Login

येता विसाव्याचे क्षण भाग 5 अंतिम

Yeta Visavyache Kshn
भाग 5
अंतिम
येता विसाव्याचे क्षण

स्पर्धा...अष्टपैलू महासंग्राम 2025
12 jan 2025

"माझी चूक मला आज लक्षात आणून दिली आहेस तू, त्याला नाही सांगता येत की बाबा मला तू हवा आहेस पण मी असेल इथून पुढे त्यासोबत ,बरोबर उभा...मग तक्रार नको कसली.."

त्या दोघांनी ठरवले ,आई बाई सोबत जसे असतो तसेच आई बाबा होऊन रहायचे..त्याला ही गरज आहे हा संकेत त्याने दिला आहे..

--------


इकडे सासूबाईला उठून बसवण्यात सासऱ्यांना यश आले नव्हते..

त्यात त्यांच्या हाताला ही लागले होते..

म्हतारा जीव तो ही...कसे ओझे पेलवणार होता.

संकेत तिथून नेटकाच आत चालला होता , त्याने पाहिले हे खेळ..आजी आजोबा दोघे ही खाली बसले होते..

आजीला लागले होते ,रक्त येत होते..आजोबांचा चष्मा ही तुटला होता...आजी रडत होती

तो लगेच तातडीने धावत आला ,आजीला कसे तरी उठवले.. तिला बसवले...पाणी आणायला पळत गेला..

आजीला पाणी देऊन आजोबांना हात दिला..त्यांना ही बसवले, आई बाबांना हाका मारल्या..

तोपर्यंत संकेत आजीची भीती ,थरकाप पाहून तिला शांत करत होता..
"आजी अग काही नाही झाले ,तू आधी शांत हो पाहू...मी आलोय ना मग भीती नाही.."

"आजीला खूप लागलंय बाळा संकेत ,तू आईला बाबाला जाऊन बोलव..डॉक्टरकडे जावंच लागेल ताबडतोब.." आजोबा थर थर कापत घाबरत बोलले

"नका काळजी करू बाबा आलेत...आजी आणि तुम्हाला ही लागले आहेच की आजोबा.." संकेत गुणी जबाबदार मुलासारखा बोलत होता ,त्याची आजी आजोबा प्रति दिसून येत होती

दोघे ही धावत पायऱ्या उतरत आले ,आणि समोरचा नजरा पाहून थकीत झाले..त्यांचे टेन्शन वाढले...
"अरे हे केव्हा झाले ? ,कधी झाले ?...आई कशी पडलीस तू..?" अभिमान

"त्यांना काहीच सुचत नाही ,आई बाबा...आजोबाला ही खूप लागले आहे.." संकेत

संकेत स्वतःच घाबरला पण त्याला समजले इथे आपली गरज आहे ,असे घाबरून नाही चालणार..

"मी घेतो बाबा आजीला उठवून ,पडून नाही देणार .."

"तुला नाही जमणार ,बाबा घेतील " आई म्हणाली

"मी घेतो बाळा आजीला ,तू फक्त आजोबांना टेकू दे...त्यांच्या हाताला धरून आण..." बाबा

संकेत बघत राहिला ,आज बाबा आपल्याला किती वर्षांनी बाळा म्हणाले...

"बाबा ,मी मोठा झालो आहे मी तिला घेऊ शकतो..आणि आई ही पडेल एकी कडून आजीला..."

------ ----

दोघांना दवाखान्यात दाखवून आणले होते..

तिकडून येतांना ,आधार नको म्हणत असलेल्या सासूबाई सुनेच्या आधाराशिवाय चालू शकत नव्हत्या.. पायाला प्लास्टर होते...आता तर जे काही करायचे ते आधार घेऊन.

"आई घ्या आधार, असे नाही चालता येणार तुम्हाला.." शर्मिला म्हणाली

"तुझा आधार नकोच मला ,माझा मुलगा आणि नवरा आहेत देतील तेच आधार.." सासूबाई

"मी बाबांना आधार देत आहे ,जर त्यांना आधाराशिवाय चालता येत नसेल तर तुला कुठून आधार देतील..?" अभिमान

"थोडी जरी लाज असेल तर तू हे बोलली नसतीस... पण आता तरी जागी हो.." आजोबा

सासूबाई लगेच सुनेला म्हणाल्या, "घेते आधार वेळ पडली आहे म्हणून...होऊ दे बरं मग मी कोणाकडे झुकणारी नाही.."

संकेत ,बाबा यांनी बाबांना आधार दिला तो ही मुद्दाम..आजीची खोड जिरवण्यासाठी...ती कशी आईला मदत मागत नाही हे बघायचे होते..

शर्मिला आणि सासरे हे चांगले ओळखून होते संकेत आणि अभिमान ह्यांनी मुद्दाम हा प्लॅन केला असेल..

--------

आजी त्यांच्या जागेवर गेल्या होत्या, आधार देऊन शर्मिला थांबली...पण त्यांच्या नजरेतून आग ओकत होत्या सुनेकडे अश्या बघत होत्या..

कशी कोण सून थांबेल असे रागात पाहिल्यावर.. रोज तर शक्य नाही ,आता तर पाय मोडला म्हणून हंसाला दुप्पट पगार देऊन दिवसभर थांबायाला सांगायचे ठरले होते..

"मला शर्मिला नकोय हो सोबत...तिला जाऊदे तिच्या कामाला...मी राहील एकटी किंवा हंसाला आहेच. "

आता तर सासूबाईची खरी गम्मत होती..

