भाग 3
येता विसाव्याचे क्षण
अष्टपैलू महासंग्राम 2025
12 jan 2025
12 jan 2025
सासू म्हणजे खरंच कटकट करणारी असेल तर हवी असून ही अडचण वाटू लागते..
तिने आता सून घर सांभाळू लागली तर घरात मर्यादित लक्ष घालावे की आपली हुकुमत अजून ही आहे हे तिच्या समोर सिद्ध करत रहावे..
बघू ही सासू आणि ही सून दोघी पैकी मर्यादा कोण राखते... सून सोडून देईल का ?? पण मर्यादा नाही राखली गेली तर ....तर काय करावे सुनेने बघू.
मुलाची भूमिका ही महत्त्वाची ठरते बरका ह्यात
तो आता लवकर घरी येत ,तिची वाट बघत ,ती आली की तिला आणि आईला चहा करून देत.
आईच्या प्रेमाच्या कोषातून बाहेर आल्यावर कळते बायको ही ह्या आनंदाला मुकू नये..तिला ही आपल्या वेळेची गरज असते..फार आई वेड ही असू नये... मर्यादा त्याला ही असते हे त्याच्या मनाला सांगत होता .
तिचा आणि त्याचा चहा ते सोबत बाहेर बागेत घेत.. तिला दिवसभर घडलेल्या गोष्टी सांगत...गम्मती सांगत.. तिचा थकवा दूर करत..
हे लांबून आई बघत, तिरकी तिरकी नजर ठेवण्यासाठी थोडी हालचाल करत...तिला हसण्याचा आवाज आला की लगेच त्यांच्या गप्पांमध्ये व्यतेय आणत..
त्यांना मुलगा आपल्यापासून लांब गेला आहे ही सल सलत असत, रोज घरी आला रे आला की आई तू कुठे ,आई कुठे आहे म्हणत आई कडे यायचा...पण हल्ली तो बायको बायको करतो..ह्याचा राग राग होत होता.
"त्या हंसाला म्हणावं ,तुझ्या तिकडे वृद्धाश्रम असेल तर मला नेऊन टाक तिकडे. " सासू ओरडली
सासूचा आवाज आला नाही असे समजून दोघे ही बोलायला लागले ,त्यांच्या कडे दुर्लक्ष केले..अपूर्ण गोष्ट पूर्ण होऊ दिली..
ह्या दोघांचे लक्ष नाही ,हे असे मला सोडून कसे गप्पा मारत आहेत..आजारी आहे ना मी कळले पाहिजे...त्यात नवरा ही गेला मित्रांसोबत..तो ही खुश आहे...आनंदी आंनद आहे घरात माझ्या मुळे... आजारी नसते तर कोणाची हिम्मत असे वागायची माझ्यासोबत.. ती सून छान धाकात ठेवली होती ती ही मार मज्जा मारते नवऱ्या सोबत..
त्यांनी पुन्हा हाक दिली ,"दया मला पाठवून आश्रमात ,मी नकोय कोणाला तर..असतात बऱ्याच माझ्या सारख्याच टाकून दिलेल्या गरीब बिचाऱ्या म्हताऱ्या जाईल मी तिथे"
नातू आला होता खेळून ,तो आजीचे बोलणे ऐकून गेला आजी कडे..
"कुठे जायचे आजी तुला ,मी सोडू का तिथे.. लांब नाही ना ते ठिकाण .." संकेत
"मेल्या संकड्या ,मला पोचवतो का तू तिकडे...हो रे आता तुमचेच दिवस ,तुमचेच राज्य द्या सोडून मला...रहा खुश आनंदात.." आजी
"आई काय झालं ग, अशी का बोलत आहेस जरा ही धीर नाही का होत तुला...आता तर वाटते तुम्ही लोक हे असे वागत असतात खोडसाळ म्हणून तुम्हाला आश्रमात पाठवतात.." आज अभि खूप चिडून बोलला..ही त्याची पहिलीच वेळ होती आईसोबत रागात बोलण्याची.
"बोल रे तू ही ,घे बोलून...तिच्या गोड गोड बोलण्याला भुलत आहेस..आम्ही नव्हतो का आमच्या नवऱ्याच्या लाडक्या...असे नव्हतो वागत हो आम्ही.."
लगेच सासूचे बोलणे मनाला लागले म्हणून शर्मिला निघून जात होती..आज कुठे पहिल्यांदा त्याने तिच्या बाजूने बोलले तर त्यांना राग यावा..
"मी जाऊन माझी कामे करते ,ते करत असेल तरच मी सासूबाईला आवडते.. कायम सासुरवास हा जणू करावासा असावा ,बिन बोभाटा सहन करावा...मला त्यात काही वाटत नाही.."
त्याने तिचा उरलेला चेहरा पहिला ,ती खरे बोलून गेली ,आज किती तरी वर्षांनी दोघे निवांत बसले होते...आज संकेत 16 वर्षाचा झाला आहे तरी बायकोला आईच्या धाकात ठेवून आईला त्याचे सुख देत आलो होता अभिमान...
"बायको ,ये बाहेर ये..! आज तू ही काही करायचे नाही...बांधील बांधील किती बांधील राहायचे आहे तुला, किती बांधील ठेवू मी तुला..?"
"बाबा ,जाऊद्या आई आजीच्या आनंदासाठी करत आहे..आपण ही तेच तर करत असतो ना नेहमी, मग आज आजीचे काय चुकले..सवय तुम्ही लावली आहे मग त्याची लत लागली तर आजी कशी दोषी.." संकेत लगेच बोलला
आजोबा ही आले बाहेरून, त्यांना घरात शांतता जाणवली..काल जी आनंदी शांतता होती ती जाणवली नाही त्यांना ,म्हणून ते लगेच म्हणाले ,"संकेत तुझी आजी बरी झाली वाटतं.. काय म्हणून सगळे गप्प.."
आजीने त्यांना ही रागाने पाहिले म्हणाली ,"तुम्हाला ही तोंड आहे हे आज जाणवले.."
"तू बोलून कुठे देतेस कोणाला ,इतकी धाकात ठेवणारी आई ,बायको मान्य आहे पण आजी म्हणून ,सासू म्हणून हे कोणी का सतत खपवून घ्यावे..मग वाटते तू आजारी आहेस तेच बरं आहे.." आजोबा
"थांबा जरा ,कुठे काय केले आहे मी...गप्प आहे म्हणून बोलत रहाणार का मलाच..?" आजी
खोड काही केल्या जात नव्हती ,काय अवस्थेत आहोत आपण...आजारी म्हणून घ्यायचे..आणि भांडणाला उठायचे... कुठून यावे इतके हे बळ..
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा