Login

ये जो देश है मेरा भाग ४

ये जो देश है मेरा

भाग ४


राहीला आता आठवा महिना सुरू झाला होता .

" सगळी तयारी झाली का आई ? मी तुझी खूप वाट पाहते आहे . " राहीने आईला विचारले.

" अगं हो झाली सगळी तयारी लवकरच येणारे मी. तुझे लाड करायला ." आई म्हणाली.

राहीच्या आई बाबांची सगळी तयारी झाली होती .
राहीच्या आई-बाबांचे ज्या दिवसाचे तिकीट बुकिंग होते त्या दिवसाच्या आधीच्या दिवशी राहीची आजी वारली .

आई-बाबांचं येणं रद्द झालं होत .
काळापुढे कोणाचे चालत नसते आणि चालतही नाही . राहीचे आई बाबा येऊ शकणार नव्हते कारण परिस्थिती तशी निर्माण झाली होती .

आता राही आणि अजय यांना काळजी लागून राहिली होती ती छोट्या बाळाच्या आगमनाची . ते त्याची वाटही बघत होते आणि काळजी वाटत होती की कस होईल ?

राहीची डिलिव्हरी झाली होती . अजय आणि राही यांना सुंदर गोड मुलगी झाली होती . तिला बघून दोघ खूप खुश होते . थोडी काळजी वाटत होती , एवढ्याशा जीवाला कस सांभाळायचा , कस करायचं . सोबतीला राहीचे आई-बाबा येणार होते , तेही येऊ शकत नव्हते .

अजय आणि राही यांना दोघांना खऱ्या अर्थाने वाटत होत की आपण या वेळेला भारतात आपल्या घरी जायच होत . दोघांनाही घरची आठवण येत होती .

दवाखान्यातून घरी गेल्यावर घरी कसरत सुरू होणार होती . लहान बाळला सांभाळायचं होत . राहीला स्वतःची काळजी घ्यायची होती .

अजय आणि राही यांनी दोघी घरी छान व्हिडिओ कॉल करून छोट्या परीला दाखवल होत . दोघी घरी खूप आनंद झाला होता .

काही दिवसांनी अजयचे आई-बाबा त्यांच्याजवळ आले होते . अजयच्या आईने राहीला खूप छान समजावून सांगितल बाळाला कस सांभाळायचं , सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या तिला सांगत होत्या .

छोट्या परीचा नामकरण सोहळा त्यांनी काही मित्रपरिवारा सोबत केला . तेव्हा खरच दोघांना वाटत होत , आपण भारतात असतो तर हा कार्यक्रम , हा आनंद खूप मोठा करता आला असता .

काही दिवसांनी राहीची नोकरी चालू झाली होती . घरी आई-बाबा होते तोपर्यंत राहिला बाळाची काळजी नव्हती . त्यानंतर डे केअर मध्ये ठेवण्याच दोघांनी मिळून ठरवल होत .

आई-बाबांसोबत राही अजय आणि छोटी परी घरी आले होते .

घरी आल्यावर सगळे खूप आनंदी होते . दादा वहिनी , त्यांची मुल या सगळ्या सोबत परीचा दिवस जात होता .

काही दिवस राही तिच्या माहेरी राहायला गेली होती . तिथे दोघींचे खूप लाड सुरू होते . राही छान आराम करत होती . छोट्या परीला आजी आजोबा सांभाळत होते .

घरी भारतात आल्यावर छोटा गेट-टुगेदर चा कार्यक्रम करण्यात आला होता . तेव्हा सगळेजण राही आणि अजय यांना विचारत होते , तिकडे किती वर्ष राहणार आहे ? काही वर्ष राहू आणि मग पुन्हा येऊ अस राही आणि अजय सांगत होते .

राही आणि अजय यांनी मनामध्ये ठरवले होते कि आपण तिकडे स्थायिक व्हायच .

कारण जर खर सांगितले तर सगळे म्हणतील आपले ते आपलेच असतात तुमच्या वेळेला कोण मदत करेल . सुख दुःख सगळ्यांना असतच .

काही दिवस भारतात राहिल्यानंतर राही अजय यांची पुन्हा जाण्याची तयारी सुरू झाली होती . दोघांच्या घरून त्यांना सांगत होते काही दिवस राही आणि बाळाला इथेच राहू द्या . इथे सगळे सोबत आहे तर व्यवस्थित काळजी घेता येईल . राहीचा चांगला आराम होईल . छोट्या बाळाच्या थोड्या थोड्या दिवसांनी लस चालू असतात तेव्हा काही मुलांना त्रास होतो .
दोघांनाही हे जुने विचार वाटत होते .

शेवटी तीघेही निघाले होते पुन्हा प्रवासासाठी . तिथे गेल्यावर छोट्या परीला त्यांनी डे केअर मध्ये ठेवले होते . दोघांची नोकरी सुरू होती .

घरी सगळे समजावत होते तेव्हा काही वाटत नव्हत .
एकदा राही आणि छोटी एकाच वेळेला आजारी झाल्या होत्या . दोघींना दवाखान्यात अँडमीट केल होत . छोटीला डे केअर मधल अन्न पचत नव्हत अशा वेळी तिची खूप काळजी घेण गरजेच होत . तेव्हा दोघींच करताना अजय खूप थकत होता . त्याची स्वतः ची नोकरी सुरू होती , सुट्या मिळू शकत नव्हत्या .
अजयचे काही मित्र आणि त्यांच्या घरचे यांनी मिळून दवाखान्यात असताना मदत केली होती .

वेळ कोणासाठी थांबत नसते .

🎭 Series Post

View all