ये दिल है मुश्किल ।
भाग - 6
मागील भागांचा सारांश
कॉलेजला आल्यावर नमन किकूची आणि त्याच्या मित्राची ओळख करून देतो. फ्रेशर्स पार्टी मध्ये नमू गाण म्हणते नेमक त्या वेळेस तो तिथे नसतो. त्यावेळेस पण त्याला तिचा चेहरा पाहता आला नाही. राजीवने एका कागदावर कविता लिहली होती आणि ती हवेने नमूपर्यंतच पोहचली. नमूने त्याचा चेहरा पाहिला आणि त्यांची भेट या आधीही झाली होती. तेव्हाच तो तिला आवडला होता . राजीवचे कॉलेजचे हे शेवटचे वर्ष होते त्यामुळे त्यांची फेअरवेल पार्टी होणार होती.
https://www.facebook.com/581606972323826/posts/1306035559880960/?sfnsn=wiwspmo
( ही मागच्या भागाची लिंक )
****
आता पुढे.
फेअरवेल पार्टीत कोणते ड्रेस घालायचे की साडी नेसायची? हा विषय नमू आणि विनीमध्ये चर्चा चालू होती.
दोघींची मतं ड्रेसवर आली. दोघांनी वनपिस घालायचे ठरवले . नमू तयार होऊन आली. पर्पल कलरच्या वनपिस आणि व्हाईट कलरचे वेस्ट जॅकेट घातलेले ,समोरच्या बाजूने गळ्यापासून ते पोटापर्यंत छोट्या छोट्या आरसे लावलेले होती त्याच्याच बाजूला मोत्यांची मणी, त्याच कलरचे एयरिंग, हातात तिचे नेहमीचे असणारे सिल्वर छोटे बदाम आणि घुंगरू लावलेले ब्रेसलेट होते . एका हातात घड्याळ , डोळ्यात काजळ , चेहर्यावर पॉन्डस पावडर , लायनर ,ओठांना स्ट्रॉबेरी लिपबाम लावून तयार होऊन ती बाहेर आली.
"इतकी नटून कुठं चालली आहेस किकू?" शंकर.(नमामीचे बाबा)
" बाबा आज कॉलेजमध्ये फेअरवेल पार्टी आहे." नमामी.
" छान दिसतेय ."
"थँक्यू बाबा !" ती हसून म्हणाली. मग विनी तिला बोलवायला आली. विनी तर तिच्याकडे पाहतच राहिली इतकी ती सुंदर दिसत होती.
"चल गं विनी अशी काय पाहतेय माझ्याकडे , विचित्र दिसतेय का मी ?" नमू .
" नाही गं एकदम टवका दिसतेय ?" विनी तिला डोळा मारत म्हणाली.
"अगं हळू बोंबल माकडीन बाबांनी ऐकल नं तर इथेच तुझी माझी वाट लागेल. चल लवकर ! " दोघही बाहेर त्यांच्या धन्नोवर बसून निघाल्या. थोड्याच वेळात ते कॉलेजमध्ये आल्या.
राजीव आणि त्याची गॅग आली. राजीवने व्हाईट शर्ट आणि त्यावर हाफ सिल्वेस कॅज्युअल जॅकेट घातलेल आणि ब्लैक जीन्स, केस जेल ने सेट केलेले. हातात वाँच, मॅग्नेट परफ्युम मारलेला एकदम कातिल दिसत होता. पण थोडी उदासीशी छटा त्याच्या चेहर्यावर दिसत होती. कसली उदासी आली त्याच्या चेहर्यावर ?
बाहेरच ती तिच्या मैत्रिणी सोबत बोलत होती. सूर्याचा प्रकाश तिच्या चेहर्यावर कपड्यांवर पडत होता. तिच्या जॅकेटवर सूर्यप्रकाशाचे रिफेक्लेशन होऊन ते राजीवच्या डोळ्यांवर येत होते. त्याने ते आधी इग्नोर केले पण मग त्याने त्या दिशेला पाहिले. तो क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला होता. बोलतांना होणाऱ्या तिच्या ओठांची हालचाल, कुंदासारखे शुभदंतपक्ती आणि तिची कातिल करणारी स्माईल., चमकणारे डोळे , आणि हलणारे एरिंगज, मध्येच ती गालावरची बट अनामिकेने बाजूला सावरत होती. एकसारख बघत राहावं अस वाटत होत त्याला, ती आत गेली तरी राजीव चे लक्ष नव्हते. मित्राने त्याला धक्का दिल्यामुळे तो भानावर आला आणि त्याला स्वतःचाच राग आला.
'असा कसा पाहू शकतो मी दुसऱ्या मुलीकडे मला नमूशी लॉयल राहिले पाहिजे.' तो मनातच विचार करत होता . पार्टी असल्यामुळे हॉलला छान असं डेकोरेशन केले होते. आणि आज स्टूडंट खूप सुंदर दिसत होते.त्यात मुली तर सांगायलाच
नको ! मुलांना तर आज नेत्रसुख मिळणार होते.
एक मुलगी एक मुलगा दोघं अँकरिंग करत होते मध्येच हसवत होते . गेम्स खेळले त्याचे शिक्षक हि त्यात सामील झाले होते . तिथे प्रत्येकाला बोलायला स्टेजवर बोलवण्यात आले. राजीव आणि त्याची गँगच आली. त्यांनी सर्व शिक्षकवृंदाचे आभार मानले. पार्टी अरेंज करणाऱ्या पहिल्या वर्षाच्या स्टुडंटचे आभार मानले. अनुभव शेअर करतांना अनिकेत राजीव नमन शंतुन भावूक झाले त्यांनी एकमेकांना ग्रुप हग केला .
नमू त्यांना पाहत होती. तिचे आणि विनीचे डोळे पाणावले होते. त्यांनी सर्व शिक्षकांच्या पाया पडून त्यांना अभिवादन केले शिक्षकांचे हि मन भरून आले होते. शंतनू ने त्याच्या जवळ गिटार आणली आणि नजरेनेच त्याला गाणे म्हणण्यास सांगितले. राजीवने नाही म्हटले. मग खालूनही त्याच्या नावाचा आवाज येत होता. सर्वांनी त्याला रिक्वेस्ट केल्यावर त्याने गिटार हातात घेतली डोळे बंद केले आणि तान छेडली.
तू सफर मेरा, है तू ही मेरी मंज़िल
तेरे बिना गुज़ारा, ऐ दिल है मुश्किल
तू मेरा खुदा, तू ही दुआ में शामिल
तेरे बिना गुज़ारा, ऐ दिल है मुश्किल
मुझे आज़माती है तेरी कमी
मेरी हर कमी को है तू लाज़मी
जूनून है मेरा, बनूँ मैं तेरे क़ाबिल
तेरे बिना गुज़ारा, ऐ दिल है मुश्किल
त्याने जसे गाणे म्हणायला सुरवात केली तशी नमू अस्वस्थ झाली. हातांची चुळबूळ सुरू झाली होती. डोळ्यांत आसवांची गर्दी झाली. नमन, शंतनू ,अनिकेत ही त्याला पाहून वाईट वाटत होते. कधीपासून शोधतोय तिला पण ती अजूनही भेटलीच नव्हती . गाण्यातून त्याला होणारा त्रास जाणवत होता.
ये रूह भी मेरी, ये जिस्म भी मेरा
उतना मेरा नहीं, जितना हुआ तेरा
तूने दिया है जो, वो दर्द ही सही
तुझसे मिला है तो, इनाम है मेरा
मेरा आसमां ढूँढे तेरी ज़मीं
मेरी हर कमी को है तू लाज़मी
ज़मीं पे ना सही, तो आसमां में आ मिल
तेरे बिना गुज़ारा, ऐ दिल है मुश्किल
सगळे त्याच्या गाण्यावर मंत्रमुग्ध होऊन डोलायला लागले होते. त्याच्या आवाजातील वेदना त्याच्या मित्राला आणि नमूला बरोबर कळत होती. राजीवच्या आवाजातील आर्त हाक नमूच्या हृदयावर घरे करत होती. राजीवचे डोळे काठोकाठ भरलेले होते म्हणून त्याने डोळे मिटून घेतले. नमूला तिथे बसणे शक्य नव्हते. ती उठायला लागली तर विनीने तिला पकडून जबरदस्ती बसवून घेतले. तिच्या डोळ्यांतून गरम कढ वाहत होते. या गाण्यातून त्याने तिच्यावर प्रेम किती आहे हे दाखवून दिले होते.
माना की तेरी, मौजूदगी से, ये ज़िन्दगानी महरूम है
जीने का कोई दूजा तरीका, ना मेरे दिल को मालूम है
तुझको मैं कितनी, शिद्दत से चाहूँ, चाहे तो रहना तू बेखबर
मोहताज मंज़िल, का तो नहीं है, ये एक तरफ़ा मेरा सफ़र
सफ़र, खूबसूरत है मंज़िल से भी
मेरी हर कमी को है तू लाज़मी
अधूरा हो के भी, है इश्क़ मेरा क़ामिल
तेरे बिना गुज़ारा, ऐ दिल है मुश्किल .
