" कुठे गेली होतीस ?" तिच्या नवऱ्याने तार सप्तकात तिला विचारले.
" घरात सगळी काम तशीच पडली आहेत. आणि घरच्या सुनेला गाव भर भटकायला वेळ आहे." सासू बाईंनी पण त्यांचा राग आळवला.
तिने अजून घरात पुर्ण पाऊल पण ठेवलं नव्हत. तोच सासूबाई आणि तिचा नवरा तिच्यावर बरसला. पण तिच्यावर त्या दोघांच्या रागाचा काहीही परिणाम झाला नाही. तिने शांत पणे तिची पर्स सोफ्यावर ठेवली. समोरच्या खुर्चीवर बसून तिने तिच्या नवऱ्याकडे बघितलं.
" आज रविवार होता. तर आम्ही दोघी बाहेर फिरायला गेलो होतो." तिने तिच्या मुलीला आतल्या खोलीत जाण्याचा इशारा केला. मग तिने नवऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर शांत आवाजात दिलं.
" रविवार काय नेहमीच येतो. म्हणुन काय फिरायला जायचं ? इथ मी तुझा नवरा घरी आहे. तरी तुला घरी नाही थांबता येत. घरातली काम कोण करणारं ? तुला समजत नाही का ? घरातली काम करण तुझ कर्तव्य आहे. तू नसल्यामुळे आईला निकिताला काम करायला लागली." नवरा अधिकच चिडून म्हणाला.
" हो मान्य रविवार नेहमीच येतो. मला पण फक्त रविवारीच सुट्टी असते. म्हणूनच आज मी आणि रेवा सुट्टी एन्जॉय करायला गेलो होतो." स्नेहल म्हणाली.
" मग घरची काम करून जायला काय झालं होत ? तु नसल्याने आईला सगळी काम करायला लागली. निकिता आणि आई दोघी आज दिवसभर काम करत होत्या. त्यांना किती त्रास झाला. तू आपली एकटी सुट्टी एन्जॉय करायला गावभर फिरत आहेस.." तुषार तिच्या अंगावर खेकसला.
" अरे बापरे. पण घरात तर काही कामच नसतात. निकिता वहिनी पण या घरच्या सुनबाई आहेत. एक दिवस त्यांनी घराची जबाबदारी घेतली तर काय बिघडलं ? "
" आई या वयात थोडी फार काम करायला हवीतच. नाही तर शरीराला रोगाचं घर बनण्यास वेळ नाही लागत. " स्नेहल सासूबाई स्वाती बाईना म्हणाली.
" पण सकाळीं सकाळीं तयार होऊन माय लेकीची जोड गोळी कुठं भटकायला गेली होती ? " सासू बाईंनी विचारलं.
" आम्ही दोघी अप्पूघर बघायला गेलो होतो." स्नेहल ने आनंदाने सांगितलं. तसा सासू बाई आणि तिच्या नवऱ्याचा चेहरा पडला.
आज स्नेहल प्रत्येकाच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देत होती. तिच्या सोबत भांडणं करण्याची हिंमत कोणतही नव्हती. त्यांना माहिती होत. एकदा का तिने बोलायला सुरुवात केली की तिला आवरण अवघड आहे.
आज तर निकिता आणि तिचा नवरा सुयश देखील नुसता उभा होता. स्नेहलच्या वागण्याचा राग तर सगळ्यांना आला होता. पण तो राग व्यक्त करून तिला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागवण्याची आणि वाकवण्याची हिंमत कोणा कडेही नव्हती.
" आई मला माझा ड्रेस मिळत नाही." रेवाची हाक ऐकू आली.
" आले बेटा."
स्नेहल म्हणाली. एक नजर घरातील सगळ्यांच्या वर फिरवून तिने तिची पर्स आणि रेवा ची बॅग उचलली आणि तिच्या रुम मध्ये गेली. पण रुम मध्ये जातांना त्या सगळ्यांचे रागावलेले चिडलेले चेहरे बघायला विसरली नाही. एकेकाचा चेहरा तिच्या मनात फोटो काढल्या सारखा लक्षात ठेवला होता.
स्नेहल या घरातील मोठी सून आहे. तिच्या घरी तिच्या सासू बाईंचं राज्य चालतं.तिच्या सोबत तिचा नवरा तुषार दिर सुयश आणि जाऊ निकीता आणि त्यांचा मुलगा रुद्र राहतो. स्नेहलचा स्वभाव या आधी असा फटकळ कधीच नव्हता.
स्नेहलच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. खरं तर तुषारला स्नेहल आधी पासूनच पसंत नव्हती. त्याचं त्याच्या कॉलेज मधील एका मॉडर्न मुलीवर प्रेम होत. त्याला तिच्याशी लग्न करायचं होत. दिसायला गोरी पान, जीन्स पँट घालणारी, फराटे दार इंग्लिश बोलणारी, छोटे कपडे घालणारी, केसांची स्टाईल करणारी मुलगी होती. तूषार ने एकदा तिला त्यांच्या घरी पण नेलं होत. तेव्हा स्वाती बाईना लेकाच्या पुढच्या पाऊल बद्दल शंका आली.
स्वाती बाईना तर सुशील, संस्कारी, घरकाम करणारी सालस स्वभावाची मुलगी सून म्हणून पसंत होती. त्यांना तुषारची मैत्रीण अजिबात पसंत पडली नव्हती. तुषार हट्टाला पेटला होता. त्याला तिच्या सोबत लग्न करायचं होत. त्यावेळी
त्याच्या आई वडीलांनी त्याला प्रॉपर्टी मधून काहीही देणार नाही. अस सांगितल तेव्हा कुठे तुषार ने स्नेहल सोबत लग्न केलं.
त्याच्या आई वडीलांनी त्याला प्रॉपर्टी मधून काहीही देणार नाही. अस सांगितल तेव्हा कुठे तुषार ने स्नेहल सोबत लग्न केलं.
स्नेहल हि त्याच्या आई वडिलांची पसंत होती. त्यावेळी स्नेहल ने नुकतच तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं.तिच्या पाठी मागे तिची बहिण पण लग्नाची होती. नंतर तिचा भाऊ पण शिकत होता. वडीलांनी तिला मागणी म्हणून आलेल्या स्थळाची फारशी चौकशी न करता तिच लग्न लावुन दिलं.
मुलगा नोकरीला आहे. मुलीच्या अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा भागवू शकतो हेच त्यांच्या लेखी महत्वाचं होत. ते त्यांनी पाहिलं.
मुलगा नोकरीला आहे. मुलीच्या अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा भागवू शकतो हेच त्यांच्या लेखी महत्वाचं होत. ते त्यांनी पाहिलं.
तुषारच्या आई वडीलांनी तिच्या वडिलांच्या कडे फक्त नारळ आणि मुलगी इतकचं मागितलं होत. देण्या घेण्याचा कोणताही व्यवहार नाही. यापेक्षा अधिक चांगली गोष्ट कोणती असणार तिच्या वडिलांना ? त्यांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण केलं होत.
स्वाती बाईनी घाई करून लेकाच लग्न लावुन दिलं. त्यांना मनात भिती वाटत होती, तुषार त्या मुलीच्या नादाला लागून लग्न करून आला तर किंवा पळून जाऊन लग्न करून तिला घरी घेउन आला तर ? उगाच रिस्क का घ्यायची ? त्यांनी लेकाचं लग्न लवकरात लवकर लग्न लावुन दिलं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा