Login

ये दिल है मुश्किल .. भाग -9

माझा मित्र राजीव त्याचा ऑक्सिडेंट झाला त्याला खूप लागलय. मला वेळ होईल घरी यायला तुझ्या मैत्रिण

ये दिल है मुश्किल

भाग -9

    राजीव मुद्दामून नमूला दिसण्यात येईल तिथेच तो जात होता. तिला त्याच्या सोबत त्या मुलीला पाहून वाईट वाटत होते आणि हेच पाहून राजीवला जास्त दुःख होत होतं आणि त्याच्याकडून हे नमन शंतनू आणि अनिकेत करवून घेत होते. ती मुलगी दूसरी कुणी नसून त्यांची दूरची नातेवाईक होती . जी त्याची बहिणी समान होती. राजीवच्या प्रेमाखातिर ती ही हे नाटक करायला तयार झाली होती . नमामीचे त्यांना पाहून हि दूर निघून जाणं त्याला सहन होत नव्हतं आणि तो एक दिवस तिच्या समोर जाऊन उभा राहिला.

"नमू , मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे." तिने आवाजच्या दिशेने पाहिले. आणि ती शॉक झाली. विनीला हायसे वाटले तो आला होता.

"तुम्ही बोला मी बाहेर आहे ." असं म्हणून विनी बाहेर निघून गेली..

"का करतेस अशी ? इतका त्रास होतोय तर का त्रास सहन करतेस." मोठ्या प्रयत्नांने तिने डोळ्यातील अश्रू डोळ्यातच अडवले.

"मी काय केलयं मिस्टर , मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही."

"खरचं ओळखलं नाही का तू ?" तो तिच्या नजरेला नजर लावत म्हणाला.

"मी खोटे कशाला बोलेन." ती नजर चोरत म्हणाली.

"बरं ओळखत नाही ना तर मी ओळख करून देतो."

"मी राजीव तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुही करतेस ,माहिती आहे मला. म्हणून तर मुद्दामून दूर पळत होतीस."

"नाही, आकर्षण वाटत असेल तुम्हाला , बाकी तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी नाही करत तुमच्यावर प्रेम ब्रिम !"

" एक वर्ष तुला न पाहून तुझ्यावर प्रेम केल मी आणि तू म्हणते हे आकर्षण आहे आणि म्हणून तू अस्वस्थ होतेय का? म्हणून तुझे हात थरथरताय ! म्हणून नजर खाली झुकली आहे. हूँऽऽ " त्याने तिच्या नजरेला नजर देत म्हटले.

"एकदा बोल ,मी सगळं ठीक करेल आय प्रॉमिस ! "

"मी नमू नाहिये तुमची , ती मुलगी तुमच्याबरोबरची ती आहे तुमची नमू मी नाही." असं बोलून ती जायला निघाली तसे त्याने तिचा हात धराला .

मग त्याने तिची बॅग हातात घेतली आणि तिच्या बॅगेतून त्याची कविता लिहलेला कागद बाहेर काढला.

"तूच माझी नमू आहे." तो ते चिठ्ठी तिच्या समोर धरत म्हणाला.

"बघ आताही वेळ आहे. नंतर नाही, पुन्हा कधी तुझ्या नजेरसमोरही मी येणार नाही. नंतर पश्चाताप होऊन ही मी तुझ्या समोर नसणार आणि तू अशीच रडत बसशील जशी मंदिरात रडत होती आणि आता ही ! ती हात सोडवून तिथून धावतच गेली. बाकीचे शब्द त्यांचे ओठांतच राहिले ,पुढचे ऐकण्यासाठी ती थांबली नव्हती.

"काय करू यार मी या मुलीचं !" त्याला भयंकर राग येत होता. राजीव म्हणाला तिला मी सर्व ठीक करेल पण तरीही ती काहीच ऐकून न घेता ती तिथून निघून गेली. तो रागतच गाडीवर बसला किक करून जायला निघाला. 

घरी आल्यावर नमामी तिच्या रुममध्येच होती. आईबाबा लग्नाला गेले असल्यामुळे ती बाहेरही आले नाही. नमनचा मोबाईल वाजला .

"नम्या , …"

"क्काय ऽऽ सांगतो . आलोच !" नमन. तो इतक्या मोठ्याने म्हणाला की रुममधील नमू ऐकून बाहेर आली.

 मोबाईलवर त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले आणि चेहर्‍यावर काळजी दिसू लागली अन् त्याचबरोबर डोळ्यांत अश्रू ही जमा झाले.

"काय झालं दादा ?"

"माझा मित्र राजीव त्याचा ऑक्सिडेंट झाला त्याला खूप लागलय. मला वेळ होईल घरी यायला तुझ्या मैत्रिणीला बोलवून घे आणि दार लावून घे." बोलत असतांनाच त्याने गाडीची चावी घेतली आणि नमन लगेच बाहेर पडला. पण हे ऐकून नमू मटकन खाली बसली.. डोळ्यांत असावांची गर्दी होऊन त्यांनी मोकळी वाट धरली. आणि आता ती हमसून हमसून रडू लागली. काही वेळापूर्वी म्हटलेलं वाक्य तिच्या कानात मनात डोक्यात घुमू लागले." पुन्हा कधीही मी तुझ्यासमोर दिसणार नाही."