डोळ्यांत दाटलेले अश्रू तरीही ओठांवर हसू ठेऊन तो गाण गात होता. तिला एक नजर पाहण्यासाठी किती झुरत होता. आणि ती त्याच्यापासून लांब जात होती. तिला तिथे थांबणे अशक्य झाले आणि ती बाहेर गेली ते सरळ वॉशरुममध्ये जाऊन तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तोंडावर हात ठेऊन ती हुंदके देत रडत होती. विनीही तिच्या मागे मागे आली. तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत करत होती. नमू विनीच्या मिठीत शिरून रडत होती.
"तू एकदा भेट नं त्याला !" विनी.
शांत झाल्यावर नमू तिच्यापासून दूर झाली.
" चल आपल्याला जायचं आहे न ." नमू
इकडे त्याचेही मन भरून आले होते गाणे संपलं तस तो बाहेर निघून आला होता. आणि बाहेर येताच त्याचे डोळे बरसायला लागले होते. पाठोपाठ ते तिघही त्याच्या मागे आले. ते त्याला सांत्वना देत होते. आपल्या मित्राला अशा परिस्थित पाहून त्या तिघांना ही दुःख होत होते.
" राजीव प्लिज यार आम्ही तुला देवदास झालेला नाही पाहू शकत." अनिकेत .
" राजीव बी पॉझिटिव्ह तुला ती नक्की भेटेल ! आपण शोधतोय नं तिला." शंतनु .
" तुम्हाला माहितीये का , आपण तिला कितीवेळचा शोधतोय पण ती समोर आली नाही कारण तिला समोर यायचंच नाहीये ." राजीव .
"म्हणजे ? " अनिकेत .
"विचार करा आपण कमी प्रयत्न केलेत का तिला शोधायला ! असं आहे का की आपण कॉलजेमधून कोणाला शोधू शकत नाही . कॉलेजच्या बाहेराचा जरी असला तरी आपण शोधून काढतोच. हो की नाही!"
"हो आपण लगेच शोधून काढतो. त्या व्यक्तींची जन्मकुंडली काढून आणतो आपण !" शंतनू
"पण मग हेच का होत नाहीये ? कारण तिला समोर यायचं नाही. बहुतेक तिला आपण शोधतोय हेही माहित असावं म्हणून तर ती पळतेय आणि तिला शोधण्याच्या प्लॅनवर पाणी फिरतयं."
" हं असं असू शकते ."
"पण का येत नाहीये ती समोर ? " नमन.
"याचे उत्तर तर तीच देऊ शकेल ना." शंतनू.
"हम्मऽऽऽ , पण या करिता ती आधी भेटली तर पाहिजे." अनिकेत.
"आपण तिला लवकरच शोधू ." सर्व एकसाथ म्हणाले.
"आता चला सगळे वाट पाहत असणार." राजीव.
पार्टीहॉलमध्ये एंटर केल्यावर सर्व नाचत मज्जा मस्ती करत होते. त्याने पूर्ण हॉलभर नजर फिरवली. व तो एका बाजूला जाऊन उभा राहिला. त्याच्या मित्रांनी हाताला धरून त्याला नाचायला लावलं .
मुलीचा घोळका जमला आणि त्यात विनी आणि नमू ला ही जबरदस्तीने ओढून घेतले. मनावर दगड ठेवून ते दोघही खूप आनंदी असल्याचे दाखवत होते. नाचता नाचता तिचं ब्रेसलेट खाली कधी पडलं तिला कळलचं नाही. धम्माल मस्ती करून ते ती घरी गेले .राजीव हि त्याच्या मित्रांना भेटून घरी निघून आला .
नमू घरी आल्यावर अंघोळ करून फ्रेश होऊन ती बेडवर लोळत पडून राजीवचा विचार करत होती. कॉलेजमधला जसाच तसा, गाणं म्हणणरा राजीव तिच्या डोळ्यांसमोर आला आणि पुन्हा तिच्या डोळ्यांत पाणी तरळले, अचानक तिचं लक्ष हातांवर गेले. आणि ती इकडे तिकडे शोधू लागली. खूप शोधूनही तिला सापडलं नाही.
