Login

येशील ना..साथ देशील ना भाग 3

Sath deshil na

येशील ना..साथ देशील ना भाग 3

क्रमशः भाग 2

गोरागोमटा,उंचापुरा, कसलेली बॉडी, चेहऱयावर तेज.
“ सॉरी, माझं नाव ईशाना."
“ओह, छान नाव आहे."


त्यानेे त्याचा पूर्ण बायोडाटा दिला आणि निघाला.


तो तिच्या आई-बाबांच्या फ्लॅट च्या बाजूला राहायला आलेला होता,  दोघांची ओळख झाली हळूहळू मैत्री झाली.
इशानाच्या बॉस नी तिला कामावरून काढून टाकले होते म्हणून ती आता काही महिने तरी तिकडेच राहणार होती.

अनिरुद्ध ला इशू हळूहळू आवडायला लागली,  त्याचं घरी येणे-जाणे वाढलं आहे, अनाया सोबत  त्याची छान फ्रेंडशिप झाली, ति त्याला अनि म्हणायची, जशी ईशाना ला इशू...
काही महिन्यानंतर इशाना तिच्या घरी परत गेली, तिने दुसरा जॉब शोधायला सुरुवात केली, एक दिवस अनाया ने अनिरुद्ध ला इशानाच्या मोबाईल वरून फोन केला.


“अरे माझी अनु डार्लिंग, कशा आहे माझा बच्चा."


“मला तुझी आठवण येतेय... येना तू इकडे”
“आलो असतो ग ,पण तुझ्या इशू ला नाही आवडणार...ok मी विचार करतो...तू फोन ठेव नाही तर ममा रागवेल...
काही दिवसानंतर अनिरुद्ध ईशान कडे आला,  घरी दाराची बेल वाजली तिने दार उघडलं
“ अनिरुद्ध तुम्ही इथे ?”
“हो मला तुझ्याशी बोलायचं होतं”
“ या ना, बसा."


“मी वायफळ बोलण्यापेक्षा डायरेक्ट मुद्द्यावर येतो, तो गुडघे जमिनीवर टेकवून  उजवा हात समोर करून
“मला तू आवडतेस, माझी अर्धांगिनी होशील का? माझ्या हातात हात देशील का....? असं डायरेक्ट विचारल.
 इशाना स्तब्ध उभी होती, पण तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले,  तो उठून तिच्या समोर उभा राहिला “काय झालं? तू उत्तर दिलं नाहीस.


“हे बघा अनिरुद्ध हे पॉसिबल नाहीये , माझा एक पास्ट आहे आणि मला एक मुलगी पण आहे,  मी ह्या गोष्टी नाकारू नाही शकत."


“मी नाकारायला सांगतच नाहीये, अगं  तुझ्या पिल्लू शी तर माझी  छान गट्टी जमली आहे आणि राहिला प्रश्न तुझ्या पास्टचा तर त्याच्याशी मला काहीही फरक पडत नाही... तो तुझा पास्ट होता आणि आत्ता... मी तुझ्यासमोर तुझा वर्तमान उभा आहे.”
“विचारणार नाहीस , काय आहे माझा पास्ट...?
“नाही जेव्हा तुला सांगावसं वाटेल ना तेव्हा तू सांग”
“तू जेवढा चांगला वागतो आहेस तेवढा चांगला खरंच तू आहेस का?
“माझं बोलणं तुला खोटं वाटते”
“बोलण तर त्याचंही खोटं नव्हतं पण घात झालाच... मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा?”


 एक मिनिट थांब, अनाया कम  हियर बेटा 
“ही... तुझा जीव की प्राण आहे ना, मग हिच्या डोक्यावर हात ठेवून मी शपथ खातो, जीव गेला तरी तुला सोडणार नाही ...
ईशाना गप्पच होती, तिने आनायला रूम मध्ये पाठवला आणि बोलायला सुरुवात केली,
 अभिराज....
 अभिराज नाव होतं त्याच, आमचं लव्ह मॅरेज होतं, लाइफ खूप छान चालली होती, दीड वर्षातच आनाया झाली, तो कामाच्या निमित्ताने बाहेर असायचा, रात्री रात्री उशिरा यायचा कधीकधी तर रात्रभर बाहेर असायचा. कामाचा व्याप असेल म्हणून मी सोडून द्यायची,कधी त्याला प्रश्न नाही केला, की काय रे बाबा इतकं काय काम असत की तू घरी येऊ शकत नाहीस, विश्वास..

विश्वास होता माझा त्याच्यावर, स्वतःपेक्षा जास्त... कारण नवरा बायको च नात फक्त प्रेम आणि विश्वासावरच चालत....नाही का... पण एक दिवस मला कळलं कि त्याच त्याच्या कलिग सोबत अफेयर  सुरू आहे, माझा विश्वास नाही बसला, कारण तेच विश्वास..

या शब्दानेच माझा घात केला, त्याच्या मित्राने मला असे काही फोटो दाखवले की ते बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली. 

क्रमशः

🎭 Series Post

View all