Login

ये दिल है मुश्किल .. भाग -7

"आई अशी वारंवार बाहेर काय बघत होतीस ?" आरती बाहेर आल्यावर राजीवने विचारले. "माझ्या मैत्रिणीची व

ये दिल है मुश्किल ..

भाग -7

     सकाळी सूर्याच्या किरणांनी नमूला जाग आली. कॉलेजसाठी रेडी व्हायला गेली तर तिल आठवले की आज कॉलेजला सुट्टी होती आणि आजपासून तो दिसणार नव्हता या विचाराने तिचे मन खट्टू झाले . निदान रोज त्याला दुरून पाहता तरी यायचे पण आता तो तिला दिसणार नव्हता. तिनेच तर त्याच्या समोर जाण्यासाठी नाही म्हटले होते. तिने एक मोठा उसासा सोडला आणि बाथरूम मध्ये शावर खाली उभी राहून मनातील विचार झटकले. आवरून ती किचन मध्ये गेली. आई साबुदाण्याची खिचडी करत होती ती आईला मदत करत होती. मदत करून ती विनीसोबत तिच्या नेहमीच्या मंदिरात गेली. मंदिरात त्यांनी पूजा केली आणि तिथेच थोडावेळ डोळे मिटून बसली. बंद डोळ्याच्या आत ही तिला एक चेहरा दिसला. तिने पटकन डोळे उघडले. तिने बाप्पाचे नामस्मरण करायला सुरवात केली. थोडावेळ बसून दोघेही निघाले. त्या दोघी गेल्या आणि राजीव आणि आरती 

सोबत आले. तो मंदिराच्या बाहेर उभा राहिला.

"चल ना आत दर्शन घे !", आरती राजीव शी बोलत होती .

"मी नाही येत तू जा !" राजीव.

"का, काय झाले?"

"रूसलोय मी त्याच्यावर सारखी सारखी परिक्षा घेतोय माझ्या प्रेमाची ." 

"जोपर्यंत ती समोर येणार नाही तोपर्यंत मी मंदिरात पाय सुद्धा ठेवणार नाही." तो मनातच म्हणाला.

" पण !" आरती त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती पण तो आत जाण्यासाठी तयारच नव्हता.

आज त्याला त्याची नमूची भेट होणार होती पण ... काय माहिती काय आहे बाप्पाच्या मनात !

मंदिरात पुजा करून आरती त्या दोघींची वाट पाहण्यासाठी सारखे सारखे बाहेर बघत होती. बाहेर असून सुद्धा राजीवचं लक्ष त्यांच्यावर होतं .

"आई अशी वारंवार बाहेर काय बघत होतीस ?" आरती बाहेर आल्यावर राजीवने विचारले.

"माझ्या मैत्रिणीची वाट बघतेय .

"तुझ्या मैत्रिणी ?

"हो माझ्या मंदिरातल्या मैत्रिणी ..जश्या तुझ्या शाळेतल्या , कॉलेजतल्या तशा माझ्या मंदिरातल्या मैत्रिणी ."

"बरं येऊ देत."

"ताई त्या मुली तुमच्या येण्याआधीच गेल्या. " मंदिरातील पुजारी. 

"मुली तुझ्या मैत्रिणी ." त्याला आश्चर्य वाटले .

" हो .. का मुली असू शकत नाही माझ्या मैत्रिणी ?" आरती.

" हो असू शकता ग पण आजवर तुझ्या वयाचेच मैत्रिणी पाहिल्या न मी म्हणून म्हणालो." राजीव

" आता लहान असलेला पण असता." आरती.

" देवा , आज भेट नाही झाली त्यांच्या बरोबर." आरती .

"चल जाऊ या घरी ."

"हो …"

दुसऱ्या दिवशी नमू आणि आरतीची भेट झाली.

राजीव व त्याची गँग अधूनमधून भेटत होती.

आरतीने राजीवला कित्येक वेळा मंदिरात यायचे म्हटले तरी तो नाहीच.

 काही दिवसांनी राजीवच त्याच्या आईला घेण्यासाठी मंदिरात गेला. तर त्याला आज आई मंदिरातून लवकर घरी गेल्याचे कळले. तितक्यात त्याचा फोन वाजला फोन महत्त्वाचा होता म्हणून तो मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन बोलत होता. फोन वर बोलून तो आनंदला. खुषीतच तो जाण्यासाठी वळला आणि त्याच्या कानावर काही शब्द पडले आणि तो तिथेच स्तब्ध झाला.

