स्नेहल आणि तुषारच लग्न खूपच लवकर झालं.ठरल्या पासून अवघ्या दीड महिन्यातचं. त्यांना एकमेकांशी भेटायला बोलायला देखील वेळ मिळाला नव्हता.
त्यात भर म्हणजे स्नेहल हि एका छोट्या शहरात राहिलेली मुलगी होती. तुषार एका मेट्रो सिटी मधे राहिलेला. साहजिकच त्यांच्या विचार सरणीत बरच अंतर होत.त्यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याने तिला स्पष्ट शब्दात सांगितल होत,
" मी तुला बायको म्हणून स्वीकारत नाही. मी फक्त माझ्या आई वडिलांन साठी तूझ्या सोबत लग्न केलं आहे. तू या घरात आई वडील यांच्या साठी आहेस. माझी बायको बनण्याचा प्रयत्न करू नकोस."
" मग माझ्याशी लग्न का केलं ? "
" ते तु आईला विचार."
अस म्हणून तो बेड वर झोपला. त्याला तिच्याशी काहीच देणं घेणं नव्हत. ती तरी काय बोलणार. पहिल्याच दिवशी हि कथा. तिला तिच भविष्य अंधारात दिसु लागलं. रात्रभर रडत बसली. तिच्या मुस मुसण्याचा त्याच्या वर कोणताही परिणाम झाला नाही.
ती फक्त तिच्या सासू बाई साठी आलेली आहे. हे वाक्य तिला शब्द शहा भोगायला मिळालं. तुषार चे लग्न झाल्यावर स्वाती बाईनी घरकाम करण्यातून स्वतः ची सुटका करून घेतली होती. घराकम करायची जबाबदारी तिच्या वर होती. घरात कॉलेज मध्ये शिकणारी नणंद आणि दिर होते. नवरा नोकरीला जायचा. घरात फक्त भांडघासायला एक बाई यायची. ती पण दिवसातून एकदा. तिला फक्त एकाच वेळेची मोजकी भांडी घासायला दयावी लागत होती. बाकिच्या वेळची भांडी तिलाच करावी लागत. सकाळचा चहा नाश्ता पासूनच रात्रीच्या स्वयंपाकाची पर्यंत.
मग ते दिराच्या खोलीतील पसारा आवरण्याच काम असू दे की नणंदेच्या मैत्रिणी अचानक घरी येत असू दे. त्यांच् खाणं पिणं आणि त्या नंतरची आवरा आवर करण्याची जबाबदारी तिची होती.
त्यातुन तिच्या कडून कधी कोणत्या गोष्टीला उशिर झाला, काम करण्यात चुक झाली तर येता जाता कोणीही तिला सूनवून जात.
सासरच्या लोकांच्या या वागण्याला कंटाळली होती ती. या विषयावर तिने तिच्या आई वडिलांना सांगितलं तर आईने तिला ऍडजस्ट करून घ्यायला सांगितलं. माहेरी आधीच लहान बहीण अजुन तिच लग्न जुळल नव्हत. भाऊ शिकत होता. वडील तिची जबाबदारी पेलण्यास असमर्थ होते.
शिवाय लग्न झालेली मुलगी माघारी परत आली तर धाकट्या भावंडांची लग्न जुळण्यास अडचणी निर्माण होतात. हे कारण त्यांच्या समोर होतच. परिणामी स्नेहलला सासरी राहण्याशिवाय पर्याय शिल्लक नव्हता.
आलिया भोगासी असावे सादर म्हणत तिने तिच आयुष्य स्वीकारलं होतं. दरम्यानच्या काळात तुषार च्या त्या मैत्रिणीने लग्न केलं. ती परदेशांत स्थायीक झाली. आता तुषारला स्नेहलला बायको म्हणून स्विकरण्या शिवाय पर्याय नव्हता.
तिच्या मुळे त्याला त्याच्या आवडीच्या मुली सोबत लग्न नाही करता आलं याचा राग तो तिच्या वर काढत होता. समगमन करताना देखील तो तिला त्याच्या प्रेयसीच्या नांवाने संबोधत असे.त्याच्या साठी ती हक्काची भोगाची स्त्री होती. तर घरच्या लोकांन साठी घरकामाला असलेली मोलकरिण होती. दोन वेळच्या जेवणासाठी आणि डोक्यावर छप्पर आणि अंगावर दोन कपडे. इतकीच तिची घरात किंमत होती.
काळ त्याच्या गतीने पुढे सरकत होता. दरम्यान काळात तिला एक मुलगी झाली. त्यामुळे देखील घरच्यांचा तिच्या वर काही अंशी रागच होता. तिच्या नणंदेच् लग्न झालं. तिच सासर त्यांच्या घरापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर होत.
दिराच पण लग्न झालं. निकिता सून बनुन या घरात आली. स्नेहलला वाटलं होतं, आपल्याला एक छोटी बहिण मिळेल. पण सगळं झालंच उलटं. निकीता मोठ्या व्यापाराची मुलगी होती. माहेरून श्रीमंत होती. लग्न करून येताना घरात खुप काही वस्तू पैसे दागदागिने घेऊन आली होती. ती पण सासरच्या लोकांच्या रंगात रंगली. ती पण स्नेहलला घरातली कामवाली शिवाय काही समजत नव्हती.
लग्ना नंतर सुयश आणि निकितालान जुळी मुलं झाली. एक मुलगा आणि एक मुलगी. साहजिकच त्यांचे लाड जास्त होत. रेवाला कायम दुय्यम वागणूक दिली जात. हे सगळं तुषार उघड्या डोळ्यांनी बघत. पण कोणालाही काहीच बोलत नसे. नवऱ्याला जर बायकोची किंमत नाही तर घरातील इतर लोकांच्या कडून काय अपेक्षा करणार ?
लहान मुले असतात तर त्यांच्यात भांडणं होतातच. एक दिवस रेवा तिच्या बाहुली सोबत खेळत होती. सोबतच निकिताची मूल पण खेळत होती.
रेवा आणि आभा दोघींना ती एकच बाहुली खेळायला हवी होती. ती बाहुली तिच्या पोटावर दाबल की म्युझिक वाजवत होती.चांगली महागडी बाहुली होती.अद्वैत त्याची कार घेवून खेळत होता.
रेवा आणि आभा च्या भांडणात ती बाहुली खाली पडली. नी मोडली. सोफ्यावर बसुन सुयश त्याचं काम करत होता. तर निकिता मोबाईल वर बोलतं होती.
रेवा आणि आभा च्या भांडणात ती बाहुली खाली पडली. नी मोडली. सोफ्यावर बसुन सुयश त्याचं काम करत होता. तर निकिता मोबाईल वर बोलतं होती.
" रेवा, तू माझी बाहुली का तोडली ? "
आभाचा आवज ऐकून निकिता ने वळून बघितलं. आभाला जवळ घेतलं. नी दुसऱ्या क्षणाला तिने रेवाच्या कानाखाली मारली. की ती मागे जाऊन पडली. ती नेमकी अद्वैतच्या कारच्या रिमोट कंट्रोल वर. पाठी मागच्या कपाटाचा कॉर्नर तिला लागला.
रेवाच्या रडण्याचा आवाज ऐकून स्नेहल धावतच बाहेर आली. तिने पटकन तिला उचलुन कुशीत घेतले. ती रडत होती. तिच्या कपाळाला खोक पडली होती. रक्त वाहत होते. स्नेहल ने तिच्या पदराने ते रक्त पुसल.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा