Login

ये जो दैश है मेरा भाग ५ ( अंतिम भाग )

ये जो देश है मेरा
भाग ५

वेळ कोणासाठी थांबत नसते. तसच वेळ ही माणसाला बदलवते हे तितकंच खरं आहे.

छोटी परी हळूहळू मोठी मोठी होत होती.

एकदा भारतात येऊन गेल्यानंतर अजय आणि राही पुन्हा भारतात येण्याच नाव काही घेत नव्हते. ते येऊन गेल्यानंतर साधारण सहा महिन्याने आईने विचारलं , " तुम्ही पुन्हा भारतात केव्हा येणार आहे ?"

" आई परत परत किती वेळा यायच ." अजय म्हणाला.

" परत येऊ म्हणजे काय ? आपला देश आपला देश आहे. तुम्हाला आमच्या बद्दल काही वाटत नाही का ? राहीच्या घरच्यांना ही तुम्हाला बघावसं वाटत असेलच . अस सगळ सोडून चालत नाही . इथ सगळ्याना तुम्हाला भेटावस वाटत ."

अजय विचार करून " आई ठिक आहे आम्ही विचार करतो , तस ठरवतो आणि सांगतो . "

निदान एवढ ऐकून आई खूप खुश झाली . आई सांगत होती . अजय राही छोटी आल्यावर काय करणार अस सर्व काही .

अजय मनात विचार करत होता " मी अजून फक्त विचार करेल सांगितले तर आई एवढी खुश आहे . खरोखर तिथे गेल्यावर किती आनंद होईल . "

अजयने राहीला सांगितले " आई भारतात कधी येणार विचारत होती . "
राही अजयला " माझी आई हेच विचारत होती ."

" मग काय सांगितले "

" आई ठिक आहे आम्ही विचार करतो , तस ठरवतो आणि सांगतो . "

एवढ सांगितल्यावर आई खुप खुश झाली होती .

राही " मला वाटत आपण काही दिवस जायला हव भारतात ."

दोघांनी मिळून भारतात जाण्याच ठरवल होत . दोघी घरी सांगितले . दोन्ही घरी खुप आनंद झाला होता .

छोटी परी दोन वर्षाची झाली होती . तीला बोलण्यास समजत नव्हते . छोटे छोटे शब्द बोलत होती पण पाहिजे त्याप्रमाणे नाही . घरातील भाषा वेगळी बाहेर डे केअर मध्ये वेगळी तीला नेमकी भाषा शब्द समजत नव्हते .

एकदा व्हिडीओ काँलवर बोलत असतांना राही आईला सांगत होती
" अग ही पाहिजे तस बोलत नाही . काय करू आता काही समजत नाही . मी कधी बोलायला लागली होती तु कस शिकवल होत . "

आई कपाळाला हात लावत " तुम्हाला बोलण शिकवाव लागच नाही ग , घरात बहिण भाऊ आजी आजोबा असताना हे शिकवाव अस लागत नाही , ते आपोआप होत असत . "
आईने राहीला सरळ सांगितले " तुम्ही काही दिवस भारतात राहायला या . हे सगळ्यात छान आहे . थोडे सणवार होतील तुम्हाला चांगल वाटेल . ती बऱ्यापैकी एक भाषा समजायला बोलायला लागेल . "

असाच काहीसा संवाद अजय आणि आई यांच्यातही झाला होता .

राही अजयला " मी लग्न होऊन आले तेव्हा दादा वहिनीची मुल खूप छान रामरक्षा इतर म्हणत होते . मला खुप आश्चर्य वाटल होत इतकी लहान मुल सुंदर स्पष्ट उच्चारात म्हणत होते . नंतर कळल नेहमी मंदिरात आरती झाल्यावर हे सगळ घेतल जात होत . मुल आजी आजोबा सोबत नेहमी आरतीला जात होती . "

" साध्या सरळ वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला शिकवण किती अवघड झाल आहे . मला वाटत निदान काही महिने तरी आपण किंवा मी आणि छोटी भारतात थांबायला पाहिजे . "

अजय विचार करून राहीला " राही आई आम्हाला लहान असताना मंदिरात आरतीला पाठवत होती तेव्हा वाटत होत घरी आईला त्रास देतो म्हणून पाठवते . पण आता समजत का पाठवत होती आम्हाला बोलायच तर आठवत नाही पण , स्पष्ट उच्चार हे सगळ सहजपणे शिकल गेल . त्यामुळे अभ्यास तसाच लयीत पाठ करत होतो . "

आता काय दोघांनाही कळले होत3 . काही दिवसांनी परत जात राहायला पाहिजे.

तिकीट बुकिंग झाली होती. तिघे निघाले होते भारतात येण्यासाठी .

ये जो देश है मेरा ,स्वदेश है मेरा
ये जो बंधन है कभी तुट नही सकता
ये जो देश है मेरा, स्वदेश है मेरा
ये जो बंधन है कभी तुट नही सकता

बऱ्याचदा आपला देश आपली संस्कृती जेव्हा असते तेव्हा त्याची किंमत समजत नसते.