"आपण हंसा ला बोलून घेऊच, ती करते सेवा खूप छान ..!!" अभिमान

आता सासूबाईला आठवले काल आपण हंसाला खूप काही सुनावले होते ,ती म्हणाली होती मी परत नाही येणार ,आता जर घरच्यांना कळले की मीच तिला नको ते बोलून हाकलून दिले आहे ,आणि त्यामुळे ती येणार नाही तर पुन्हा माझी चोरी उघडकीस येईल...

"लाव हंसाला फोन सुनबाई ." आजोबा

"आई हंसा मावशी येईल का पण ??" संकेत

"येते ती ,आज ही येईल, का नाही येणार..माझी जुनी मदतनीस आहे जीव लावते मी तसाच
तिला " आई म्हणाली

"बघ तर आज इतक्या लवकर गेली ,थांबली ही नाही...ना बोलून गेली गप्प गप्प होती.." शर्मिला आई कडे बघत म्हणाली जणू तिला सासुवर शंका आली

तिने हंसाला फोन लावला...

आता खरे कळेल का हंसा सांगेल का ?? तिने सांगितले पाहिजे का सत्य ?? इतके नको ते बोलणे ऐकून फक्त ताई साठी येईल का हंसा..? ती मान सन्मान बाजूला ठेवेल का ??

--------

हंसाला फोन लागला ,तोही पाच कॉल केल्यावर उचलला..
"ताई मी नाही येणार तुमच्या घरी ,नाही होणार सेवा आता, सेवा काय कोणतेच काम नाही करणार.."

"पण काय झाले असे ग हंसा ??"

"सासूबाईंना विचारा सांगतील!!"

बोलत बोलत शर्मिला ने फोन ठेवत सासू कडे बघितले ,त्यांच्या नजरेतून चोरी पकडली गेली..

"येत नाही आता हंसा ही आधार द्यायला, आता माझा ही आधार नको म्हणत आहेत आई मग काय करायचे..?"

सगळे रागात बघत होते ,इतका अहंकार कसा ??कोणत्या परिस्थितीत आहोत

"मी काल खूप बोलले ,तिला आता म्हणून ती येत नसेल.."सासूबाई तोंड पडून म्हणाल्या

तितक्यात काकडे मावशी आल्या होत्या ,खूप रडत होत्या..म्हणाल्या ,"मला माझ्या लेकाने सुनेने घराबाहेर काढले...आणि स्वतःची सोय स्वतः कर म्हणाले...तुला आम्ही आधार देणार नाही..मी कशी कुठे जाऊ म्हणाले तर म्हणतो...जिकडे वाट सुचेल तिकडे जा.."

काकडे मावशी ने हातचा आधार गमावला होता ,त्या ही अहंकारी होत्या..सून आणि मुलाशी पटवून नाही घेता आले...सतत वाद..आणि भांडण करत...म्हणून त्यांना घराबाहेर काढले..

इकडे सासूबाई चपापल्या, घाबरल्या होत्या...त्यांना आता वाटत होते...मला जर बाहेर काढले तर मी कुठे जावं..माझी सून अशी नाही..ती काळजी घेते ,ती नाही असे मुळीच वागणार...मुलगा आणि नातू ही काळजी घेतात ,पण मीच खोटा आव आणून त्यांना धाकात ठेऊ बघत होते...अति झाले तर माझे ही घरात रहाणे नकोसे होऊ शकते..

"आई काय मग ,काकुला तू आधार देशील का ?? बघ तू म्हणत होतीस मला नकोय आधार.." अभिमान म्हणाला..

बाबा म्हणाले , "आईची तब्येत आणि मानसिकता सुधारत आहे बघ अभि...आता त्यांना लगेच बरे वाटेल ,कारण आता मावशी आल्या आहेत बघ.. "

"होय होय ,हो खरंच सोन्यासारखे माणसे माझी ,मला ही वेळ थोडीच आणणार तुम्ही..चुकते हो माणूस म्हणून कोणी घराबाहेर काढणार नाही मला, ठाऊक आहे.. "

"आजी आता खरंच सुधारणा झालीच पाहिजे ,आधार घे किंवा नको घेऊ...आधार हीन जगणे सोपे नाही..मी ही तो विचार केला होता आई बाबा ह्यांच्या शिवाय रहायचा पण नुसता विचार आला आणि हिम्मत हारली.." संकेत

"चला खूप धाक दिला आहे ,खूप भीती घेतली आहे आईने मनात पण, जे घर त्यांच्या शिवाय अधुरे वाटते त्यातून त्यांना कोण बेघर करेन..त्याच तर उलट आपला आधार आहेत.."

आता सगळे खुश होते ,पण काकडे मावशी एकटी पडली होती...तितक्यात त्यांचा मुलगा आला आणि त्याने ,काकडे मावशीला माफी मागत घरी घेऊन गेला...थोडा राग होता तो निवळून गेला आणि पुन्हा मावशी घरी गेल्या..

--------------

ह्या कौटुंबिक कथा फक्त कथे पुरत्या मर्यादित नाहीत...बोध आहे त्यात...आज उद्या आपण वयाकडे झुकणार आहोत..तर तेव्हा थोडे झुकते माप घ्यावे लागते...ते घेणे खूप आवश्यक आहे... अहंकार ,लोभ..मीपणा...ह्यांचा आधार न घेता त्यावेळी प्रेम ,जिव्हाळा, माया ,माणुसकी ,दया ,संस्कार ह्यांचा आधार घ्यावा...तेव्हा इतरांच्या कामी पडावे...पण अडचण होऊ नये...मग तुमचा आधार होण्यापेक्षा तुमचा आधार मागतील ही आपली माणसं..

©®अनुराधा आंधळे पालवे