Login

ये जो देश है मेरा भाग २

ये जो देश है मेरा
भाग २

अजय आणि राही यांना लग्नाच्या खूप शुभेच्छा भेटल्या. त्यांचे लग्न छान थाटामाटात जवळच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारात संपन्न झाला होता.
आता लग्न झाले होते. लग्नाचे सर्टिफिकेट आल्यानंतर व्हिजा निघणार होता. काही दिवसातच मॅरेज सर्टिफिकेट आले. नंतर व्हिजा प्रोसेस सुरू झाली होती. अजय एक महिन्याची सुट्टी घेऊन लग्नासाठी भारतात आला होता. अजयच्या सुट्ट्या संपत आल्या होत्या पण राहीचा व्हिजा आला नव्हता. अजय आणि राही तिच्या आई बाबाकडे गेलेले असताना राहीच्या बाबांनी अजयला विचारले , " व्हिजा आल्यावर राहीला घ्यायला कधी येणार आहात ? "
" मी राहीचा व्हिजा आला की सगळ व्यवस्थित समजून सांगतो. तुम्ही इथून तयारी करून घ्या राहीची. " अजय म्हणाला.

बाबा : पण पहिल्यांदा एवढ्या दूर कस पाठवायच ? आमच्यापैकी कोणीही एवढ्या दूर गेलेल नाही , त्यामुळे काही माहिती नाही.

अजय : बाबा मी सगळी व्यवस्था करून देईल . तिकीट बुक करून देईल .आणि काळजी करू नका. बाबा आणि दादा आहेतच मदतीला , ते तयारी करू लागतील . मी राहीला सगळी प्रोसेस व्यवस्थित समजावून सांगेल . तुम्ही निश्चित राहा .काळजी करू नका .

अजयने राहीच्या बाबांना समजावून सांगितलं होत पण मनाला काळजी असतेच .

अजय स्वतः मनात म्हणाला , " आज आपण किती सहज बाबा आणि दादा यांच नाव सांगून राहीच्या बाबांना भरोसा दिला . "

बाकी तर अजयला नेहमी वाटत होत की मला कोणाची गरज लागत नाही .

अजय गेल्यावर राही काही दिवस माहेरीराहून सासरी आली होती . सासरी आई-बाबा ,दादा-वहिनी त्यांची मुले असे कुटुंब होते. नवीन नवीन सासरी आणि त्यात आता सोबत अजय नव्हता त्यामुळे राहीला फार भीती वाटत होती .

घरातले सगळे समजून घेणारे होते त्यामुळे तिला काही दिवसात छान वाटायला लागल होत . मुले काका काकू करून तिला खेळायला बसवून घेत होती . राही पण नवीन नवीन गोष्टी गोष्टी त्यांना शिकवत होती . आई आणि वहिनी घरातले रितीरिवाज सांगत होत्या .

आता राहीला वाटत होते की अजय नसतानाही सगळ्यांनी किती समजून घेतले तरी अजय असता तर खूप छान वाटले असते.

सासरे चांगलेही असतात हे आज ती बघत होती. जास्त करून सासर म्हणजे त्रास देणारे हा तिचा समज आज गैरसमज झाला होता. राहीने लहानपणापासून हेच बघितले होते यात तिचा दोष नव्हता. तो काळ तसा होता म्हणून तिला वाटत होते. भारतात राहण्यापेक्षा छान परदेशात निघून जायचे. तिथच स्थायिक व्हायचे. सासर , नातेवाईक हे सगळ तिलाही कटकटीच वाटत होत्या.

घरातल वातावरण खूप छान होत. देवधर्म थोडफार होता पण त्यालाही शिस्त होती. रीतीरिवाज हे अंधश्रद्धा म्हणून नाही तर समजून श्रध्देने केले जात होते. हे सर्व बघूनच तिलाही समजायला लागले होते. छोटी छोटी दादा , ताई ( भावजय ) , मुले आठवड्यात एकदा दोनदा जवळच्या मंदिरात आजी-आजोबा सोबत जात होती. ती खूप सहज रामरक्षा इतर श्लोक म्हणत होती.

मन इथे रमत असताना आज लग्नानंतर दोन महिन्याने राहीचा व्हिजा आला होता.

मनात हुरहूर
नव्या स्वप्नांची
नव्या जोडीदाची
नव्या संसाराची
नव्या आकांक्षाची

मन कधीच गेलं होतं अजयजवळ , फिरून आले होते तिचे घर.
( अजयने लग्नाआधी आणि नंतर व्हिडीओ कॉलवर बोलत असताना पूर्ण घर दाखवले होते. )

राहीचा व्हिजा आल्यावर लगेचच अजयने तिकीट बुक केले होते. अजयने राहीला व्यवस्थित समजावून सांगितले होते. राहीने त्याप्रमाणे सर्व तयारी केली होती. राहीच्या बाबांना तिला एकटे पाठवणे आवडत नव्हते. अजयचे बाबा , दादा यांनी सगळी मदत केली होती. समजवून सांगितले होते. एअरपोर्टवर राहिला आई ,बाबा , सासू, सासरे ,दादा ताई ,त्यांची छोटी मुलं हे सर्वजण सगळे सोडायला आले होते.

आता राहीच्या संसाराची खऱ्या अर्थाने सुरुवात होणार होती. आज राही निघाली होती दूर देशात पहिल्यांदा एकटी विमानाने प्रवासासाठी. मनात भीती होती पण निश्चय ही होता कधी न परत येण्याचा.

🎭 Series Post

View all