विषय - नाती सांभाळताना..
तब्बल आठ वर्षे झाली, प्रीती तिच्या माहेरीच गेली नव्हती.
आज तिचा मुड फारच खराब होता, कारण आज तिच्या वडिलांचा वाढदिवसाच होता.
" लावु की नको बाबांना फोन..? बरं फोन लावला तर माझ्याशी ते बोलतील का..? " तिच्या मनाची घालमेल होतं होती.
आज तिचा मुड फारच खराब होता, कारण आज तिच्या वडिलांचा वाढदिवसाच होता.
" लावु की नको बाबांना फोन..? बरं फोन लावला तर माझ्याशी ते बोलतील का..? " तिच्या मनाची घालमेल होतं होती.
तिच्या मनात अनेक प्रश्न येतं होते, ती न राहुन फोन करते.
समोरून तिचे बाबा कॉल उचलतात, " हॅल्लो,,, हॅल्लो,, " आणि फोन समोरून कट होतो.
समोरून तिचे बाबा कॉल उचलतात, " हॅल्लो,,, हॅल्लो,, " आणि फोन समोरून कट होतो.
ती पुन्हा फोन लावते, पुन्हा समोरून बाबा तिचे, " हॅल्लो,,, हॅल्लो.. अरे बोलायचं नाही तर करता कशाला.. " तिचे बाबा फोनवर चिडतात..
बाबांचा आवाज ऐकुन तिला रडु येतं, गेले आठ वर्ष तिची आणि त्यांची काहीचं गाठ भेट झाली नव्हती. कारण आठ वर्षां आधी तिने पळून लग्न केलं होतं, बाबांच्या विश्वासाला, अभिमानाला ठेचं लागली होती.
बाबांचं मन दुखावलं होतं, त्यांचा त्यांच्या मुलीवर अतोनात जीव होता.
प्रीती एकटीच बाल्कनीत किती तरी वेळ बसुन होती, " प्रीती अगं चहा देतेस ना गं.. " प्रीतीचा नवरा विजय तिला आवाज देतो. पण प्रीतीचं लक्षच नसतं..
प्रीती कडुन काहीच प्रतिउत्तर आलं नाही म्हणुन तो पुन्हा तिला आवाज देतो.
" काय गं कसल्या विचारात बुडाली आहेस..? " तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो.
" काही नाही,, तुम्ही बसा मि चहा देते. " आणि ती लगबगिने स्वयंपाक घरात जाते, गॅस पेटवते आणि चहा ऐवजी दुधाचा टोप गॅस वर ठेवते.
" कसला वास येतो आहे.. काही जळतंय का..? " म्हणुन तो किचन मध्ये जातो..त्याचं लक्ष गॅसवर ठेवलेल्या दुधाच्या टोपावर जातं, आणि पटकन तो गॅस बंद करतो.
" अगं काय चाललंय तुझं, चहा मागितला तर दूध काय गरम करतेस.. तु जां बाहेर हॉल मध्ये मि पाहतो काय ते.. "
तो चहाचे दोन कप भरतो, एक तिच्या पुढ्यात ठेवतो आणि एक स्वतः घेतो, " चहा घे बरं वाटेल.. "
ती फुंकर मारून हळू हळू चहाचा घोट मारते, " अस्वस्थ वाटतंय आज, कशातचं मन नाही आतल्या आत रडु येतंय.. " प्रीती बोलुन दाखवते.
" समजु शकतो मि, आज बाबांचा वाढदिवस आहे ना. केलेलास का कॉल..? "
ती काहीचं बोलतं नाही, " केला पण उचलल्यावर तु काहीच बोलली नाही. समोरून बाबा नुसते हॅल्लो हॅल्लो करत होते. बरोबर ना..? " त्याने चटकन ओळखलं होतं..
" होय.. "
" अगं तु बोलायचा प्रयत्न कर, ते तुझे बाबा आहेत नक्कीच तुला माफ करतील.. " विजय तिला समजावतो.
" माला भिती वाटते, मि तर त्यांना बाबा म्हणुन आवाज ही देऊ शकत नाही.. " प्रीतीला आता पच्छाताप झालेला असतो.
"तु उठ तयार हो.."
" तयार कुठे जायचंय..? " प्रीती डोळे फुसते.
" तु प्रश्न करू नकोस, आपण जायच म्हणजे जायचं.. "
" तु बाबांकडे तर घेऊन जात नाही ना..? तसं असेल तर आपण नको जायला.. "
" हो बाबांकडे जायचंय, हे असं लपून छपून कॉल करण्यात काय अर्थ आहे. तु बोलतेस ना चूक केलीस मग तुला झाला ना पच्छाताप, आता सरळ त्यांना भेटायचं. सामोर आलेल्या मुलीला ते हकलावून तर देणार नाही ना, आणि मला हकलं तरी चालेल."
काही वेळातच ती तयार होऊन बाहेर येते, दोघेही कार मध्ये बसतात आणि प्रीतीच्या माहेरी जायला निघतात..
काही वेळातच ती तयार होऊन बाहेर येते, दोघेही कार मध्ये बसतात आणि प्रीतीच्या माहेरी जायला निघतात..
" होईल ना सगळं नीट, उगाच आपण तिथे गेलो आणि बाबांना काही झालं तर.. नको तु कार परत फिरव, नको जायला.. "
" काही होणार नाही, तु शांत रहा आपण प्रयत्न केला नाही तर कसं होणार.. आणि आता आठ वर्षे उलटली, एक मुलगा ही झाला पाहुन खुश होतील ते. " विजय सकारात्मक बोलतं होता. त्याचं हे बोलणं ऐकुन तिला खरंच त्याच नवल वाटतं होतं.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा