येशील ना..साथ देशील ना भाग 2

Sath deshil na

येशील ना..साथ देशील ना भाग 2

क्रमशः भाग1

दिवाणच्या कडेला पाठ टेकून ईशानाने डोकं टेकून डोळे मिटले, थोड्या वेळात तिच्या मोबाईलची रिंग वाजली तिने फोन उचलला,


“हलो ईशू, आय एम सो सॉरी , मी तुझा फोन रिसीव नाही केला. मी बिट्टू ला झोपवत होते ना, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी यार..”
“इट्स ओके, मी सहजच केला होता ग, मला ही कळायला हवे होते, तुला ही तुझी काम असतात.”


“इशू सॉरी यार, काय झालं? का अपसेट आहेस ? 
“आज अभिची खूप आठवण येत होती मला,  आणि तो परत आल्याचा भास झाला."


“इशू तू आता शांत झोप मी तुला उद्या भेटायला येते."
“ओके बाय गुड नाईट."
ईशाना ने फोन ठेवला, झोपण्याचा प्रयत्न केला पण तिला झोप काही येईना,  पुन्हा कवितेची डायरी उघडली.


“ झुळ झुळ वारा
 त्यात मातीचा सुगंध
 तुझ्या माझ्या प्रीतीचा
 हा वेगळाच गंध”


 ईशानाला पहिली भेट आठवली त्याच्या ऑफिस मध्ये एन्ट्री होताच पाय अडकून पडणार तेवढ्यात अभिराज ने आपल्या एका हाताने तिला आधार दिला दुसऱ्या हाताने तिच्या डोळ्यावर आलेल्या केसांच्या बटा बाजूला केल्या त्या तिरप्या नजरेतून ईशानानी अभिराज ला पहिल्यांदा पाहिलं होतं.


“ नजर ने नजर से कुछ कहा 
ये नजर यु ना देख हमारी तरफ
 नही तो ये नजर झुक जाएगी
 फिर झुकी हुई नजरो से नजर नही मिला पायेंगे"

 काही मिनिटे दोघेही त्याच अवस्थेत होते आजूबाजूच्या कलिग मुळे दोघे भानावर आले..
 घड्याळाचा आलाराम वाजला आणि इशू पण भानावर आली सकाळचे सहा वाजले होते, ती भराभर उठून कामाला लागली आणि अनायाच सगळं निपटवून ऑफिसला गेली. आज तिला रावी ला भेटायचं होतं.
 ईशाना ऑफिस मधून डायरेक्ट रावी ला भेटायला गेली...रावी तिथे येऊन बसली होती.
रावीच लक्ष गेलं
“हाय इशू."


“हाय...ईशू छोटीशी स्माईल करत.. 
“काय झालं ईशू ? 
ईशाना ला अगदी रडूच आलं आणि ती रडतच,
 “आय मिस्ड अभि,  मला त्याची खुप आठवण येत आहे.


“ईशु स्टोप इट नाउ , तो तुझ्या लाईफमध्ये नाही आहे,  सो यु स्टेबल  नाऊ,  तुला तुझ्या अनायासाठी स्टेबल व्हायचय, विसर त्याला, तो विसारलाय ग तुला. तुला का कळत नाही आहे...अशीच त्याच्या आठवणीत जगत राहिलीस ना तर तुझी लाईफ स्पोईल होईल, त्याला काहीही फरक पडणार नाही आहे, तो तिकडे मस्त मजा करतोय."
 “तू एक काम कर काही दिवस सुट्टी घे आणि आई-बाबांकडे मुंबईला जा तुला बरं वाटेल आणि अनायाला पण काही दिवस चेंज होईल.”
“ नाही ग ,बॉस सुट्टी नाही देणार."
“सोड ग लाथ मार त्याला, तडक अँप्लिकेशन दे आणि फडक निघ, तो सुट्टी देण्याची वाट बघू नकोस."
 थोड्या वेळ गप्पा झाल्या, कॉफी घेतली आणि दोघी आपापल्या रस्त्याने निघाल्या.


 दुसऱ्या दिवशी सकाळी ईशाना नी ऑफिस मध्ये आठ दिवसाच्या रजेचा अप्लिकेशन दिला ,बॉस ची वाट न बघता ती थेट मुंबईला गेली,  गोवा ते मुंबई चा सफर तिच्यासाठी खुप रोमांचकारी असायचा पण यावेळी कसाबसा वेळ गेला, एअरपोर्टवर तिचे बाबा तिला रिसिव्ह करायला आले होते. खूप वर्षानंतर ईशाना मुंबईला गेली. एक दिवस ती अनायाला घेऊन पार्कमध्ये गेली, अनाया खेळत होती, आणि इशू बाकावर बसून होती, तितक्यात तिथे एक  पसत्तीशी चा माणूस आला, इशू समोर उभा राहून 


“ हाय, मी अनिरुद्ध...
“ह...ईशाना ,फक्त मान हलवत....
तो हसून , तुमचं नाव ह आहे...
“हे बघा मिस्टर .. अस म्हणत तिने मान वर केली आणि बघतच राहिली.

क्रमशः

🎭 Series Post

View all