"नाहीऽ." ती मोठ्यानेच किंचाळली. तोपर्यंत विनी तिच्याजवळ आली. नमनने विनीला तिच्याजवळ बोलवून घेतले होते.

"सांभाळ नमू स्वतःला ."

"कशी सांभाळू ग मी माझ्याच मुळे झाले हे, मी स्वतः ला कधीच माफ करणार नाही. विनी !" नमू विनीच्या गळयात पडून रडत होती.

"किती आर्जव करत होता माझी, पण मी मूर्ख त्याचं काहीच ऐकलं नाही. त्याची शिक्षा मला दे बाप्पा पण त्याला नको. बाप्पा काहीही करून त्याला सुखरूप ठेव बाप्पा !" ती बाप्पाला विनवत होती. विनी तिला समजवण्याचा प्रयत्न करत होती. डोळ्यांतून अविरत अश्रू वाहत होते. डोळे ही रडून लाल झाले होते. तिने विनी करवी नमनला फोन लावायला सांगितले. आणि फोनवरच ऐकून नमू सून्न झाली.

"हिज नो मोअर !" ती धावतच ज्या अवतारात होती त्या आवराततून घरातून बाहेर पडली. स्कूटीला चावी लावातांना तिचे हात थरथर कापत होते. विनीने पटकन घराला कुलूप लावून चावी तिच्या आईकडे देऊन आली आणि नमूच्या हातातील चावी घेऊन विनीने गाडी स्टार्ट केली. स्कुटी निघाली हॉस्पिटलच्या दिशेने, गाडीवरून उतरून ती धावतच आत गेली. नमन रुमच्या बाहेरच होता तिला पाहून तो पटकन तिच्या जवळ गेला.

"दादा कुठेय ते ?" त्याने रुमकडे बोट दाखवले आणि नमू आत गेली. आत बेडवर एक व्यक्ती पडून होता त्याचा चेहरा पूर्णपणे झाकला होता. तिने मोठ्या हिमतीने तो कपडा बाजूला केला आणि समोर बघून ती शॉक झाली. समोर राजीव पडलेला होता.

"किती नशिब खराब आहे त्याचं, जिच्यावर प्रेम करतो तिनेही त्याचं प्रेम एकसेप्ट केलं नाही. किती प्रयत्न केले त्याने पण काहीच झालं नाही. तू नको वाईट वाटून घेऊ नमू, त्या मुलीला त्याचं काही वाटत नाही तू का बरं काळजी करते. आज जर तिने त्याचे प्रेम स्विकारले असते तर तर तो जिवंत असता पण त्याच्या नशीबात हेच लिहलेल असेल म्हणून तो." नमन जरा शांत बसला.

"नाही दादा , दूर्देवी तर मी आहे. माझ्यामुळेच हे झाले नशीब माझं खराब आहे, माझं ही खूप प्रेम होत त्याच्यावर दादा !" ते तिच्या दादाला सांगत होती.

"नमू ऽऽ."

"हो दादा मीच आहे ती मुलगी ." ती रडू लागली.

"पण नमू आता त्याचा …" तो बोलतच होता की ती नमू राजीव जवळ गेली .

"राजीव उठा ना मला माहितीये मी तुम्हाला खूप त्रास दिला . आय लव्ह यू राजीव, आय लव्ह यू , मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही .. प्लिज राजीव उठा माझ्यासाठी तुम्ही नाही तर मी ही नाही राजीव ." ती बोलतच रडतच त्याच्या छातीवर निपचित पडली. तिची काही हालचाल नाही म्हणून नमन तिच्याजवळ गेला तर त्याला समजले की ती बेशुद्ध पडली आहे. त्याने अनिकेतला खुणावले त्याने लगेचच डॉक्टरांना बोलवून आणले. राजीव हळूहळू शुद्धीवर येत होता तो शुद्धीवर आल्यावर त्याला त्याच्या छातीवर भार जाणवले. आणि त्याने पाहिले तर बेशुद्ध पडलेली त्याची नमू होती .

"नमूऽ." त्याने हळूच हाक मारली.

" बेशुद्ध पडलीय ती , तुझा धसका घेतला तिने , नाही येईल ती शुद्धीवर , अन्या डॉक्टरांना बोलवायला गेलाय."

"पण ती इथे कशी आली ?तिला कुणी सांगितलं आणि का सांगितलं ?" तितक्यात डॉक्टर आले.डॉक्टरांनी तिला तपासले. तिला मेंटली शॉक बसल्यामुळे तिचा बी.पी लो झाला आणि ती बेशुद्ध पडली त्यांनी तिला बेडवर झोपवून सलाईन लावली.

"नम्या, हिला ऑक्सिंडेंटचं सांगून इतका मोठा शॉक लागला की ती बेशुद्ध झाली."

"ऑक्सिडेंटचा नाय काही तुझ्या मरणाचा !" तो थोडा हसत म्हणाला .

"काय ते .. काय म्हणाल्यास !"

"हो ..मी तिला सांगितल की तू गेला!" नमन त्याला हाताने वरती खूण करत सांगत होता.

"अरे काय केलस रे , ती शुद्धीवर आल्यावर भयंकर चिडेल रे ऽ."

"गाढवा तुझं काम सोपं केल मी , ती आली ही आणि तिने तिचं प्रेम कन्फेस केल ही तेही आम्हा सर्वांसमोर कळलं जिजाजी !"

क्रमश ...

0

🎭 Series Post

View all