Login

येता विसाव्याचे क्षण भाग 2

Yeta Visavyache Kshn
भाग 2

स्पर्धा -अष्टपैलू महासंग्राम 2025
दिनांक 12 jan2025

येता विसाव्याचे क्षण

मागील भागात आपण पाहिले

सून चांगली आहे ,पण तिला ही जीव असतो...सहन सहन किती करावे...जर समोरचा मनाने कोरडा वागत असेल तर आपण किती पाणी ओता कमीच असते.

व्यर्थ नको जिव्हाळा ...थोडा आम्हाला ही हवा प्रेमाचा आपुलकीचा सोहळा ..


त्यांच्या रोजच्या कटकटी होत नव्हत्या..पण चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते शर्मिलाला.


मग तीच राहून राहून फोन करत ,सासूबाईची खोड माहीत होती...सून स्वतःहून बोलल्या शिवाय त्या कधीच बोलत नव्हत्या..तिला माझी गरज असेल तर येईल..असा गुण होता. त्याला सासूचा मान पान राखणे असे गोंडस नाव होते.

मग काय सून आणि तिचे नमते घेणे हे सासरी आल्यावर तिच्या पाचवीलाच नवऱ्याने पुजले होते, अगदी पहिल्या रात्री..त्याने सांगून ठेवले होते

"आई ही माझा जीव की प्राण आहे, तिला दुखावले म्हणजे मला दुखावले . "

"त्याचा आपल्या पहिल्याच रात्री पाढा वाचायची काही गरज होती का ?? " ती हळूच म्हणाली

"काय ,काय !! म्हणालीस तू, हा पाढा वाटला का तुला " तो रागात

तिला आधीच खूप थकवा आला होता ,तिला हे ऐकून हसावे की रडावे वाटत होते...मी झोपते म्हणून जांभई देत झोपून गेली...तसाच सगळा पेहराव... घागरा..दागिने ..त्याला द्यायचे दूध ठेवून...

त्याने ही तिकडे तोंड फिरवून घेतले...आणि तो ही रागात झोपला.. आणि पुन्हा उठला तिच्या अंगावरील दागिने काढले.. टोचणार्या पिना काढून बाजूला केल्या..गजरे काढले ,तर काही चुरगळले..तिची ओढली काढली...रुतणारे बन्स काढले...तिच्या अंगावर चादर टाकली...

ती किती सुंदर आहे ,किती निरागस, आणि स्वभाव ही चांगला आहे तरी मला माझे आई प्रति प्रेम कसे आहे हे सांगणे भाग होते, म्हणून जसे आईने सांगितले तसेच मी तिला सांगून मोकळे झालो ,त्यात काय चुकले..तो मनाशी बोलत होता

"A राणी उठ ना !! अशी कशी झोपतेस ग..ही आपली पहिली रात्र आहे...ह्याची आठवण काय लक्षात ठेवणार आहेस तू ..?" तो तिला उठवत होता

"मला आठवणीत राहणार हे तुमचे बोलणे, आता किती ही काही करा...पहिल्याच दिवशी सासू आली आपल्या मध्येच... मग दुसरी काय आठवण राहील.."

"अग चुकलो ,चल गप्पा मारू मला झोप नाही येत ,मी खऱ्या अर्थाने हे नको बोलायला हवे होते.." तो कान पकडत

"दुसरा दिवस उजेडला असता ना ,हे सांगायला की आजच सगळं सांगून आदर्श मुलगा होण्याचे दाखले द्यायचे होते.." ती रागात

पुन्हा ती त्याच्या कडे तोंड करून झोपली, त्याच्या हातात हात दिला.. आणि म्हणाली..."ही केसात पिन राहिली आहे ती काढा मग आता.."

-----------------

असे वर्ष जात राहिली ,ती ही आता सगळ्यांचे स्वभाव ओळखून होती..नवरा साथ देत होता...आता दोघींची साथ देत होता...आई विरुद्ध बायको हा मदऱ्याच्या खेळातील माकड होने बाकी होते..

शर्मिला ,"अभि आईचे वय काय रे असेल आता.?"

अभिमान ,"असेल ना जवळजवळ 70 पर्यंत असेल. "

"मग आता ह्या वयात साधारण बायका बऱ्याच गोष्टी विसरतात हो ना !! हो ना ! हो ना !! "

"तू असे तीन वेळेस हो ना का म्हणालीस, माझ्या कडून काही सत्य मान्य करून घ्यायचे आहे का ."

"आई सहसा विसरत नाहीत काहीच ,बाकी त्यांच्या वयाच्या बायका बघ ,पटापट विसरतात..जसे सूननेने चूक केली ,सुनेकडून कप फुटला...तिने नवऱ्याकडून पैसे घेतले...ती दळण विसरली..म्हणून त्या बाऊ करत नाहीत बरं.. आता ह्या वळणावर त्या ही सुखी आणि त्यांच्या सुना ही सुखी आहेत.."


"शक्यच नाही आईच्या बाबतीत हे ,ती विसरणे शक्यच नाही..तल्लक आहे बर बुद्दी आईची.."

"मला हे सुख म्हणजे नशिबी नाही ,मी हळूहळू विसरत चालले आहे ,पैसे कुठे ठेवले ,कोणाला दिले..किती दिले... आज हप्ता भरायचा होता..पण ह्या कधी विसरतील.."

"हो ,म्हणजे तू विसरलीस तर मला किती उसने पैसे दिले होतेस ते..मग मज्जा आहे माझी.."

"नाही हो नाही विसरले ,मला लक्षात आहे मी तुम्हाला 50 हजार दिले आहे.. तुम्ही विसरले असणार पण मी नाही.."

"अग 50 नाही तू फक्त 30 दिले आहेत ,अस खोटं बोलतेस ,थांब आईलाच सांगतो तुझे नाव.." तो गम्मत करत होता

दोघा नवरा बायकोचे तसे छान पटत ,आईला ते ही नव्हते बघवत...आज आजारी पडली आणि त्यांना दोघांना थोडा निवांत वेळ मिळाला.. ते जवळ आले.. थोड्या तक्रारी आता प्रेमात बदलत होत्या.