"नमू ,का इतका त्रास करून घेते स्वतःला आणि त्यालाही 

देतेस ?" विनी.

"विनी तुला माहितेय मला त्या बाप्पातही त्याचा चेहरा दिसतो. त्याचे पाणीदार डोळे सतत मला प्रश्न विचारत असता विनी मी काय करू गं, मला समजत नाहिये ग." तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.

"शांत हो नमू ,त्याला एकदा भेट , बोलून घे त्याच्यासोबत !" विनी.

"मी जर त्याला भेटले तर त्याला नकार देऊ शकणार नाही विनी."

"मग नकोच देऊ त्याला नकार !"

"बाबा तयार होणार नाहित विनी त्यांना हे अजिबात आवडणार नाही. त्यांचा आधीपासूनच विरोध आहे या सर्वांना. मला त्याला खोटी आशा दाखवायची नाहीये. म्हणून मी त्याच्या समोर जात नाहीये." नमू .

मनातील भावना दाटून आल्या आणि तिने विनीसमोर व्यक्त केल्या. नमूने तिच्या समोर ही व्यक्त झाली नव्हती पण तिने आज मनातील भावना विनीजवळ मोकळ्या करून दिल्या.

विनी ने तिला रडू दिले मग ती रडल्यावर शांत झाली. दोघे घरी जाण्यासाठी निघाले राजीवने दूरूनच सर्व ऐकले होते. तो तिच्याकडेच पाहत होता पण त्याला चेहरा अजून काही दिसलाच नव्हता. विनी तिच्या समोरून बाजूला झाली अन् त्याला तिचा चेहरा दिसला. टपोऱ्या काळ्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत गालावरून खाली आलेल्या, ते छोटसं नकटं नाक लाल झालेल, ते ती नॅपकीन ने पुसत होती अन् वरती ओढत होती. त्यामुळे ते जास्तच लाल होत होता. स्काय ब्लू कलरचा चुडिदार ड्रेस, कमरेपर्यंत रुळणारे काळे सिल्की केस तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर मिलियन डॉलरची स्माईल आलेली.

 त्याला लगेच क्लिक झाले अरे त्या दिवशी हिच्या ड्रेस वर असलेल्या मिररमुळे त्याच्या चेहर्‍यावर प्रकाश पडला आणि काही वेळ तो तिच्यात हरवला अन् लगेच भानावर येऊन त्याने स्वतः च्या मनाला बजावलं होतं. ही तर माझीच नमू आहे त्या दिवशी मी माझ्याच नमूत हरवलो होतो. तो भलताच खूष झाला इतका की त्याला नाचावसं वाटत होतं. ओरडून सांगाव वाटत होतं ." दिसली मला माझी नमू ऽ थॅक्यू बाप्पा !" असं म्हणतं त्याने हात जोडले. ती जाण्यासाठी निघाली होती. चालता चालता ही त्या बोलत होत्या आणि राजीव त्याच्या मागे त्यांना दिसणार नाही पण त्याचं सर्व बोलणे ऐकत होता .

"नमू , तुझ ब्रेसलेट कोठे आहे ?" विनी.

"अगं ते त्या दिवशी फेअरवेल पार्टीत हरवलं कुठे पडलं काय माहिती. घरी आल्यावर पाहिले मी. दुसऱ्या दिवशीही मी शोधलं तिथे पण सापडलं नाही गं ."

"हम्म ऽऽ "विनीने गाडीला किक मारली आणि ते दोघे घरी गेले.

तू काळजी करू नकोस मी लवकरच बाबांनाचा होकार मिळेल आय प्रॉमिस." मनोमन त्याने तिला वचन दिले .

 राजीवने त्याच्या खिशातून ब्रेसलेट काढलं आणि त्यावर ओठ टेकवले अन् त्याने मंदिरात प्रवेश केला. बाप्पाची मनोभावे प्रार्थना केली सॉरीही म्हणाला. त्याने त्याच्या मित्रांना फोन लावून कॉफी शॉप मध्ये बोलवून घेतले.

घरी आल्यावर त्याने सर्वात आधी आरतीला सांगितले .

"आई , मला आज नमू भेटली म्हणजे दिसली."

