यात्रा - भाग 4
मागच्या भागात आपण वाचले साक्षी अजिंक्य बरोबरच्या आठवणींमध्ये रममान होते.(पाच वर्षापूर्वी)आता पुढे...
*******
"काय झाले आहे,आज एवढा का खुश आहेस लॉटरी लागली की काय तुला?"......... साक्षी
"काय झाले आहे,आज एवढा का खुश आहेस लॉटरी लागली की काय तुला?"......... साक्षी
"लॉटरी पेक्षाही मोठी गोष्ट आहे,
अग आज दोन वर्षानंतर पहिल्यांदा आबांचा फोन आला.आज आबा सगळं विसरून माझ्याशी बोलले."
अजिंक्य खूप उत्साहाने सांगत होता.
अग आज दोन वर्षानंतर पहिल्यांदा आबांचा फोन आला.आज आबा सगळं विसरून माझ्याशी बोलले."
अजिंक्य खूप उत्साहाने सांगत होता.
"काय ? खरचं."
"हो, आणि नुसते बोललेच नाही तर पुढच्या आठवड्यात आपल्या गावची यात्रा आहे, सूनबाई आणि आमच्या नातवाला घेऊन ये; मी वाट बघतोय..असे म्हणाले."
"साक्षी, साक्षी किती आनंद झालाय आज मला ...
काय करू नि काय नको असं झालंय.
काय करू नि काय नको असं झालंय.
मला माहित होते ,माझे आबा मला एक ना एक दिवस नक्की समजून घेतील."
हे बोलताना अजिंक्य भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यात पाणी तरळले पण साक्षीला ते दिसू न देता तो लगेच म्हणाला...
"तर मग मॅडम,तयारी करा पुढच्या आठवड्यात तुम्ही तुमच्या सासू-सासऱ्यांना भेटायला जाणार आहात."
"हे तू खरं बोलतोय ,आपण सगळेच जाणार आहोत....." साक्षी शंकेने
"हो.... खरंच.अग ते सगळं विसरलेत तुला माहितीये मी येतो म्हणताच, त्यांना जो आनंद झाला तो मी तुला शब्दात नाही सांगू शकत.आज ते फोनवर बोलत होते समोर असते तर घट्ट मिठी मारली असती त्यांनी मला."
"हम . .ठीक आहे किती दिवसांसाठी जाणार आहोत आपण?"
साक्षी हळू आवाजात म्हणाली.
साक्षीची ही शांत प्रतिक्रिया ऐकून ,अजिंक्य...
"साक्षी,काळजी करू नकोस मला माहितीये तुला गावाकडची सवय नाही पण तुला तिथे काहीही त्रास होणार नाही.उलट सगळेजण तुझी खूप काळजी घेतील.
चार-पाच दिवसांसाठी जाऊ आपण तुलाही खूप आवडेल तिथे.
खूप छान वाटते शेतात फिरायला, तो मातीचा सुगंध, विहिरीत पोहण्याची धम्माल .तुला माहितीये खूप मस्ती करायचो आम्ही लहान असताना.
बघ ना ,आज आपलं पिल्लू एक वर्षाचा आहे आणि आबांचा फोन आला इथून पुढे त्याला नेहमी आपल्याला गावाकडे घेऊन जाता येईल. शहरात ज्या गोष्टी त्याला मिळणार नाहीत त्या त्याला गावाकडे मिळतील. स्वच्छ हवा,मोकळे आकाश आणि खेळायला खूप मोठी जागा.
मला तर असं झालंय कधी आदित्य मोठा होतो आणि कधी मी त्याच्याबरोबर सगळी धमाल करतोय."

"हो.. हो.. त्याला अजून खूप वेळ आहे. आधी मला सांग मला तिकडे साडीच घालावी लागेल का?"
आदित्य मोठ्याने हसला...
"अच्छा,तुला याचं टेन्शन आलय होय.
अगं असं काही नाही रोज ड्रेस घातला तरी चालेल पूजेपूर्ती नेस साडी.
अशी ही तू साडीत किती छान दिसतेस.बघू दे ना सगळ्यांना माझी बायको किती छान आहे ते."
"अच्छा,तुला याचं टेन्शन आलय होय.
अगं असं काही नाही रोज ड्रेस घातला तरी चालेल पूजेपूर्ती नेस साडी.
अशी ही तू साडीत किती छान दिसतेस.बघू दे ना सगळ्यांना माझी बायको किती छान आहे ते."
"तू पण ना अजिंक्य.....(साक्षी लाजून)
बरं,लागते मी तयारीला .आदीला लागणारे औषधही आणावे लागतील वातावरण बदलले की त्रास होतो लहान मुलांना.. औषध बरोबर असलेली बरी."
बरं,लागते मी तयारीला .आदीला लागणारे औषधही आणावे लागतील वातावरण बदलले की त्रास होतो लहान मुलांना.. औषध बरोबर असलेली बरी."
"हो मी उद्या येताना घेऊन येईल ."
*********
आठ दिवसानंतर.....(रात्रीची वेळ)
"बापरे आठ दिवस कसे गेले समजलेच नाही मला...
अजिंक्य जमेल ना मला तिथे सगळे."...... साक्षी
"हो ग जमेल......" अजिंक्य .
"बर उद्या किती वाजता निघायचे."... साक्षी
"सकाळी सातला निघू. चार- पाच तास लागतात. दुपारपर्यंत पोहोचू आपण."
"तुला एवढा वेळ ड्रायव्हिंग जमेल ना."
"हो. थांबत थांबत जाऊ आपण."
"अगं ,विलास तर मला घ्यायला यायला तयार होता.मीच नको म्हटलं."
"कोण विलास?"
"ओह. अच्छा .आठवले, तू सांगितले होते तुझा मानलेला भाऊ ना."
"हो तोच.
पण भावा पेक्षाही मित्र आहे तो माझा खास.
सगळ्या गोष्टी शेअर करतो आम्ही.
आबा बोलत नव्हते,तेव्हा त्यांची सक्त ताकीद होती तरीही कुठे बाहेर आला की लगेच विलास फोन करायचा मला सगळं ठीक आहे ना विचारायला.
बरं ते जाऊदे.झोप आता सकाळी लवकर उठायचे आहे".

दुसऱ्या दिवशी सकाळी
"साक्षी झाले का ग?.".... साक्षी ची आई.
"हो झालेच."
"हो झालेच."
"हे बघ. हे ठेव, रस्त्यात भूक लागली तर खायला होईल."
"आई ,अग थांबू कुठेतरी नाश्त्याला."
"हो ग ,तरीपण असू दे बरोबर.
आणि हे बघ आदित्यचं पाणीआणि खाऊ या बॅगमध्ये आहे."
आणि हे बघ आदित्यचं पाणीआणि खाऊ या बॅगमध्ये आहे."
ओके.
"आई तू काळजी घे .सुधा मावशीला सांगितले आहे मी. येईल ती संध्याकाळपर्यंत इथे. दोन दिवस राहील तुझ्यासोबत."
"ठीक आहे... निघ आता.बाहेर ,अजिंक्य वाट बघत असेल..."
"प्लेन लाल" रंगाच्या साडीत साक्षीला पाहून अजिंक्य आश्चर्यचकित होतो....
"अरेच्चा साडी!"
"हो !आई म्हणाली ,पहिल्यांदा जाते आहे तर साडीच नेस म्हणून..."
"गुड आयडिया."...असे म्हणून अजिंक्य हसला
"हसू नकोस माझ्याकडे बघून"..... साक्षी लाडाने
"छान दिसतेस!
आज महादेव नगर मधले सगळे बघत राहणार आहेत. की, कोण परी आली आहे आमच्या गावात."
"चल ,काहीतरीच तुझे. चीडवू नकोस मला. आई, सांग ना याला काहीतरी...."
तिघेही हसले.
आज महादेव नगर मधले सगळे बघत राहणार आहेत. की, कोण परी आली आहे आमच्या गावात."
"चल ,काहीतरीच तुझे. चीडवू नकोस मला. आई, सांग ना याला काहीतरी...."
तिघेही हसले.
"बरं निघा आता.....
साक्षी ,आधी बस गाडीत मग देते आदित्यला तुझ्याकडे.
छान गाढ झोपलाय;एक तास तरी उठणार नाही आता."
साक्षी ,आधी बस गाडीत मग देते आदित्यला तुझ्याकडे.
छान गाढ झोपलाय;एक तास तरी उठणार नाही आता."
साक्षी गाडीत बसली. आईने आदित्यला तिच्याकडे दिले
"आई येतो..... काळजी घ्या.... पोहोचलो की फोन करतो."...... अजिंक्य
"सांभाळून जा.".... आई.
"सांभाळून जा.".... आई.
क्रमशः
साक्षीची आणि अजिंक्यची ही यात्रा कशी राहील वाचू पुढच्या भागात.....
साक्षीची आणि अजिंक्यची ही यात्रा कशी राहील वाचू पुढच्या भागात.....