Login

तू तर चाफेकळी

You Are My Bud

तू तर चाफेकळी


हसऱ्या रंगीत संध्याकाळी
खिडकीत उभी तू
दिसशी चाफेकळीच तू
तव वर्णनास नसे सीमा
दुसऱ्यास अशांत करूनी
पूर्णतः शांत तू

रोज पाहतो इथेच तुला
कधी होते नजरा नजर
सोनकेवडा रंग तुझा
गालावरी गुलाबी छटा
मोठे मोठे शामल डोळे
स्वर्गाच्या आनंदी वाटा

त्या खिडकीमध्ये
तुझे हासणे तुझे लाजणे
हृदयात होतसे गीत दिवाणे
सदा तिथेच रेंगाळतो
भेटीसाठी अखंड तळमळतो

दिवस न रात्री तुझाच भास होई
दिवा स्वप्न पाहतो
तुझ्या संगे संसार रंगतो
ऑफिस मध्ये बॉस बोंबलतो
स्वप्नांचा fiasco ( फज्जा ) उडतो

आता रात्र रुपेरी स्वप्नांची नवलाई
डोळे मिटता मिटता तुझेच चिंतन करतो
भुईवर उतरली चांदणी
तू तर नवरत्नांची खाणी
चांदण्यात हिंदोळ्यावर
हितगुज प्रेमाचे करतो
ठाण ठाण घड्याळाचा गजर होतो

पुन्हा नव्याने तयार होतो
खिडकीमध्ये तुला पाहण्या
तू माझी की कुणा दुसऱ्याची
मज माहित नाही काही
पण माझ्यासाठी तू तर चाफेकळी