"कुठे? आरती उत्साहात म्हणाल्या. "

" मंदिरात मला वाटलं येतांना तुला घेऊन यावं म्हणून मी मंदिरात गेलो तर तिथे मला कळलं की तू केव्हाच गेली तेवढ्यात माझा फोन आला म्हणून मी मंदिराच्या मागे फोनवर बोलायला गेलो तेव्हा विनी आणि नमू बोलत होत्या."

 मग राजीव त्या दोघांच बोलण सर्व आरतीला सांगतो. राजीवच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता तो आनंद आरतीला दिसत होता. 

"मी कितीवेळ म्हटलं तुला माझ्यासोबत मंदिरात चल तर तू टाळत होता."

"मी नाही येत मी नाही येत म्हणून भेटलं नं तुझं उत्तर तुला ."

" आई तुला माहित होत का नमू मंदिरात येते ."

"टिनू, ज्या दिवशी तू मला सांगितल त्याच वेळेला मला असं वाटलं की ही ती तर नसेल म्हणून तूला मी म्हणत होते. पण तू तर ऐकायलाच तयार नव्हता. आणि मी खूप खूष आहे की मला ही ती आधीच पसंत पडली होती."

"आई तिचेही प्रेम आहे तिच्या डोळ्यात दिसत पण ती बोलत नाही. ती खूप रडत होती ग, म्हणे बाबांना नाही आवडणार ."

"मुलगा जर चांगला असेल, कमावता असेल आणि त्यांच्या मुलीवर खूप प्रेम करणारा असेल तर का नाही हो म्हणणार ते."

"आई हो म्हणतील ना ते."

"नक्कीच हो म्हणतील ."

"आईवडिलांना मुलांचे सुखच महत्वाचे असते. तू काळजी करू नको." आरतीने त्याच्या खांद्यावर थोपटून धीर दिला.

*******

 विश्वासरावांनी त्याच्याजवळ विषय काढला.

"राजीव, तू उद्या पासून ऑफिसला यावं अस मला वाटतेय."

"बाबा, मला दोन वर्ष यु एस ला तिथल्या कॉलेजमधून शिकायचं आहे त्यानंतर मी ऑफिस जॉइन करेल."

"वॉव दॅट्स ग्रेट टिनू ." विश्वासराव.

"काय ग्रेट हो ,तू आधी का नाही बोललास टिनू " आरती.

"कारण तिकडून कन्फर्मेशन नव्हतं आल गं , आजच मला विहान ने सांगितले. माझा रिझल्ट लागल्यावर मी लगेच तिथे अप्लाय केला." आई ने चेहरा उतरवून घेतला.

"आई हसा चेहरा नको करूस गं फक्त दोन वर्ष तर आहेत पटापटा निघतील ." तो त्याच्या आई चा हात हातात घेऊन समजवत होता.

"आरती जाऊ दे गं त्याला !" विश्वासराव.

"फक्त दोन वर्ष हा टिनू त्यानंतर नाही ."

"हो ." राजीव तिला मिठी मारत म्हणाला.

"कधी जाणार आहेस ? " विश्वास.

 "नेक्स्ट वीक."

"ओके सर्व तयारी करून ठेव. मी येईल सोबत ."

नाही बाबा, विहान येणार आहे एयरपोर्टला ."

" ठीक आहे टिनू ." बोलून विश्वासराव ऑफिसला निघून गेले.

आरती तर तिच्या कामाला लागली. काय करून देऊ त्यासाठी तिने एक एक पदार्थ बनवायला सुरवात केली. बेसनाचे लाडू , खाकरा, थेपले, करंजी भरपूर जिन्नस ती बनवत होती .

ठरल्या वेळाला राजीव त्याच्या मित्रांना भेटायला गेला. ते एका कॅफेत आले. 

"राजीव काय झाले इतकं ताबडतोब बोलवलं ? "

"हो, दोन गुड न्यूज द्यायच्या आहेत." राजीव.

"हो का ."

"हो पहिली गुड की माझं सिलेक्शन झालं यु.एस ए च्या युनिव्हरसिटीला ." राजीव.

"वॉव काँग्रेस ब्रो." सर्वांनी त्याला विश करून मिठी मारली. नमन ने सिलेब्रेशन साठी लगेच ऑर्डर ही दिली.

"आता दुसरी गुड न्यूज ती कोणती ?" शंतनू .

" मी तिला पाहिलं!" राजीव.

"कोणाला ?" सर्वच एकसाथ म्हणाले.

" तिला ." राजीव .

" तिला कोणाला ?" पुन्हा एकत्रच म्हणाले.