ये दिल है मुश्किल . .
भाग - 8
मागच्या भागाची लिंक
https://www.irablogging.com/blog/ye-dil-hai-mushkil_15488
आता पुढे -
"काय सांगतोय ती भेटली तुला ! " शंतनु खूपच एक्साइटेड झाला होता.
"दिसली मला ती भेट नाही झाली ."
"दिसली आणि भेट नाही झाली म्हणजे?" नमन.
"मग कशावरून की तिचं तुझी नमू आहे." अनिकेतला प्रश्न पडला.
झालं असं की म्हणून तो सकाळी झालेला पूर्ण किस्सा त्यांना सांगितला. पण नमनच्या चेहर्यावरचे मात्र हळूहळू रंग बदलत होते आणि राजीवने त्याच्या पॉकेटमधून ब्रेसलेट बाहेर काढले अन् नमनचे डोळे मोठे झाले आणि त्याला ठसका लागला.
अनिकेत नी त्याला पाणी दिलं. त्याने पाणी घटाघटा पिऊन घेतले.
हे नमूच ब्रेसलेट मला पार्टीच्या दिवशी हॉलमध्ये सापडलं !"
सगळ्यांनी ते पाहिले.नमनने तर हातात घेऊन त्या ब्रेसलेटची स्कॅनिंग केली..
"इतक काय निरखून पाहतोय ब्रेसलेट !" राजीव .
"हिच का तुझी नमू ? " नमन ने जीन्सच्या पॉकेटातून मोबाइल काढून काहीतर केले आणि त्याच्या समोर धरला.
"अरे हो हिच माझी नमू आहे." राजीवने नमन चा मोबाइल हातात घेऊन पाहत होता.
"एक मिनिट हा फोटो तुझ्याजवळ कसा आणि तू ही त्यात आहे . तू ओळखतो नमूला ?" राजीवची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली .
अनिकेत शंतनु ने मोबाइल हातात घेऊन पाहिला . आता आश्चर्यचकित होण्याची पाळी त्याच्यावर आली.
"राजीव हीच तुझी नमू आहे का?" शंतनू म्हणाला.
"हो रे मी काय खोटं सांगतोय का? मी नमूला ओळखणार नाही. मी त्यांच सर्व बोलण ऐकलं, त्यांच्यासमोर ही जाणार होतो पण गेला नाही कारण मग माझ्या प्रश्नाची उत्तर दिली नसती आणि ती .लगेच निघूनही गेली असती. म्हणून मी शांत राहिलो. पण काय झालं तुम्ही असे का पाहताय का विचारताय तुम्ही सर्व ओळखता तिला?"
"हो." अनिकेत.
"मग इतक्या दिवसा पासून का नाही सांगितल मला , कसं काय ओळखता तुम्ही तिला?" तो नाराज झाला.
"आम्हाला ही माहिती नव्हत की हीच नमू आहे मग आम्ही कसं सांगणार तुला ! " अनिकेत त्याला समजवत म्हणाला.
"आम्ही कसे ओळखतो तर आमची ओळख नमन ने करून दिली होती."
"नमन काही बोलणार आहेस की नाही. नुसता मठ्ठ सारखा उभा आहेस." राजीव वैतागत म्हणाला. नमन तर कितीवेळचा मुर्तीसारखा उभा होता. आणि अचानक तो नाचायला लागला. हातवारे करत तो कॅफेत च नाचत होता आणि कॅफेतील लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते.
"आता काय झालयं सांगशील का? वेड्या सारखा नाचतोय !" राजीव.
" नमू कोण आहे तुला माहिती आहे ?" नमन.
"नाही ." राजीव.
"तर नमामी म्हणजेच नमू आणि माझी बहिण किकू आहे." नमन.
"कऽऽ काय ! " राजीव आश्चर्य चकित होऊन म्हणाला..
"हो, ती माझी लहान बहिण आहे."
"तू नाचतोय का? तुला राग नाही आला का ,राजीव तुझ्या किकुवर प्रेम करतो तर ?"
"नाही … मला आनंदच झाला , मला माहिती आहे राजीवला आपण सर्व चांगलंच ओळखतो तो माणूस म्हणून कसा आहे त्याचा स्वभाव, त्याच पुढचं ध्येय आपल्याला माहिती आहे त्यात तो यशस्वी होईल यात शंकाच नाही . अन तो त्या मुलीवर किती प्रेम करतो हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. तो तिच्यासाठी किती झुरलाय, त्याच्या डोळ्यातील अश्रू आपण पाहिले आहेत. मला नेहमी वाटायचं की राजीव ज्या मुलीवर प्रेम करतो ती नशिबवान आहे पण मला हे माहिती नव्हतं की ती नशीबवान मुलगी माझीच बहिण आहे." नमन आज राजीव विषयी भरभरून बोलत होता. शंतनु अवाक होऊन त्याच्याकडे पाहत होता. राजीवने नमनाला मिठी मारली.
"अरे साल्याला जिजा पसंत आहे!" शंतनु
"हो." नमन.
"अभिनंदन जिजाजी ." शंतनू
"जिजाजी ." राजीव प्रश्नार्थक नजरेने पाहत होता.
"हो . ती आमची ही बहिणच आहे."
"अरे हे काय जिजाजी लावलाय तुम्ही ! वेळ आहे रे अजून आधी नमू ने तर हो म्हणावं मग बोला काय बोलायच ते." राजीव गालात हसत म्हणाला.
"ती हो म्हणेल रे पण बाबांच अवघड दिसतेय". नमन नाराज होत म्हणाला.
"नमू ही रडत तेच म्हणत होती. बाबा नाही मानणार !" राजीव .
"हो राजीव बाबाचे विचार हे जाती बाहेरचे नाहीत. त्यांना मुला मुलींची लग्न जातीत करावी. नाही केले तर नातेवाईक समाज बोल लावता त्यात लव मॅरेज म्हटलं तर ते त्यांना ते जातीतले असलं तर ते एकप्रकारे लग्नाला तयार होतील आणि नसला तर ते ...
जातीत नाही म्हणून ते लग्नाला तयार होणार नाही . असे त्यांचे विचार आहेत. म्हणूनच किकू रडत असणार इतक्या दिवसात मी तिला आता हसतांना बघितले नाही नेहमी उदास असायची.. आणि याच कारण मला आता कळलं . मी तिला कित्येकदा विचारलं पण तिने काही कळू दिल नाही.
"आणि ती तिच्या मनातील सांगणार ही नाही." राजीव .
" हो ना नाहिच बोलणार ती "
"राजीव आपण बाबांना तयार करायचं , मी आहे तुझ्यासोबत !" नमन.
"आणि आम्हीही आहोत." शंतनू आणि अनिकेत म्हणाले. मग मिळून त्यांनी ग्रुपहग केला.
"राजीव आधी नमूचा होकार मिळवं !"
" हो, पण ती बोलायला तर तयार झाली पाहिजे ना ."
" माझ्याकडे ऐक आयडिया आहे." नमन.
" काय ऽ ऽ " सर्व एक साथ म्हणाले .
नमन एक प्लॅन बनवून सांगितले.
ये मी नाही करणार असं ! राजीव.
"तुला करावेच लागेल राजीव ."
मग सर्वांनी डन केले. दूसऱ्याच दिवशी पासून ते त्या तयारीला लागले .
राजीव लवकर तयार होऊन बाहेर आला. .
"टिनू कुठे निघालास इतक्या सकाळी ?" आरती.
आई मी असं म्हणून त्याने कालचा पूर्ण किस्सा सांगितला .
"अरे पण तिने गैरसमज करून घेतला तर …"
"मी पण तेच म्हणालोय नमनला पण तो ऐकत नाहिये "
"ठीक आहे . प्रयत्न करायला हरकत नाही." आरती.
"हो म्हणून तर नमनने हा प्लॅन बनवला !"
आईच्या पाया पडून तो निघाला.
कॉलेजवळच्य रेस्टोरंट मध्ये नमू आणि विनी बसल्या होत्या. विनीने मसालाडोसावर ताव मारत होती.
त्यांच्यामागे दोन व्यक्ती बसल्या होत्या.
"शेवटी तू मला भेटायला आलीस ग, किती वाट पाहिली तुझी
नमू ! " आवाज ओळखीचा वाटला म्हणून तिने मागे वळून पाहिले अन् ती शॉ झाली. मागे दूसरा तिसरा कुणी नसून राजीव एका मुलीच्या समोर बसलेला होता. ती मुलगी पाठमोरी असल्याने तिचा चेहरा नमूला दिसला नाही. विनी ने ही ऐकले विनी ने तिला खुणावून विचारले .
"हो राजीव मीही खूप आतुर होते तुला भेटायला. "ती मुलगी.
"नमू, खरचं का ग !" नमन .
"हो राजीव ." ती मुलगी.
इकडे त्यांच बोलणं ऐकून नमुची घालमेल वाढायला लागली होती . .
"किती खोटं बोलतेय ही भवानी ! मेली डुचकी ! दुसऱ्याच्या प्रेमाला आपल म्हणतांना लाज कशी वाटत नाही तिला " विनी नमुच्या जवळ जात म्हणाली.
"थांब सांगतेस त्याला की ही तुझी नमू नाही. तुझी नमू तर ही आहे."
"नको विनी ." तिला हाताला धरून बाहेर आणले.
"का नको नमू तुला कळत कसं नाहिये ते तुझ्यावर प्रेमावर हक्क दाखवत आहे गं."
"कदाचित ते माझ प्रेम नसणार म्हणून ती हक्क दाखवत आहे. ती हताश होत म्हणाली. डोळ्यांच्या कडा हलकेच पाणावले होते. ते गेले तसे ते दोघही बाहेर आले. नमू चा चेहऱ्यावर आलेली उदासी नाराजी पाहिली होती. त्याने लगेच नमन ला फोन करून त्याला शिव्या हासडून दिल्या.
*अबे गाढवा , किती नाराज होऊन गेली ना ती , तिच्या डोळ्यांत पाणी आले होते ना .. किती दुःख झाले असणार तिला त्या दुसऱ्या मुलीला पाहून !"
"अरे थांब रे जरा इतका व्याकूळ नको होऊस."
."बोलली का ती काही , नाही ना मग !"
अरे पण हे करणे गरजेचे आहे का?
"हो ती त्या शिवाय बोलायची नाही . थोडी कळ सोस राजीव ." नमने बोलून फोन कट केला.
"थोडी दिवस राजीव ." ती मुलगी म्हणाली. त्याने ही थोड हसून मान हलवून हो म्हणाला आणि ते दोघही आपआपल्या घरी गेले.
क्रमश ...
हा भाग कसा वाटला नक्की कळवा .
धन्यवाद