घरी आल्यावर तो बाथरूम मध्ये शॉवर घेण्यासाठी गेला तर त्याच्या जॅकेट मधून एक ब्रेसलेट खाली पडलं. ते उचलून घेऊन तो त्याला एकसारखं पाहत होता. ते ब्रेसलेट तर नमूच होतं." कधी भेटणार आहेस नमू ?" नमू चे ब्रेसलेट खाली पडल्यावर ते राजीवच्या पायाजवळ आले. मुला मुलीच्या पायाने ढकलत ते त्याच्याजवळ पोहचले. पाया खाली आल्याने त्यांचे घुंगरू तुटून पडले होते.त्याने ते उचलून घेतले आणि त्याला लगेच क्लिक झाले, ते ब्रेसलेट तो कसं विसरणार होता. त्याने ते खिशात ठेऊन दिले . ब्रेसलेट घेण्यासाठी तर ती नक्कीच येईल आणि ती आज भेटेल अस त्याला वाटत होते. त्याच्या आशा पल्लवीत झाल्या ,तो कितीवेळ तिथेच थांबला होता . पण ती आलीच नव्हती . वाट पाहून तो घरी निघून आला. शॉवर च्या पाण्यात त्याच्या डोळ्यातील आसवे बाहेर पडत होते. त्याचा हिरमोड झाला. त्याने ते पॅन्टच्या खिशात टाकले. आवरून तो बाहेर आला.
"कशी झाली पार्टी ?" आरतीने विचारले.
"छान झाली ."
"मग असा चेहरा का उतरलाय ?"
"पुन्हा हे दिवस येणार नाहीत ना म्हणून " आईला खर सांगणे टाळले.
"टिनू यात चेहरा पाडण्यासारखं काय आहे. हिच सोनेरी आठवणांची शिदोरी घेऊन पुढे चालायचे असते. कळलं ! आरती राजीव च्या गालावर हात थोपटत म्हणाल्या. त्यानेही हसून उत्तर दिले. "
******
आरतीने राजीवचे कपडे काढले धुवायला तर त्यांना जॅकेट च्या पॉकेटमधून ब्रेसलेट हाती लागलं. त्यांनी ते काढून पाहत होते त्यांनाही ते कुठेतरी रोज पाहिल्यासारखे आठवत होते. पण नेमके कुठे हे आठवेना ! त्यांनी ते स्वतःजवळ ठेवून घेतलं. राजीवशी या विषयावर रात्री बोलू असा मनोमन विचार करून त्या त्यांच्या कामात मग्न झाल्या.
रात्री जेवण झाल्यावर राजीव त्याच्या रुममध्ये लॅपटॉप घेऊन बसला होता.
"टिनू बाळा मला बोलायच तुझ्याशी !" आरती रुममध्ये येत म्हणाल्या.
"यात विचारयचं काय आई , तुला केव्हापासून परमिशनची गरज लागते. तू कधीही केव्हाही माझ्याशी बोलू शकते." राजीव लॅपटॉप बंद करून आईच्या मांडीवर डोके ठेवून बेडवर पडला . आरतीचे बोट हळूहळू केसांमध्ये फिरवायला लागले.
"टिनू , कोणाचं आहे हे? तुझ्या पॉकेट मध्ये दिसलं ." ती त्याच्यासमोर ब्रेसलेट धरत म्हणाली .
"आई ते एका मुलीचं आहे, काल मला ते माझ्या पायाजवळ दिसलं . ती माझ्याच कॉलेजमधली आहे. आणि मी तिच्यावर प्रेम करतो."
"कोण आहे ती ?
"नमू तीच नाव पण मी तिला पाहिलं सुद्धा नाही.
"काय म्हणतोस टिनू !" आरती आश्चर्यचकीत झाली.
"हो आई. असं म्हणून तो आरतीला नमू ,विनीचं बोलणं ते पहिल्यापासून सर्व सांगितले.
राजीव सोबत बोलल्यावर आई त्याच्या डोक्याला तेल लावू देते आणि तो लगेच निद्रादेवीच्या अधीन गेला.
क्रमश ..
पहिल तर खूप खूप खूप खूप खूप सॉरी भाग यायला खूप उशीर झाला. त्यासाठी मनापासून तुमची माफी मागते.
हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा. तुमच्या जितक्या जास्त कमेंट येतील तितकाच मला लिहण्याला आनंद येईल तर मग लवकर कळवा. पुढचा भाग लवकर पोस्ट करेल. वाचत राहा आणि कळवत राहा
stay tunne and happy reading.
धन्यवाद .
