भाग ३
राहिला घ्यायला अजय एअरपोर्टवर गेला होता .
घरी आल्यावर अजयने राहीचे छान स्वागत केले होते . घर छान सजावले होते . दरवाज्यात माप नव्हतं तर छान तांदूळ भरलेला ग्लास ठेवला होता . कुंकवाच्या पायाने राही आज घरात आली होती .
घरी आल्यावर अजय आणि राही दोघांनी मिळून छान केक कापला आणि एकमेकांना भरवला .
आता खऱ्या अर्थाने अजय आणि राही यांचा संसार सुरू झाला होता . दोघांचे मनाप्रमाणे नातेवाईकांपासून दूर आणि परदेशामध्ये .
राहीने तिथे गेल्यावर लवकरच नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले होते . दोन महिन्यात राहीने नोकरी सुरू केली होती . अजय आणि राही दोघांची नोकरी सुरू झाली होती . दोघं एकमेकांना समजून सांभाळून राहत होते .
एका दिवशी दोघे गप्पा करत बसले होते .
अजय राहिला म्हणाला , " आई-बाबांना काही दिवस इथं बोलावून घेऊया. "
अजय राहिला म्हणाला , " आई-बाबांना काही दिवस इथं बोलावून घेऊया. "
राही खूप खुश होऊन म्हणाली ,
" हो तुम्ही विचारून बघा. ते तयार असतील तर सगळं बुकिंग करून देऊ , तिथून दादा वहिनी बसवून देतील. इथे आल्यावर आपण घ्यायला जाऊ .
लगेचच अजयने घरी फोन केला आईला विचारलं ,
"तुम्ही दोघं इथे येणार का ? मी सगळं बुकिंग करून देतो . "
आईने विचारले , " कधी यायचं आम्ही ? "
अजय : " मी तुमची व्हिजा प्रोसेस करतो. त्याला साधारण महिना दीड महिना लागेल. त्यानंतर येता येईल .
आईने विचार करून सांगितलं , " अरे मार्च महिन्यात मुलांच्या ( नातू नात ) परीक्षा आहेत . तुझ्या वहिनीच्या माहेरात लग्नही आहे. तेव्हा तर जमणार नाही . मुलांकडे लक्ष द्यावं लागत . त्यानंतर तुझ्या ताईच्या सासरी लग्न आहे . त्यानंतर येता येईल . "
" ठीक आहे " अस बोलून फोनवरच बोलण संपल .
लग्न आणि परीक्षा यांचा अनुभव अजयला
लहानपणापासून खूप होता .
लहानपणापासून खूप होता .
आई-बाबा हे अजय , ताई , दादा यांना घरी ठेवून जवळच्या लग्नकार्याला जात होते . कधी सुखा दुःखाला गावाला जावं लागत होत .
अजय आईला नेहमी म्हणत असायचा , " आई खूप वेळा अशी माझ्या परीक्षेच्या वेळेस नको जात जाऊस. "
आई नेहमी अजयला समजावून सांगत होती ," अजय अरे एक वेळेस सुखाला नाही गेलं तरी चालतं रे पण दुःखाला आठवण येतेच रे. तेव्हा जावं. तेव्हा आधार वाटतो आपल्या माणसांचा . "
अजय आईला म्हणायचा , " असं काही नसतं आई. कोणी आठवण काढत नाही. जो तो त्याच्या कामाच्या व्यापात असतात. "
असं नेहमी चालू राहायचे आणि आई अजयला नेहमी समजवण्याचा प्रयत्न करत राहायची . शेवटी अजय काही समजत नव्हते .
आई त्याला म्हणायची , " तू मोठा झालास ना की समजेल. "
*****
अजय आणि राही दोघे नोकरी करत होते . आता चाहूल लागली होती नव्या पाहुण्याची . दोघांनी मिळून ठरवल होते , बाळाचा जन्म इथेच होऊ द्यायचा . बाळाच्या वेळेस थोड्या सुट्या मिळतील . दोघी आजी आजोबा यांना बोलावून घेऊया . त्यानंतर डे केअरमध्ये ठेवू .
अजय आणि राही यांच्या संसारवेलीवर आता कळीची सुरुवात झाली होती . ही छान गोष्ट राहिने सासरी माहेरी दोन्ही घरी सांगितली होती . दोन्ही घरी खूप आनंद झाला होता .
दोन्ही घरून राहीला अजय यांना अभिनंदन सांगितले . काळजी घेण्यासाठी सांगितले .
अजय आणि राहीने राहीच्या आई-बाबांना राहीला नववा महिना लागेल त्यावेळेस येण्यास सांगितले होते.
अजयच्या आई-वडीलांना राहीचे आई बाबा आल्यानंतर साधारण एक महिन्याने येण्यास सांगितले होते.
दोन्ही घरून यायला आता होकार आला होता .
कारण ही तसच खुप आनंदाचे होते .
कारण ही तसच खुप आनंदाचे होते .
राहीच्या आई-बाबांचे राहीला साधारण नववा महिना लागेल तसे बुकिंग केले होते . अजयच्या आई-बाबांचे त्यानंतर एक महिन्या नंतरचे बुकिंग केले होते .
म्हणता म्हणता दिवस जात होते . अजय आणि राही वाट पाहत होते , नव्या बाळाची आणि त्याआधी आणि नंतर येणाऱ्या दोघी आजी-आजोबांची . कारण अजून कोणीही त्यांच्याकडे आलेले नव्हते .
पण म्हणतात ना वेळ सांगून येत नसते आणि झालही तसच काहीस ….
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा