भाग 4
येता विसाव्याचे क्षण
स्पर्धा..अष्टपैलू महासंग्राम 2025
12 jan 2025
12 jan 2025
सगळ्यांनी जणू दावा धरला सासूबाई सोबत..
नवरा धाकात होता कारण कटकट नको नुसती ह्या बाईची..
मुलगा धाकात होता कारण आई आहे ,मन दुखवायला नको..
सून धाकात कारण जो नवरा आपल्याला इतका जीव लावतो त्याचे मन आईला दुखवल्यामुळे दुखवायला नको..
नातू तर आजीला जीव लावतो म्हणून दुखवू शकत नाही...
पण धाकात धाकात असलेली नाती टिकत नाहीत..कुठे तरी तुटतील ह्याची भीती जास्त असते...म्हणून सांभाळून घेत जात असतात..
"आई मी आता माझी वेगळी सोय करतोय..तू कुठेच जाऊ नकोस...लोक आम्हालाच नको ते बोलतील... तुझी बाजू चूक हे माहीत असून ही दोष आम्हाला देतील.." अभिमान म्हणाला
"तू जा रे अभि, मी ही सोय करत आहे ,
वृद्धाश्रमात माझी..." आजोबा म्हणाले
वृद्धाश्रमात माझी..." आजोबा म्हणाले
"हे काय बोलत आहात बाबा ,नका असे काही बोलून मन अशांत करू...फार काही नाही लागलं ते माझ्या मनाला...मी चांगली कोडगी झाले आहे."
संकेत खेळ खेळायला गेला ,त्याला घरात आता थांबू वाटत नव्हते.. ही मोठी माणसे कधी काय वागतील हे कळत नव्हते..
"मी जातो खेळायला, मला तर घरात येऊ नाही वाटत.."
"अरे गम्मत करत आहोत आम्ही ,तू लगेच त्याचा त्रास करून का घेत आहेस..? थोडे ना भांडण करत आहोत आम्ही !! आजीला समजावत आहोत.." आजोबा
"दुसऱ्यांच्या घरातील आजी किती फ्रेंडली असतात ,नातवा सोबत गेम खेळतात ,आपली आजी तर...!! "
"काय तर !! " बाबा
"ती भांडत असते रे सतत, आईला टार्गेट करते..तुझी आई तुला आवडते, तर माझी आई मला तुझ्या आई इतकीच प्रिय नसेल का ?? तिला कोणी बोललेलं मला आवडेल का ?? " संकेत
संकेतच्या ह्या बोलण्यावर विचार करण्यासारखे होते, सगळेच जणू शांत झाले होते...आजी गहन विचार करत होती...
सगळे एकमेकांना जणू डोळ्याच्या इशाऱ्याने प्रश्न विचारत होते...आई जर बाबांची आहे म्हणून ती इतकी खास होऊ शकते ,तर मग संकेतच्या आईच्या बाबतीत संकेत असा विचार करू शकतो..
"आई कळलं का आपला संकेत मोठा होत आहे ,त्याच्या आईसाठी त्याची तळमळ रास्त आहे की ना सांगा...नाहीतर त्याला धाक देऊन कर गप्प..!! " अभिमान
अभिमान निघून गेला रागात...कोणी ही मर्यादा सोडून वागत नव्हते..फक्त सासूबाई सोडल्या तर..
"बाबा ,आपला संकेत लहान आहे, त्याचे बोलणे नका मनावर घेऊ...आई आहे मी त्याची म्हणून त्याचे मन दुखावले गेले आहे.." शर्मिला
तिने ही खरी बाजू घेतली संकेतची... आज त्याला कोणी गप्प केले नाही.. त्याला कोणी ही त्याच्या लहान वयाचे दाखले दिले नाही..आजोबा तरी का बोलतील ,का रागावतील जर तो चुकीचे काही बोललाच नाही तर..
त्यांनी आता सुटकेचा निश्वास टाकला...जे माझ्या लेकाला जमले नाही तेच त्याच्या मुलाने करून ,बोलून दाखवले.. आता ह्या माझ्या बायकोला सावधान रहावे लागेल...ती संकेतच्या आईशी बोलत आहे ,तेव्हा तिला विचारपुर्वक बोलावे लागेल...हुशार व्हावे लागेल ,कारण आता नवीन पिढी येते...
"शब्बास संकेत, proud of you .." आजोबा
सासूबाई म्हणाल्या, "संकेत वयापेक्षा जास्तच हुशार झाला आहे...खूप बोलू लागला आहे.."
"तूच फक्त हुशार नाही झालीस ग, आज आपण त्यांच्या आधारावर आहोत हे विसरून चालणार नाही..,मी तर जाईल वृद्धाश्रमात पण तुझी काय सोय करणार..?"
"मी राहील माझ्या ह्या घरी ,नाहीतर येईल तुमच्यासोबत...आधार बीधार काही नकोय मला..." त्या तावात बोलून गेल्या
"मी राहील माझ्या ह्या घरी ,नाहीतर येईल तुमच्यासोबत...आधार बीधार काही नकोय मला..." त्या तावात बोलून गेल्या
"मी तर त्यांना माझ्या जबाबदारीतून मुक्त करणार, तुझी जर अशीच कटकट चालू राहिली तर.." आजोबा
त्या उठण्याचा प्रयत्न करत होत्या ,आणि म्हणत होत्या.."मी खमकी आहे ,मोडेन पण वाकणार नाही ."
असे म्हणत होत्या तोच पाठीशी शीर भरली आणि पाया लचक भरली...आणि सासूबाई खाली पडल्या...
आजोबा मदतीला आले पण त्यांना ही उचलता येईना...दोघे ही खूप प्रयत्न करत होते ,ते हतबल झाले होते..
"उठा ,उठा बाईसाहेब ...खमक्या आहात तुम्ही ,तुम्हाला आधाराची गरज नाही...मोडेन पण वाकणार नाही...म्हणत उठा...उठा.." आजोबा रागात म्हणाले
आजीला उठता येईना ,पाया बळ देत नव्हते..त्यात हाताला पलंग लागून रक्त येत होते...ते हाल बघवत नव्हते सासऱ्यांना, तिची कीव येत होती ,तरी त्या मुलाला सुनेला हाक मारत नव्हत्या...
"मी उठेन ,मी उठेन , मी उठणार.. तुम्ही हात द्या ,काही एक गरज नाही कोणाच्या आधाराची.."
आजोबा डोक्याला हात मारून घेत होते...तिला पुन्हा पुन्हा उठवत होते...तरी त्या उठू शकत नव्हत्या...आता सासूबाईला रडू येत होते...
"मी किती खमकी होते ,हा खेळ कसा होऊन बसला...मी आधार हीन झाले ,मला आधार नाही कोणाचा...सगळ्यांनी एकी केली..बोलणे बंद केले...मुलगा तो तसा काही एक कामाचा नसलेला "
-------
"मला आपला संकेत मोठा होत आहे हे आज कळले ,किती मोठा विचार करत असेल तो मनात.."
"साहजिक आहे ना !! आई मुलाचे नाते मी राखतो तो ते बघतो ,मग तो तुलना करतो..त्या तुलणेतून तो बोलला...आणि मला ही डोळे उघडण्यास बघा पडले त्याचे बोलणे असे होते " अभिमान
तिच्या त्याच्या कडे बघत होती ,ती टिपत होती जणू संकेत ने माझी बाजू घेतली म्हणून हा खुश आहे की त्याच्या आईला तिचे चुकीचे वागणे लक्षात आणून दिले म्हणून..की आईला संकेत ने असे बोलून दुखावले म्हणून..
"अरे लिंक लागताच नाही रे.."
"कसली लिंक लागत नाही.."तो
"मला वाटते संकेतचे बोलणे तुझ्या मनात पोहचले की टोचले ह्याची..? "
"खरे तर पोहचले...लक्ख प्रकाश पडावा तसे काही से झाले ,अगदी हललो मी, आणि बाबा ही..तशीच आई ही चमकलीच.." तो हसत म्हणाला
"एकदाच बोलतो तो ,पण नेमके तेच बोलतो बरं संकेत.." ती कौतुक करत
"म्हणजे तुला माहीत आहे ,तो असा बोलतो ते..?"
"कधी कधी आम्ही दोघे गप्पा मारत असतो माय लेक, तेव्हा लक्षात आले होते...किती समजदार आहे तो.." ती
"आईचे बरे असते बरका, ती मुलं मोठी होत असताना सोबत असते मुलांच्या ,मग कळते तो असा सहज मोठा नाही झाला...त्याला मोठे होतांना ती पहात असते...त्याचे विचार आणि वागणे कसे प्रगल्भ होत आहे हे आईच समजू शकते...मला तर वाटलं तो आजच असा मोठ्या सारखा बोलला..." अभिमान
त्याला कळले बाप असून ही अंतर पडले आपल्यात आणि संकेत मध्ये...जबाबदारी घ्यायची असते हा विसर पडला...त्यामुळे अंतर वाढले...आधी किती खेळायचो दोघे... माझ्या शिवाय त्याचा दिवस सुरू होत नसे...आणि ना संपत असे..मी आल्यावर अंगावर धावून येत असे..आता त्याला ही वाटत होते...बाबाला त्याचे आई बाबा हवेत..
"काय विचार करत आहेस..?"
"संकेत दुरावला आहे माझ्यापासून.." अभिमान
"वेळ दे त्याला ,म्हणजे तुला ही तो समजेल कधी मोठा झाला आहे तो...गरज दोघांची ही असते..आई आईच्या ठिकाणी आणि बाबा बाबाच्या ठिकाणी...पण त्याचे वागणे दोघांसोबत वेगळे असते...जे माझ्याकडे नाही व्यक्त होणार ते तुझ्याकडे बोलले जाईल.." ती म्हणाली
"
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा