" मी नाही तोडली." ती रडत रडत म्हणाली.
" हो बाळा तु नाही तोडली."
" शु.. शुक.. मी आहे."
स्नेहल तिला शांत करत होती. इतकं लागलं होतं तरी देखील तिला तिच्या काका काकुची भिती वाटत होती. स्नेहल ने तिला उचलून तिच्या खोलीत नेलं. तिची जखम पुसली. तिला साखर मीठ पाणी दिलं. इतकं सगळं घडून देखील त्या लोकांना रेवाला दुखावल्याच वाईट वाटलं नाही.
निकिताची मूल रेवा ने खेळणी तोडली म्हणुन तिला आणि स्नेहल ला ओरडत होते.
" स्वतः ची ऐपत नाही महागडी खेळणी घेवून दयायची, तर दुसऱ्याच्या खेळण्याला हात कशाला लावायचा ? "
" किती नुकसान झाले याचा काही अंदाज "
बाहेरच्या बाजुला चालु असलेलं बोलणं ऐकून तिच्या काळजाला घर पडत होती. तिला तिच्या लाचारीचा राग येत होता. त्या दिवशी ती दिवस भर रेवा सोबत बसुन होती.
तुषार ऑफिस मध्ये होता. त्याला या सगळ्या गोष्टी बद्दल काहीचं माहिती नव्हत. स्नेहलला फोन करण्याची परवानगी नव्हती. तिने त्याला फोन केला तरी तो कधीच तिचा फोन उचलत नसे. तिचा मिस कॉल बघून स्वाती बाईना फोन करून कारण विचारत.
आज सुध्दा तिने त्याला फोन लावला होता. त्याने नेहमी प्रमाणे उचलला नाही. त्याच्या आईला फोन करून विचारलं. तेंव्हा स्वाती बाईनी रेवा ने कशी मुलांची खेळणी तोडली हे सगळं रंगवून सांगितल. पण तिला डोक्याला जखम झाली असल्याचं नाही सांगितलं.
" त्या रेवाला जरा काही झालं तर ती काम न करता रूम मध्ये बसुन होती."
अशी तक्रार मात्र केली.
अशी तक्रार मात्र केली.
संध्याकाळी घरी आल्यावर तुषार ने तिला जाब विचारला.
" तुला काम करायला काय झालं होतं. आईचं वय झालं आहे. निकिताची मूल छोटी आहेत. रेवा ला कशाला त्यांच्या खेळण्याना हात लावु दिला ? "
तिने तुषारला सांगितल दुपारी काय घडलं ते. तर त्याने आपल्या लेकीला काय झालं हे विचारण्याची तसदी पण घेतली नाही. पुढचा आठवडा भर रेवा आजारीच होती. तिने घरकाम बाजुला ठेवून तिचं लक्ष फक्त रेवा कडे दिलं. आभा आणि अद्वैत तिच्या कडे येत. इतर वेळी त्यांना सांभाळण्याचे काम तिचंच असायचं. या वेळीं तिने स्वतःच अंग काढून घेतलं.
तिचं काम न करणं हे घरातील शांतता भंग करण्याचं कारण ठरलं. येता जाता तिला ऐकवलं जात. शेवटी तर कंटाळून एक दिवस सासू बाई तिला म्हणाल्याच,
" तुला इथ काय फक्त पोसायला आणलं आहे का ? गरीब घरची मुलगी सून करून आणली, म्हणलं घरकाम करेल. सासू बाईंची सेवा करेल. वंशाला दिवा देईल. पण काहीच नाही. ती पोरगी काय पडली लगेचच काम धाम सोडून बसली."
" आई तुम्ही मला तुमची सेवा करायला आणलं होतं ?" शेवटी न राहून स्नेहल ने विचारलं.
तिला त्यांच्या बोलण्याचा प्रत्यय याआधी अनेक वेळा आलेला होता. पण सासू बाईनी कधी तिला बोलून दुखावलं नव्हत.
" तुला काम धाम करायची नाहीत तर तुला घराचे दरवाजे उघडे आहेत." तुषार तिला म्हणाला.
" हे माझं घर आहे. मी का जाईन ? "
" तूझ्या बापाने आंदण म्हणून नव्हत दिलं. हे तूझ्या बापाचं घर नाही."
" तूझी हिंमत कशी झाली माझ्या आई सोबत उलट बोलण्याची ?" अस म्हणत तुषार ने तिला कानाखाली मारली. पण तिने त्याचा हात हवेतच अडवला.
" हात खाली करायचा. तू तुझ्या लायकीत राहायचं." ती चिडून म्हणाली.
" आता तर बास झालं. निघ या घरातुन." तुषार म्हणाला.
" जा निघून घरातुन. रस्त्यावर जा. चार ठिकाणी जोडे खाल्ले की अक्कल येईल." स्वाती बाई गुरकावल्या.
" मी जाईन या घरातून जेंव्हा मी माझ्या बरबादीची किंमत वसुल करेन." आज पहिल्यांदा तिने तिच्या साठी आवज उठवला होता.
" कसली किंमत ? तूझ्या बापाने नाही कमवून ठेवली ? आली मोठी किंमत वसूल करणारी ? "
" चल निघ इथुन." सासु बाई तिला हाताला धरून म्हणाल्या.
" आम्ही काही देणं लागतं नाही." सासू बाई बोलतं होत्या.
" लायकी तर तुमची नाही मला घरातुन बाहेर काढण्याची. माझ्या बापाने नाही कमावला पैसा. पण तू तर कमवत आहे ना ? लग्न करून सासरी नांदवायला आणलं आहे. मुलीला जन्माला घातलं आहे. त्याची पुरेपूर किंमत वसुल करेन. तुम्ही नाही दिली तर कायदा आहे. तो नक्कीच माझ्या बाजूने उभा आहे. माझं आयुष्य बरबाद केलं तुम्ही. त्याची किंमत मोजण्याची लायकी आधी कमवा. मग मला घरातुन बाहेर काढण्याची भाषा बोला." ती ठणकावून म्हणाली.
शांत पणे तिच्या रुम मध्ये जाऊन झोपली. इतके दिवस तिच्या न बोलण्याचा गैर फायदा सासरची मंडळी घेत होती. तिने पण तिच्या नशिबाचे भोग समजुन सगळं काही स्वीकारलं होतं. पण ती तिची सर्वात मोठी चूक होती.
ती स्वतः वर झालेला अन्याय सहन करू शकली होती. पण यावेळी गोष्ट तिच्या मुलीची होती. तिला पक्क माहित होत तुषारला रेवा विषयी काहीच प्रेम नाही.
स्नेहल रेवा ची आई होती. आपल्या मुलाच्या उज्वल भवितव्यासाठी आई कोणतेही कष्ट करण्यासाठीं सक्षम असते. त्या घटने नंतर तिला समजलं होतं. तिच्या बोलण्यात आवज उठवण्यात लढण्याची ताकद आहे. ती स्वतः साठी लढू शकते.
स्नेहल रेवा ची आई होती. आपल्या मुलाच्या उज्वल भवितव्यासाठी आई कोणतेही कष्ट करण्यासाठीं सक्षम असते. त्या घटने नंतर तिला समजलं होतं. तिच्या बोलण्यात आवज उठवण्यात लढण्याची ताकद आहे. ती स्वतः साठी लढू शकते.
रेवा तिच्या जगण्याचं कारणं आहे. जे सुख तिला तिच्या नशिबात नाही मिळालं ते सुख ती रेवाला देण्यासाठी धडपडणार होती.
काही महिन्या नंतर तिने सर्वात आधी तिच्या साठी नोकरी शोधली. रेवा एका किंडर गार्टन मधे जात होती. तिला तिथं मॉनटेसरी टीचर ची नोकरी मिळाली. पगार खुप नव्हता. पण ती तिचे आणि रेवाचे खर्च स्वतः उचलु शकेल इतका होता.
स्कूल सोबत तिने लहान मुलांच्या ट्युशन घेण्याचं काम सुरू केलं. त्यातून तिला चांगले पैसे मिळू लागले. आता तिने तिच्या साठी नोकरी शोधली होती. तसचं घरकाम पण तिने तिच्या कुटुंबा पुरत मर्यादित ठेवलं होतं. तिच्या कडून जितकं होईल तितके काम ती करत. साहजिक बाकिच्या कामाची जबाबदारी सासू बाई आणि निकीता वर आली. घरात वरकामाला बाई ठेवली. पण तिने सांगितलेला पगाराचा आकडा बघून तिला नोकरी देण्याची ऐपत त्यांच्यात नव्हती. निकीता आणि स्वाती बाईना स्वतः काम करावी लागत.
तुषार तिला बायको म्हणून स्वीकारू शकत नव्हता. आणि तिच्या पासुन सुटका करून घेण्याची त्याची ऐपत नव्हती. इतके दिवस सतत तिला तिची लायकी दाखवणारे लोकं आता तिच्या कडे बघत. पण बोलण्याची हिंमत होत नव्हती.
स्नेहल आता तिच्या मुलीसाठी जगत होती. तुषार तिला बोलू शकत नव्हता. तिच्या अंगावर हात उचलु शकत नव्हता. त्याने तिला इजा पोचविण्याचा प्रयत्न केला असता तर तिने त्याला जेल मध्ये पाठवायला कमी केलं नसतं याची जाणीव त्याला होती.
म्हणूनच आज रविवारी रेवा आणि स्नेहल अप्पूघर फिरायला गेल्या होत्या तरी देखील तो तिला जाब विचारु शकला नव्हता.
समाप्त.
©® वेदा
कथा आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा.
या कथेचा वापर यू ट्यूब किंवा इतर कुठेही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
तुमचं मत कॉमेंट मध्ये सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा