येशील ना.
राहुलला मुंबईत नोकरी लागली होती. त्याचे वडील तो लहान होता तेव्हाच वारले होते. आईने त्याला बाऊज शिवून, त्यांचे पैसे येत होते. त्यातून त्याला शिकवले होते. त्यामुळे त्याची सगळी काळजी आणि प्रेम फक्त आईनेच दिली होती. गावात राहणाऱ्या राहुलला शहरात जाऊन काम करायला जायचे नव्हते, पण आईने त्याला पाठवले. "जाऊ दे, मुला, तू उगाच घरात अडकू नकोस. मेहनत करून सुख मिळव," आई म्हणाली होती.
राहुल शहरात रमला होता. दिवसभर कामात व्यस्त राहत होता.. त्याला काम आवडत होते, आणि पैसे पण छान मिळत होते. रोज काहीतरी नवीन शिकत राहणे त्याला आवडत होते, पण हृदयाने तो नेहमीच आईसाठीच जिव्हाळा ठेवत होता. सहा महिने झाले, आणि त्याने नियमितपणे पैसे पाठवले होते. आई त्याचे पैसे बचत खात्यात ठेवत असे, पण कधीच त्याला पैशांच्या बदली प्रेम मोजलेले नाही. त्याला फक्त भेटायचे होते, बोलायचे होते, त्याच्या प्रेमाची खरी किंमत त्या एका हसण्यात होती.
एक दिवस राहुलने शेजाऱ्यांच्या फोनवरून आईला कॉल केला. त्याने सांगितले की, शहरात त्याने लग्न केले आहे. आई थोडीच हसली, पण काहीच बोलली नाही. त्याच्या प्रेमात ती नेहमीच परिपूर्ण राहिली होती.
"अरे, मुला, तुला आनंद आहे ना?" राहुल म्हणाला,
"हो, आई म्हणाली
"हो, आई म्हणाली
मी तुला शहरात घेऊन येणार नाही, पण तुला भेटायला नक्की येईन." राहुल म्हणाला.
शेवटच्या आठवड्यात राहुलने ठरवले की तो आईला भेटायला येईल. आईने त्यासाठी पूर्ण तयारी केली. घर स्वच्छ केले, त्याला आवडतेले जेवण बनवले, त्याचे आवडते फळ आणि मिठाई ठेवली. आईच्या डोळ्यात उत्साह आणि काळजी दोन्ही चमकत होत्या. "आज राहुल मला भेटायला येत आहे," त्या स्वतःशी बोलत होत्या.
आखिर त्या दिवशी राहुल त्याच्या बायकोसह घरात आला. पण तो जेव्हा दरवाज्यावर उभा राहिला, घर शांत आणि कोरडे वाटले. आई झोपलेली होती, आणि ती त्या जागी होतीच नव्हती, तिचा हसरा चेहरा, आईचा आवाज येत नव्हता. सर्व काही रिकामे वाटत होते. राहुल हळूच घरात शिरला आणि आईकडे बघत, एका जागेवर पाहत उभा राहिला.
त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. "आई, मी आलो," त्याने हळूच पळून सांगितले, पण उत्तर आलं नाही. त्यांची आई वारली होती. एकदा राहुलला बघता येईल म्हणून त्या जिवंत होत्या. आपल्या मुलाला आवडते. ते सगळं बनवून ठेवले होते. राहुल त्यांच्या आईचे कार्य केले.
त्या दिवशी राहुल आणि त्याची बायको शांत बसून आईच्या आठवणींमध्ये हरवले. राहुलला समजले, की काही गोष्टी जीवनात परत येत नाहीत, आणि आईची माया हृदयात कायम राहतं. शहरातील पैसा, सुख, लग्न, सगळं महत्वाचं आहे, पण आईसारखी ममता आणि तिचा अहंकार मुक्त प्रेम काहीही बदलू शकत नाही.
राहुलने ठरवले, की पुढे तो आईची आठवण कायम जपेल, आणि त्याचे जीवन तिच्या शिकवणी प्रमाणे जगेल.