भागात आपण वाचले साक्षीला आराम करायला सांगून अजिंक्य खाली गेला.

खाली आबासाहेब,विलास,रमेश,सुरेश,विनायकराव आणि गावातले दोघे - तिघे जण गप्पा मारत होते.

"आबासाहेब आपल्याला कायतरी करावाच लागल. लईच माज वाढलाय त्यांचा."

"माज उतरवायला असा किती वेळ लागणार आहे बापूसाहेब.". .... विनायक

"एवढी यात्रा शांततेत पार पडली म्हणजे मग बघू काय करायच ते".....सुरेश

"काय चालू आहे ....कशाची एवढी चर्चा चालू आहे."....अजिंक्य

"काय नाय ते निवडणुका हायत नव्हं गावात त्याचीच चर्चा करत होतो. " ......गावातील दुसरा माणूस

"निवडणुका ....."

"दरवेळेस आपणच येतो निवडून....या येळेला पण आपणच येणार "...रमेश

"अरे हो....पण जे काय कराल ते शांततेत आणि नियमांना धरून करा नाहीतर या राजकारनामुळे आपल्याच माणसांशी वैर वाढते."

"नाय नाय तस काय नाय...आणि थोडफार सगळीकडं हे चालूच असतय."

"ठीक हाय....बापूसाहेब आलय आमच्या समद ध्यानात.यात्रा झल्यावर काय ते बगु."
आबासाहेबांनी आश्वासन दिल्यावर गावातले माणसं गेले.

जेवणाची वेळ झाली होती. अजिंक्यला पिठलं - भाकरी खायचं होते म्हणून रात्री आक्का ने त्याच्यासाठी खास पिठलं भाकरी केले होते. जया आणि राहीने (छोटी सून)
सगळ्यांना जेवायला वाढले होते.
इकडे सक्षीचा डोळा लागला होता.आईच्या फोन ने तिला जाग आली.
"हॅलो आई"

"हॅलो साक्षी, अग काय हे कधीची तुझ्या फोन ची वाट बघत होते.शेवटी रहावले नाही म्हणून मग मीच केला."

"सॉरी आई गडबडीत विसरले मी.
जुजबी बोलून साक्षीने फोन ठेवला.

रात्रीचे नऊ वाजले होते.
'बापरे, कधी झोप लागली समजलेच नाही.काय म्हणतील सगळे आणि आदित्यला तर मी आल्यापासून घेतले नाहीये.लवकर खाली गेले पाहिजे.'

साक्षी भरभर पायऱ्या उतरत खाली आली आणि लगेच किचन मध्ये गेली.तिथे सगळे पुरुष मंडळी जेवायला बसले होते.सगळ्यांना अचानक पाहून ती गोंधळली. त्यात तिने गुलाबी रंगाचा पंजाबी सूट घातला होता.तिला असे आलेले पाहून सगळ्यांचे तिच्याकडे लक्ष गेले.तिला पाहून छाया म्हणाली,

"बरं झालं वहिनी तुम्ही आलात मी आता राधाला पाठवणाराच होते तुम्हाला बोलवायला."

" हो ... सॉरी मला यायला उशीर झाला." साक्षी ओढणी नीट करत थोडीशी घाबरतच म्हणाली.

ड्रेस घातल्यामुळे आणि समोर आबासाहेब असल्याने ती अस्वस्थ झाली होती.ती एकदा अजिंक्य कडे बघत होती तर मध्येच आबासाहेबनकडे.तिची ही अस्वस्थता आक्काना जाणवली.

"काय काळजी करू नगस कोण कायबी म्हणणार नाय तुला ड्रेस घातल्यान."
आक्का असे म्हणाल्यावर साक्षीची घालमेल सगळ्यांच्या लक्षात आली.

"आव वहिनी त्यात काय एवढ ..आम्हाला माहीत आहे की साडीची सवय नाही तुम्हाला."
छाया म्हणाली.

"आत्ता होम मिनिस्टरअच आसं बोलल्यावर आमी कशाला काय म्हणतोय."
आबासाहेब अस म्हणाल्यावर हास्याचे कारंजे उडाले.

घरातले वातावर हलके झाल्याने साक्षीलाही हायसे वाटले. अजिंक्यने आपल्या नजरेनेच साक्षीला रिलॅक्स व्हायला सांगितले.
सगळ्यांचे जेवण झाले.छाया आणि विनायकराव त्यांच्या घरी गेले.यात्रेसाठी सगळ्या सूनांसाठी साड्या आणल्या होत्या. साक्षीला साडी द्यायची होती.साक्षीला आक्का ने
आपल्या रूम मध्ये बोलावले.

"आक्का तुम्ही मला बोलवलत"

"हा...हे बग यात्रा हाय म्हणून समद्यासणी साड्या घेतल्यात . ही तुझ्यासाठी.बग तुला आवडती का? नाय आवडली तरी राहूदे.पहिलीच साडी हाय सासूची"

"छान आहे साडी.आवडली मला.पण आक्का यात्रेदिवशी नेसायला मी साडी आणली आहे आणि ."....
"व्हय ग. तुझीच नेस मी आपली आत्ता दिली तुला."

"ठीक आहे"....साक्षी हसून म्हणाली.

"हा हार मातर घाल"सोन्याचा लक्ष्मी हार साक्षीला देत आक्का म्हणाल्या.

"आक्का...हा हार कशाला?"

"अग तुझ्यासाठीच घेऊन ठिवला होता. एकुलतीएक सून हाय तू माझी. लई हावस होती पोराच्या लग्नात मिरवायची पण नाही घडलं मनासारखं."आक्का पदर डोळ्याला लावत म्हणाल्या.

साक्षीला काय बोलावे ते कळेना ती तशीच शांत उभी राहिली.

"जा झोप आता .सकाळपासून लई दण- दण झाली. यात्रेदिशी तुमच्या दोघांच्या हातानं सकाळची पूजा ठेवलीया.लई सत्व हाय आपल्या महादेवाचं.त्याचा आशीर्वाद मिळाला म्हणजी झालं."
आककांच्या बोलण्याचा विचार करतच साक्षी रूम मध्ये आली.अजिंक्य आदित्यला आपल्या शेजारी घेऊन झोपला होता.
आक्कांच्या बोलण्याचा विचार करत ती ही झोपली.
**********
दुसऱ्य दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे अजिंक्य साक्षीला शेत दाखवायला घेऊन गेला.

" बापरे, एवढी सगळी शेती तुमची आहे?"......साक्षी

"आपली" साक्षीला जवळ ओढत अजिंक्य म्हणाला.

स्वतः ला त्याच्या मिठीतुन सोडवत

"हे गाव आहे आपले घर नाही."

"माहित आहे मला आणि मी माझ्या बायकोला जवळ घेतोय"
अस म्हणत त्याने साक्षीला परत जवळ ओढले.

"बर .. उद्या यात्रा झाली की परवा आपण निघायचं ना."
का ग? तुला आवडले नाही का इथे.

"तसे नाही रे. मी फक्त विचारल"

"यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी तर खरी धमाल असते गावात.
त्यानंतर जाऊ आपण."

साक्षी आणि अजिंक्य घरी पोहचले.घरी बरेच गावातील लोक जमले होते.काहीतरी गडबड होती.

" असं कसं आजपर्यंत गावात तमाशा येऊ दिला नाय अन इथून पुढं बी येऊ देणार नाय" .....एक व्यक्ती

"जमणार नाय ..या येळला गावात तमाशा येणार.आर काय लोकासणी करमणूक नको का."...दुसरा व्यक्ती.

"ये गप बसा जरा. काय लहान पोरागत चाललंय."..…...आबासाहेब

"आबासाहेब रीतसर परवानगी घ्याया आलो तुमची.तमाशाला परवानगी द्या."

"आर यड का खुळ तुम्हीं स्वताहून स्वतःच्या बरबादीचा खड्डा खणाया निघाले."........बापूसाहेब

"कसकाय असं बोलता तुम्ही बापुसाहेब."..तिसरा व्यक्ती

"आर तमाशांन किती घरात भांडण होत्यात ते याआधिबी बगितले आमी."

"ते काय नाय ....तमाशा गावात येणार नाय."

त्यावर सगळ्यांचा एकच गोंधळ सुरू झाला. कोण काय बोलतय कोणालाच कळत नव्हते.
साक्षी आणि अजिंक्य तर एकदम स्तब्ध होऊन हे सगळ बघत होते.

क्रमशः

काय होईल पुढे....या परिस्तिथीतून अजिंक्य काही मार्ग काढू शकेल का? वाचू पुढच्या भागात.